Headlines

कळमकोंडा शिवारात कारमधून आलेल्या चोरट्यांनी सहा शेळ्या-दोन बोकड पळविले:हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, कारदेखील चोरीची असल्याचा संशय

हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा शिवारात कारमधून आलेल्या चोरट्यांनी तीन शेतकऱ्यांच्या मालकिच्या सहा शेळ्या व दोन बोकड पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 12 गुन्हा दाखल झाला आहे. तर चोरट्यांनी वापरलेली कार देखील चोरीची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत जनावरे चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामध्ये जनावरांना…

Read More

कोल्हे कुटुंबातील तिसऱ्या पिढीचा विधिमंडळात प्रवेश:आ. कोल्हेंमुळे प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची कार्यकर्त्यांना विश्वास‎

कोपरगाव मतदारसंघाच्या जडणघडणीत माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे २७ वर्षांचे मोठे योगदान आहे. आता त्यांचे नातू आणि संजीवनी कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या रूपाने कोल्हे कुटुंबातील तिसऱ्या पिढीने विधिमंडळाचा वारसा सुरू केला आहे, याचा . विधान परिषदेवर भाजपच्या वतीने विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संवत्सर ग्रामस्थांच्या वतीने संजीवनी कारखाना कार्यस्थळावर त्यांचा नागरी…

Read More

भोंदू मनोहरमामावर चौथा गुन्हा, 41 हजार रूपयांची फसवणूक:करमाळ्यातील घटना, चमत्कारी उपचाराचा गुन्हा‎

करमाळा तालुक्यातील घोटी येथील स्वतःला चमत्कारी उपचार करणारा म्हणून मिरवणाऱ्या भोंदू मनोहर मामा भोसले याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जुन्या प्रकरणात आजच त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती, मात्र तोच त्याच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर मामावर आतापर्यंतचा हा चौथा, तर करमाळ्यातील तिसरा गुन्हा आहे. तक्रारीनुसार,…

Read More

राज ठाकरे आज पुन्हा न्यायालयात हजर राहणार:18 वर्षांपूर्वीच्या रेल्वे आंदोलन प्रकरणात गुन्हा मान्य नसल्याचे स्पष्ट सांगितले होते

मनसेप्रमुख राज ठाकरे आज 2008 मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणाच्या सुनावणीसाठी ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत. 18 वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरू असून, आजच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळासह मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. याआधी डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांनी न्यायालयासमोर मला गुन्हा मान्य नाही, असे स्पष्ट सांगितले होते. तसेच न्यायालयीन प्रक्रियेला…

Read More

नियोजनाचा निधी तातडीने खर्च होण्यासाठी प्रयत्न करा:प्राप्त निधीच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता देणार‎

चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजनाला ६०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्यस्थितीत प्राप्त निधीच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येतील. त्यामुळे यंत्रणांनी जिल्हा नियोजनाचा निधी तातडीने खर्च होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. महसूल भवनातील बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी येरेकर यांनी सुरुवातीला…

Read More

महात्मा फुले विद्यापीठाचा बियाणे पॅटर्न; 8 हजार क्विंटलचा टप्पा पार:बियाणे उत्पादनातून बळीराजाची प्रगती हेच आमचे उद्दिष्ट- डॉ. खर्चे‎

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बियाणे निर्मितीत मोठी झेप घेतली असून, २०२५-२६ या वर्षात विविध पिकांचे तब्बल ८,४५६ क्विंटल बियाणे तयार करण्याचा विक्रम केला आहे. आगामी वर्षासाठी विद्यापीठाने ८,६३७ क्विंटल बियाणे निर्मितीचे महत्त्वाकांक्षी उ . विद्यापीठात कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी ‘बियाणे उत्पादन आढावा बैठक’ पार पडली. या बैठकीच्या उपाध्यक्षपदी…

Read More

कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयात रंगला सत्कार सोहळा‎:विद्यार्थ्यांनी स्वतःला पैलू पाडत सिद्ध करणे हीच खरी गुणवत्ता- सागर जाधव

यश मिळवणे म्हणजे केवळ गुण मिळवणे नव्हे, तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाला ओझे न समजता सातत्य ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडून स्वतःला सिद्ध करणे, हीच खरी गुणवत्ता आहे, असे प्रतिपादन जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सागर जाधव यांनी केले. येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (इयत्ता १० वी) आपल्या उज्ज्वल यशाची…

Read More

जायखेडा-ताहाराबाद रस्ता रुंदीकरणात अडथळा नसलेल्या झाडांचाही गेला बळी:शेकडो वर्षांची वृक्षसंपदा संपवली; जायखेड्यात संतापाची लाट‎

बागलाण तालुक्यातील जायखेडा ते ताहाराबाद मार्गावरील रस्ते रुंदीकरणाच्या कामासाठी शेकडो वर्षे जुनी वृक्षसंपदा निर्दयीपणे जमीनदोस्त करण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या या वृक्षसंहाराकडे वन विभाग आणि सार्वजनि . आंबा, वड, पिंपळ, कडुलिंब यांसारखी पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाची झाडे मोठ्या प्रमाणावर तोडण्यात आली. विशेष म्हणजे, अनेक झाडे रस्त्याच्या कामात अडथळा ठरत नसतानाही त्यांची…

Read More

आदिवासी वाड्या-वस्त्यांवर 47 पाणी टाक्यांचे वितरण:चांदवडमध्ये टंचाईवर मात करण्यासाठी उपक्रम; 5 हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या‎

आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या ५ हजार लिटर क्षमतेच्या ४७ एचडीपीई पाण्याच्या टाक्यांचे मंगळवारी (दि. १२) आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले. येथील पंचायत समिती कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात चांदवड तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमधील विविध आदिवासी वाड्या-वस्त्यांसाठी या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील…

Read More

सावंगी परिसरात बसचे ब्रेक फेल; 50 प्रवासी बचावले:चालकाची प्रसंगावधानता, भुसावळकडून येत होती बस‎

भुसावळकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका एसटी बसचे धावत्या प्रवासात जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील सावंगी टोल नाका परिसरात अचानक ब्रेक फेल झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली. मात्र, बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ५० प्रवाशांचे प्राण वाचले असून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना सुमारास घडली आहे. भुसावळ डेपोची (एमएच ०९ ईएम २५७५) ही बस छत्रपती…

Read More