Headlines

एसटी कारच्या अपघातामध्ये अंत्यविधीहून परतणारे तीन गंभीर:कोल्हार शिवारात‎अपघात; चालक ‎फरार‎

नगर-मनमाड महामार्गावरील कोल्हार खुर्द शिवारात मंगळवारी (७ जुलै) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस आणि कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. पाटीलबवाडी (कोल्हार खुर्द) येथे अंत्यविधी उरकून परतणाऱ्या ममदापूर (ता. राहाता) येथील कारमधील तिघांवर काळाने झडप घातली. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read More

कल्याण मारहाण प्रकरणी विरोधक आक्रमक:गुंडांची चड्डी-बनियानवर धिंड काढा, राऊतांचा संताप; हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभते का? रोहित पवारांचा सवाल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये काल (मंगळवारी) एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद…

Read More

गलथान कारभार:शौचालयावर टाक्याच नाहीत, लाखोंचा चुराडा करून वन पर्यटन केंद्र कुणासाठी?

रावसाहेब मरकड | शेवगाव शहरातील पाथर्डी रोडवर मोठ्या दिमाखात उभारण्यात आलेल्या वन विभागाच्या पर्यटन केंद्राचे तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर थाटात उद्घाटन झाले खरे, मात्र अवघ्या काही दिवसांतच या केंद्राच्या कारभाराचे आणि दुरवस्थेचे पितळ उघडे पडले आहे. पर्यावरण संवर्धनाचे मोठे स्वप्न दाखवून उभारलेल्या या केंद्रात आता सुविधांची मोठी वानवा दिसून येत असून, पर्यटकांसाठी उभारलेल्या स्वच्छतागृहांवर साध्या…

Read More

तिकडे तूट:जिल्हा एक…मान्सूनचे रंग दोन, गत 24 तासांत 28 मिमी पावसासह सरासरीच्या 91% पल्ल्यापर्यंत जिल्ह्याची मजल

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने धरणातील जलसाठा मागील वर्षाच्या तुलनेत घटला आहे. ७ जुलैअखेर धरणात केवळ २९ टक्के जलसाठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी तो ६३ टक्के होता. त्यामुळे जलसाठ्यात तब्बल ३४ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर नवीन…

Read More

अकलूजमध्ये सहकार महर्षी कारखाना रोज 2लाख लिटर पुरवते आरओ पाणी:टँकरद्वारे माळेवाडी, संग्रामनगर, शंकरनगर परिसरात पाणीपुरवठा‎

अकलूज व पंचक्रोशीतील गावांना दर १५ दिवसांनी पाणी मिळणार असे प्रशासनाने जाहीर केल्यानंतर तहानलेल्या नागरिकांना पाणी पुरवण्यासाठी अकलूजच्या सहकार महर्षि साखर कारखान्याने अकलूज, शंकरनगर, संग्रामनगर आणि परिसरातील वाड्यांवर रोज दोन लाख लिटर आरओ पाणी पुरवण . कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या जनसेवेच्या संदर्भात अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील…

Read More

राज्यात पावसाचा धुमाकूळ:पुणे-साताऱ्याच्या घाटमाथ्यावर हायअलर्ट; मुंबई, नाशकात जोर ओसरला, वाचा तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय?

राज्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. संपूर्ण जून महिन्याची पावसाची तूट जुलैच्या पहिल्या आठवड्यातच भरून निघाली आहे. एकीकडे नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळून मुंबईला पावसापासून थोडा दिलासा मिळाला असला, तरी पुण्यात मात्र परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल २७ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी शिरले…

Read More

आंदोलकांचा रस्त्यातच ठिय्या:आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ पावसातच मोर्चा

अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मंगळवारी पावसातच मोर्चा काढण्यात आला. मोर्चातील मार्गातच काही युवकांनी ठिय्या देत मागण्यांसाठी आग्रह धरत आगामी काळात आंदोलन तीव्र होण्याचे संकेत दिले. स्वराज्य भवन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे आयोजन अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समितीतर्फे परिमल कांबळे, रामदास तायडे, ललित अंभोरे, प्रकाश तायडे, संजय धनाडे, उमेश लखन, बाळकृष्ण…

Read More

75 टक्के पेरण्या; दमदार पावसाअभावी शेतकऱ्यांची धाकधूक अद्यापही कायम:रानटी डुकरांमुळे शेतकऱ्यांना तुरीच्या दुबार पेरणीचा फटका‎

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील सुमारे ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्याच्या विविध भागांत अधूनमधून पाऊस झाला असला, तरी आतापर्यंत एकदाही सर्वदूर दमदार सार्वत्रिक पावसाची नोंद झालेली नाही. झालेला पाऊस सध्या पिकांना तग धरण्यासाठी पुरेसा ठरला असला, तरी जमिनीत पाणी मुरून दीर्घकाळ ओलावा टिकावा आणि जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ व्हावी, इतका पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे…

Read More

नांदूर शिंगोटे महामार्ग, शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी:कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना माजी खासदार डॉ.सुजय विखे यांची तंबी‎

राहाता हवामानात झालेला बदल आणि कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी लोणी खुर्द व लोणी परिसरात सुरू असलेल्या विकासकामांचा धडाकेबाज दौरा केला. प्रत्यक्ष घटनास्थळी जात त्यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विशेष म्हणजे, भर पावसात लोणी येथील एका…

Read More

खेडीलिहा शाळेची 70 वर्षांची जीर्ण इमारत बनली धोकादायक:प्रशासनाने लक्ष देण्याची पालकांची मागणी, वर्गखोल्यांमध्ये पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय‎

. एकीकडे शासनाकडून शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आणि आधुनिक शाळांच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचा दावा केला जातो. मात्र दुसरीकडे खेडीलिहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची १९५६ सालची जुनी व पत्र्याची इमारत आजही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत उभी आहे. सततच्या पावसामुळे या इमारतीची अवस्था जीर्ण झाली असून ती कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत असल्याने पालक,…

Read More