उबाठाने 25 वर्षांच्या कारभारात एका कंत्राटदारावरही कारवाई केली का?:आम्ही कारवाई करतो, महाविकास आघाडीप्रमाणे पाठीशी घालत नाही– नवनाथ बन
ठाकरे गटाने 25 वर्षांच्या मुंबई महापालिका सत्ताकाळात एका तरी कंत्राटदारावर किंवा अधिकाऱ्यावर कारवाई केल्याचे उदाहरण द्यावे. महायुती सरकारच्या काळात महापौर, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. ज्या ठिकाणी त्रुटी आढळतात, तेथे अधिकाऱ्यांचे निलंबन आणि कंत्राटदारांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मुंबईकरांचे जीवन सुरळीत ठेवणे ही आमची जबाबदारी असून चुका लपविण्याऐवजी त्यावर…