Headlines

1 कोटी महिलांना योजनांमध्ये 30%लाभ, बँक कर्ज मिळणार:देशात महाराष्ट्र पहिले राज्य – महिला शेतकरी विधेयक विधानसभेत मंजूर

शेतमालक असलेल्याच नव्हे तर शेतात राबणाऱ्या महिलांनाही शेतकरी म्हणून ओळख मिळवून देणारे महिला शेतकरी विधेयक २०२६ विधानसभेत एकमताने मंजूर झाले. यानुसार मासेमारी, कुक्कुटपालन, गौण वन उत्पादन (उदा. तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या) गोळा करणाऱ्या महिलांचीही शेतकरी अशीच नोंद होईल. ७/१२ वर नाव नसलेल्या ८० ते ९५ लाख महिलांसह राज्यातील सुमारे १ ते १.१५ कोटी महिलांना कायदेशीर ओळख,…

Read More

15 वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला:हिंगोलीच्या बेग्या पवार कोठडीतील मृत्युप्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेप, वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

रिसोड पोलिस ठाण्याच्या कोठडीत १५ वर्षापूर्वी एका तरुणाच्या मृत्यू प्रकरणात वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. जिल्हा न्यायमूर्ती जयसिंग झपाटे यांनी तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जन्मठेप ठोठावली. . केवळ ३४ दिवसांत तपास पूर्ण करत सीआयडीने दोषारोपपत्र सादर केले होते. त्यानुसार दोषींना कलम ३०२ अन्वये जन्मठेप, कलम २०१ नुसार पुरावा…

Read More

विद्यापीठाच्या उभारणीत कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा:सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभात कुलगुरू डॉ. बारहाते यांचे प्रतिपादन

कोणत्याही संस्थेच्या उभारणीत कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असतो. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विकासात कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्यामुळेच विद्यापीठ उभे राहू शकले, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. ते विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभात बोलत होते. हा ‘कर्तव्यपूर्ती सोहळा’ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंचावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र…

Read More

प्रहार'ची स्मार्ट मीटरविरोधात निदर्शने:विद्युत भवनवर धडक; अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर, मोहीम थांबवण्याची मागणी

अमरावती येथे महावितरणच्या स्मार्ट मीटरविरोधात ‘प्रहार’ संघटनेने गुरुवारी तीव्र निदर्शने केली. स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबवून जुने मीटर पुन्हा बसवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कॅम्प येथील विद्युत भवनसमोर हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या मते, महावितरण कंपनीकडून घराघरांत बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरमुळे कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे….

Read More

मोर्शीत परळ सापासह 39 पिल्ले आढळली:जीवनसेतू व कार्स संस्थेने केली यशस्वी सुटका

मोर्शीतील समर्थ कॉलनीमध्ये रूपेश उज्जैनकर यांच्या घरी परळ जातीचा साप आणि त्याची तब्बल ३९ पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली. जीवनसेतू जलमित्र आपत्ती बचाव बहुउद्देशीय संस्था आणि कार्स संस्थेच्या सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून साप आणि त्याच्या पिल्लांची यशस्वी सुटका केली. ही घटना गुरुवार, २ जुलै रोजी सकाळी घडली. उज्जैनकर कुटुंब नेहमीच्या घरगुती कामात व्यस्त असताना त्यांना…

Read More

तिवसा बसस्थानकातील 50 हजारांच्या चोरीचा गुन्हा उघड:सराईत पाकीटमार अटकेत, 8 हजार 500 रुपये जप्त

तिवसा बसस्थानक परिसरात चार महिन्यांपूर्वी झालेल्या ५० हजार रुपयांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात तिवसा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका सराईत पाकीटमाराला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीतील ८ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. ही घटना ४ मार्च २०२६ रोजी घडली होती. डेहणी (ता. तिवसा) येथील महेंद्र आत्माराम वानखडे (वय ५२) हे…

Read More

अपघातानंतर आर्थिक संकट:मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार, 100 वर्षीय वृद्धेला 24 तासांत आर्थिक सहाय्य मंजूर

गंभीर अपघातामुळे उपचारासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या १०० वर्षीय सरूबाई मुंजवार यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले. या सहाय्यामुळे त्यांच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया वेळेत पार पडून पुढील उपचार तातडीने सुरू करणे शक्य झाले. सरूबाई मुंजवार या रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झाल्या. या अपघातात त्यांच्या डाव्या मांडीला…

Read More

खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना प्रोत्साहनपर अनुदान लागू:पशुधन उत्पादकता वाढवण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन

राज्यातील पशुधनाची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि त्यांना विविध संसर्गजन्य आजारांपासून वाचवण्यासाठी कृत्रिम रेतन व लसीकरण मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. या मोहिमेला गती देण्यासाठी खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवा पुरवण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान लागू करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली. डॉ. पाटील यांनी संबंधित जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना…

Read More

ज्ञानप्रबोधिनीच्या अटल सामाजिक नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन:शाश्वत विकासासाठी व्यापक इनोव्हेशन गरजेचे – विवेक सावंत

देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी तंत्रज्ञानापुरते मर्यादित न राहता समाजाभिमुख, सर्वसमावेशक आणि व्यापक नवोन्मेष (इनोव्हेशन) आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एमकेसीएल) संस्थापक संचालक विवेक सावंत यांनी व्यक्त केले. ज्ञानप्रबोधिनीच्या अटल सामाजिक नवोन्मेष केंद्राच्या (एसीआयसी) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नीती आयोग, अटल इनोव्हेशन मिशन, देसाई ब्रदर्स लिमिटेड आणि ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र यांच्या संयुक्त…

Read More

जादूटोणा गुन्हे घटले, ही सकारात्मक बाब:जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचारासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा – विभागीय आयुक्त शीतल तेली

जादूटोणा अंतर्गत गुन्ह्यांची संख्या कमी होत आहे, ही सकारात्मक बाब आहे. जुन्या चालीरिती, रुढी- परंपरा बदलणे हे कठीण काम आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे राबवून प्रचार, प्रसिद्धी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांनी दिल्या. जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गठीत विभागीय समितीच्या आढावा…

Read More