Headlines

साकीनाका मॅनहोल दुर्घटना:महापौरांवरही कारवाई व्हायलाच हवी, सत्ताधाऱ्यांकडून केवळ कॉन्ट्रॅक्टर्सची सेवा – आदित्य ठाकरे

मुंबईतील साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईत पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण झाली नसल्यामुळेच अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचा आरोप करत त्यांनी महापौरांवरही निशाणा साधला. “मुंबईच्या महापौरांना मुंबईकरांची नाही, फक्त बांग्लादेशींची काळजी आहे,” अशी जहरी टीका त्यांनी केली….

Read More

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठे वळण:धक्का नेमका कोणी दिला? पोलिसांना अद्याप स्पष्ट उत्तर नाही, आरोपींच्या ‘पॉलिग्राफ टेस्ट’ची शक्यता

पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आता अत्यंत महत्त्वाचे वळण आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची ‘पॉलिग्राफ टेस्ट’ (लाय डिटेक्टर टेस्ट) करण्याची तयारी पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केली आहे. केतन अग्रवाल यांना अंतिम धक्का नेमका कोणी दिला, याबाबत दोन्ही आरोपींकडून अद्याप ठोस कबुली मिळालेली नसल्याने तपास यंत्रणा आता…

Read More

CBSE शाळांकडून पुस्तकांची सक्ती खपवून घेतली जाणार नाही:तक्रार आल्यास कारवाई, देखरेखीसाठी समिती स्थापन होणार – शिक्षणमंत्री दादा भुसे

राज्यातील खासगी आणि CBSE संलग्न शाळांकडून विद्यार्थ्यांना शाळेने ठरवून दिलेल्या दुकानातूनच पुस्तके, वह्या आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती केल्याच्या तक्रारींवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. अशा प्रकारची सक्ती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही. तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत मांडली. याचबरोबर,…

Read More

Maharashtra Women Farmers Empowerment Bill 2026 Presented in Assembly | Dattatray Bharne | Sunetra Pawar | Women Farmer

शेतात पुरुषांच्या बरोबरीने राबणाऱ्या पण जमिनीवर नाव नसल्याने ‘शेतमजूर’ ठरवल्या जाणाऱ्या महिलांना आता हक्काची आणि कायदेशीर ओळख मिळणार आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकर . या विधेयकाचा मसुदा देवेंद्र फडणवीस यांच्या थेट देखरेखीखाली तयार करण्यात आला असून, महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करून शेती क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याचा या कायद्याचा…

Read More

निर्भीड लेखणी हरपली:ज्येष्ठ पत्रकार टी. बी. गोल्हर यांचे निधन; नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपद म्हणून मोठे योगदान

ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भगवंत गोल्हर यांचे गुरुवारी, २ जुलै रोजी पहाटे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील माणिकवाडा (धनज) येथील रहिवासी असलेल्या तुळशीदास गोल्हर यांनी अनेक दशके पत्रकारितेत सक्रिय होते. त्यांनी…

Read More

शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त 'सामाजिक न्याय दिन' साजरा:दीपा मुधोळ-मुंडे यांचे 'नशा मुक्त भारत' अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नुकताच ‘सामाजिक न्याय दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी ‘नशा मुक्त भारत अभियाना’त सहभागी होण्याचे आवाहन केले. शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांची जोपासना करण्यासोबतच या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन ते यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. सहायक आयुक्त, समाज कल्याण आणि शाहू मंदिर…

Read More

मोहित कंबोज दलालच:श्रीकांत शिंदे उद्धव ठाकरेंकडे येऊन कितीवेळा रडलेत हे आम्हाला माहीत, कौतुक केलं म्हणजे भाजपमध्ये गेलो असं नाही- अंबादास दानवे

मोहित कंबोज हा दलाल आहे त्यांच्या विषयी मी परवा बोललो तर भाजपच्या लोकांचेच मला फोन आले की तुम्ही बोललात ते एकदम योग्य बोललात, असे म्हणत उबाठाचे नेते अंबादास दानवे त्यांच्यावर टीका केली आहे. तर श्रीकांत शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याकडे येत कितीवेळा रडले हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलूच नये आणि बोलले तरी…

Read More

Yogesh Kadam Hits Back at Raj Thackeray Over Public Connect

केवळ व्यासपीठावरून भाषणे ठोकून मते मिळत नाहीत, तर त्यासाठी जनतेमध्ये उतरून काम करावे लागते. महायुती सरकार म्हणून आम्ही ते काम करत आहोत आणि म्हणूनच लोकसभा, विधानसभाच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता आमच्या पाठीशी उभी राहिली आहे, . राज ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींची तुलना ‘देहविक्री’ करणाऱ्यांशी केल्याबद्दल योगेश कदम यांनी तीव्र आक्षेप घेतला. अशा शब्दांत…

Read More

चंद्रपुरातील धक्कादायक घटना:नवजात बाळ विक्रीप्रकरणी भाजपच्या 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; दोघीही आमदार जोरगेवारांच्या समर्थक असल्याची चर्चा

पैशांच्या हव्यासापोटी एका जन्मदात्या मातेनेच आपल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचा सौदा केल्याची धक्कादायक घटना नुकतीच चंद्रपुरात उघडकीस आली होती. आता या मानवी तस्करी आणि बाळ विक्री प्रकरणाला मोठे राजकीय वळण लागले आहे. या बेकायदेशीर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मदत केल्याच्या आरोपावरून रामनगर पोलिसांनी चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक असलेल्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना…

Read More

रत्नागिरीत दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक:11 शाळकरी विद्यार्थी आणि चालक जखमी, ब्रेक निकामी झाल्याचा प्राथमिक अंदाज

रत्नागिरी तालुक्यातील शीळ गावाजवळ गुरुवारी सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 11 शाळकरी विद्यार्थी आणि एका एसटी बसचा चालक जखमी झाला असून सर्व जखमींवर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ब्रेक निकामी झाल्याने…

Read More