Headlines

शंकर नगरात गजानन महाराज विजयग्रंथ महापारायण सोहळा:पादुका दर्शन सोहळा, महाप्रसादालाही अनेकांची उपस्थिती‎

गंगा सावित्री निवासस्थान शंकर नगर येथे संत गजानन महाराज विजयग्रंथ महापारायण व पादुका दर्शन सोहळयामध्ये शेकडो महिला व गजानन भक्तांनी २१ अध्याय वाचून श्री संत गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतला. याप्रसंगी शेकडो भाविकांनी पादुकांचे दर्शन घेत महाप्रसादाचाही लाभ घेतला. अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात हा सोहळा झाला. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिरसाने ओतप्रोत भरून गेला होता. भाजप…

Read More

माढा तालुक्यातील बाधित 1034 शेतकऱ्यांची ई- केवायसी अपूर्ण:खरवडून गेलेल्या जमिनीसाठी जाहीर केलेला 3 लाखांचा निधी शासन दरबारी अडकला‎

माढा तालुक्यात सिना नदीच्या महापुराला ९ महिने उलटूनही राज्य सरकारच्या घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन दिलेल्या आश्वासनांवर शेतकरी आजही वाट पाहत आहेत. तालुक्यात पुराने बाधित झालेल्या २७२१ शेतकऱ्यांपैकी १६८७ शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे प्रति हेक्टर ४७ हजार रुपयांचा मदत निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित १०३४…

Read More

शारीरिक आरोग्यासाठी दररोज योगाभ्यास करावा:जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांचे सोमैया विद्या मंदिर शाळेत प्रतिपादन‎

योग ही भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली एक अमूल्य आणि आरोग्यदायी देणगी आहे. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे. उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मुलांनी दररोज योगाभ्यास करावा आणि मैदानी खेळांमध्ये सहभागी व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो…

Read More

बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करा- धाडगे:श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील गुणवंतांचा केला गौरव

आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात केवळ शैक्षणिक प्रगती पुरेशी नसून विद्यार्थ्यांचे शरीर, मन, मनगट आणि मस्तक तंदुरुस्त असणे तितकेच आवश्यक आहे. अभ्यासासोबतच खेळ, कला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा समतोल साधणारा विद्यार्थीच भविष्यात यशस्वी ठरू शकतो, असे प्रतिपादन पुणे येथील सहाय्यक अभियंता राजेंद्र धाडगे यांनी केले. श्री समर्थ विद्यामंदिर माध्यमिक विभागात इयत्ता दहावीच्या गुणवंत…

Read More

मुख्यमंत्री पंचायत अभियान मूल्यांकन समितीने केली उंडणगावची पाहणी

उंडणगाव ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान मूल्यांकन समितीने नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान समितीच्या सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात राबविण्यात आलेल्या विविध लोकाभिमुख विकासकामांची, स्वच्छता मोहिमेची आणि प्रशासकीय कामकाजाची पाहणी करून आढावा घेतला. मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना अधिक सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख बनविण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून…

Read More

पैठण तालुक्यात 17 % खरिपाची पेरणी:कापूस, तूर, सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल‎

पैठण मान्सूनचे आगमन होऊन जवळपास महिना होत आला आहे, तरीही पैठण तालुक्यात अद्याप पावसाचा एकही थेंब पडलेला नाही. जून महिना संपत आला तरी अनेक गावांमधील शिवारे कोरडीठाक आहेत. अशा परिस्थितीतही तालुक्यातील काही बागायतदार शेतकऱ्यांनी मोठा धोका पत्करत खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. तालुक्यात आतापर्यंत सुमारे १७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती तालुका…

Read More

50 हजार रोपे पडून:11 हजार हेक्टर वनक्षेत्र संकटामध्ये; 3 वर्षांपासून वृक्षलागवड निधी नाही, कन्नडला वन विभागाच्या 850 हेक्टरवर अतिक्रमण‎

तालुक्यातील ११ हजार हेक्टर विस्तीर्ण वनक्षेत्राची प्रादेशिक वन विभागाकडे आहे. मात्र, तीन वर्षांपासून शासनाकडून वृक्षलागवडीसाठी निधीच उपलब्ध झालेला नसल्याने जंगलांचे संवर्धन करणे जिकरीचे झाले आहे. तसेच दोन वाटिकांमध्ये ५० हजार रोपे तयार असून, त्याला मागणी नसल्याने ही झाडे तशीच पडून आहे. त्यात विभागाच्या ८५० हेक्टरवर अतिक्रमण असून, अपुऱ्या मनुष्यबळामुळे या विभागाला गैरसोयीचा सामना करावा लागत…

Read More

दहशतवादी कारवायांच्या संशयावरून परभणीत एटीएसचे 15 ठिकाणी छापे:12 जण ताब्यात, पथकात संभाजीनगर व नांदेड एटीएसही

ऑनलाइन माध्यमातून होत असलेल्या दहशतवादी कारवाया आणि संशयास्पद हालचालींच्या गुप्त माहितीवरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी पहाटे परभणी शहरात मोठी कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील एटीएसच्या पथकाने पहाटे तीन वाजता शहरातील १५ वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागाच्या संशयावरून १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या कारवाईसाठी २६…

Read More

विधिमंडळ:पावसाळी अधिवेशन उद्यापासून; युती आक्रमक, विरोधक बॅकफूटवर, दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेताच नाही

महाराष्ट्र विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन सत्ताधारी महायुतीची आक्रमक खेळी आणि विरोधकांचा बचावात्मक पवित्र्यामुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे. महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून दोन्ही सभागृहांना अद्याप हक्काचा ‘विरोधी पक्षनेता’ मिळालेला नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या कथित फुटीच्या चर्चेमुळे विरोधी गोटात कमालीची अस्वस्थता आहे. जनतेचे ज्वलंत प्रश्न सभागृहात ताकदीने मांडण्याऐवजी विरोधक सध्या स्वतःचे…

Read More

21 जून वर्षातील सर्वात मोठा दिवस:दिनमान 13 तास 13 मिनिटे, उत्तर गोलार्धात 'समर सॉलस्टाईस'चा अनुभव घ्या

खगोलप्रेमी आणि जिज्ञासूंसाठी आजचा रविवार (२१ जून) हा दिवस महत्त्वाचा आहे. उत्तर गोलार्धात रविवारी वर्षातील सर्वात मोठा दिवस अनुभवता येणार असून, दिनमान १३ तास १३ मिनिटांचे असेल. मराठी विज्ञान परिषदेच्या स्थानिक शाखेचे पदाधिकारी विजय गिरुळकर आणि प्रा. प्रवीण गुल्हाने यांनी नागरिकांना या खगोलीय घटनेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे आवाहन केले आहे. भारतात, म्हणजेच उत्तर गोलार्धात, २१…

Read More