Headlines

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी डॉ. हर्षाली देशमुख यांचा संवाद:रोजगारनिर्मिती व महिला सक्षमीकरणातील कार्याची दखल; मुंबईच्या उद्योजिकेला मिळाला सन्मान

महाराष्ट्रातील उद्योजिका डॉ. हर्षाली देशमुख यांना प्रधानमंत्री रोजगाराशी निगडित लाभ योजना (PMBBRY) अंतर्गत आयोजित लाभ वितरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली. रोजगारनिर्मिती आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), प्रादेशिक कार्यालय, नरिमन पॉईंट, मुंबई यांनी त्यांचे नामांकन केले होते. कार्यक्रमादरम्यान डॉ. देशमुख…

Read More

रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना:छत्रपती संभाजीनगरचे 5 पर्यटक समुद्रात बुडाले, शोधमोहीम सुरू

वीकेंडचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे आलेल्या पर्यटकांवर आज, शनिवारी (दि. 20 जून) काळाने घाला घातला. येथील प्रसिद्ध श्री देव गणपतीचे दर्शन घेऊन समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी 5 जण समुद्राच्या पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने बुडाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हे पाचही जण सध्या…

Read More

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते उद्घाटन, 48 तासांतच FDA ची कारवाई:कुडाळमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धाड

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात सुरू केलेल्या धडक मोहिमेचाच एक भाग म्हणून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली असून, यामध्ये अवघ्या दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ‘आपला बाजार’ या मॉलवर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी थेट धाड टाकल्याने परिसरातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

Read More

ओमराजे हा भंपक माणूस, नावातील 'राजे' शब्द काढा:शिंदे गट म्हणजे शहांचे 'टेस्ट ट्यूब बेबी, ऑपरेशन टायगर' नाही आमचे कोल्हे पळाले- संजय राऊत

ओमराजे हा भंपक माणूस आहे. त्यांच्या नावातील राजे शब्द काढावा असे आमचे चंदनशिवे म्हणाले. ओमराजेचे भाषण ऐका ते कबुल करतात की ते संकटात असताना उद्धव ठाकरेंनी मला आमदार-खासदार केले मी त्यांची साथ कधीच सोडणार नाही. मी जर त्यांना सोडले तर धाराशिवच्या जनतेने मला जोड्याने मारावे, असे म्हणणारा हा माणूस आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार…

Read More

बापाचं पिंडदान करा, मग निष्ठा मान्य करू:कृष्णा आष्टीकरांना सुषमा अंधारेंचे थेट आव्हान, आरोप-प्रत्यारोपांनी संघर्ष तीव्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या बंडानंतर आता राजकीय संघर्षासोबतच वैयक्तिक पातळीवरील आरोप-प्रत्यारोपही तीव्र होताना दिसत आहेत. बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा आष्टीकर यांनी आपण अद्याप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असल्याचा दावा केल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना अत्यंत आक्रमक शब्दांत आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमानंतर…

Read More

प्रशासकीय दिरंगाईचा फटका:"टाळे ठोको' आंदोलनानंतर 667 युवकांना दोन दिवसांत मिळणार स्टायपेंड अन् प्रमाणपत्रे

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात आलेल्या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेकडो युवक-युवतींना अद्याप प्रमाणपत्र आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचे स्टायपेंड मिळाले नसल्याने अखेर प्रशिक्षणार्थींचा संयम सुटला. संतप्त झालेल्या प्रशिक्षणार्थींच्या वतीने शिवसेना सामाजिक न्याय विभागाने जिल्हा उद्योग केंद्रावर थेट ‘टाळे ठोको’ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी महाव्यवस्थापकांना घेराव घालत प्रशासकीय दिरंगाईचा जाब विचारला. मात्र,…

Read More

Sengao Police Raid Gambling Den; Three Held, Five Flee, Rs 1.78 Lakh Seized

सेनगाव तालुक्यातील पानकन्हेरगाव शिवारात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सेनगाव पोलिसांनी शुक्रवारी ता. 19 सायंकाळी छापा टाकला. यामध्ये तीन जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर पाच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी या का . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालु्क्यातील पानकन्हेरगाव शिवारातील अनिल जाधव यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाखाली काही इसम झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत…

Read More

Nagpur NEET Student Gets Abu Dhabi Centre; NTA Blunder Stuns

NEET-UG परीक्षेतील कथित गोंधळ अजून शांत होत नाही तोच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा (NTA) आणखी एक अत्यंत धक्कादायक आणि अजब कारभार समोर आला आहे. नागपूरमधील रहिवासी आणि NEET ची तयारी करणाऱ्या अब्दुल्ला मोहम्मद तालिब या विद्यार्थ्याला 21 जून रोजी होणाऱ्या फेर . हॉल तिकीट पाहताच विद्यार्थी ढसाढसा रडला विद्यार्थ्याचे वडील मोहम्मद तालिब यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

उबाठाच्या वर्धापन दिनी खासदार संजय राऊतांना भाषणाची संधी नाही:आदित्य ठाकरेंनीच भोंगा बंद केल्याचा भाजपचा टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही, यावरून पक्षातील त्यांचे महत्त्व कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला. आदित्य ठाकरेंनीच डाव उधळला नवनाथ बन म्हणाले की, ठाकरे गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात भोंगा…

Read More

आगीखेडमध्ये दिले माती परीक्षणाचे धडे:प्रात्यक्षिकाद्वारे सांगितली शेतातून मातीचा नमुना घेण्याची शास्त्रीय पद्धत‎

शेतीमध्ये वाढता उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षण हा एकमेव खात्रीशीर मार्ग आहे. हेच ओळखून कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आगीखेड (ता. बार्शीटाकळी) येथील शेतकऱ्यांना माती परीक्षण आणि त्यानुसार खत व्यवस्थापन कसे करावे, याचे मार्गदर्शन केले. गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांच्या अवाजवी वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला आहे….

Read More