विहिरीत साबडे कोसळले, मजूर ठार; दुसरा गंभीर जखमी:वैजापूर तालुक्यातील खंडाळा शिवारातील घटना
प्रतिनिधी | खंडाळा खंडाळा शिवारात विहिरीतील मलबा काढणारी साबडे अंगावर पडून एक मजूर ठार झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. ही घटना २७ एप्रिल रोजी सकाळी ११च्या सुमारास घडली. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे रायगड हॉटेलच्या पाठीमागे गट नंबर १० मध्ये शरद भोपळे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. राजपूत ठेकेदारामार्फत काम चालू होते. विहीर…