Headlines

पुण्यात रिक्षाचालकाने प्रवाशाला लुटले, 1.15 लाखांचा मुद्देमाल लंपास:वाकडेवाडीत मध्यरात्री घडली घटना; रिक्षाचालकासह साथीदारावर गुन्हा




पुण्यात रिक्षा प्रवाशांना लुटण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. वाकडेवाडी परिसरात एका रिक्षाचालकाने प्रवाशाला धमकावून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला, तर पुणे स्टेशन परिसरात एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपयांची सोनसाखळी चोरीला गेली. पहिल्या घटनेत, २० जून रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. ओदिशा येथील मूळ रहिवासी असलेला एक तरुण अहिल्यानगरहून एसटी बसने वाकडेवाडीतील एसटी स्थानकावर उतरला. तेथून तो रिक्षाने पुणे रेल्वे स्थानकाकडे जात असताना, रिक्षाचालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी त्याला धमकावले. रिक्षा थांबवून त्यांनी तरुणाकडील सोनसाखळी, रोकड आणि मोबाईल असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात रिक्षाचालकासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत, पुणे स्टेशन परिसरात एका ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली. कात्रज येथे राहणाऱ्या या महिलेने पुणे पोलीस आयुक्त कार्यालय ते ससून रुग्णालय दरम्यान रिक्षाने प्रवास करत असताना ही घटना घडली. रिक्षात इतर प्रवासी असतानाच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून नेली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे पुढील तपास करत आहेत. सदर घटनेमुळे पुणे शहरातील रीक्षा प्रवास हा असुरक्षित असल्याची भावना बनू लागली आहे ही बाब चिंताजनक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *