Headlines

पारडा शिवारातील दुहेरी खून प्रकरण:बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, तीन संशयीतांची चौकशी; गुन्हे शाखेकडून समांतर तपास




हिंगोली तालुक्यातील पारडा शिवारातील दुहेरी खून प्रकरणात बासंबा पोलिस ठाण्यात रविवारी ता. २१ अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बासंबा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत आहेत. याप्रकरणात पोलिसांनी तीन संशयीतांची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली तालु्क्यातील पारडा शिवारातील शेतात बळीराम देवबा वाघमारे (65) व कलावतीबाई बळीराम वाघमारे (60) यांचे मृतदेह शनिवारी ता. १९ आढळून आले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दोन्ही मृतदेहावर आज उत्तरीय तपासणी झाल्यानंतर दोघांच्याही शरीरावर शस्त्राने वार करून त्यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी अनिल वाघमारे यांनी आज बासंबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांनी पाहणी करून आवश्‍यक त्या सूचना दिल्या आहेत. बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक संदीप जमादार, उपनिरीक्षक मदन गव्हाणे यानी तपास सुरु केला आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक माधव जिव्हारे, दिलीप मोरे यांच्या पथकानेही समांतर तपास सुरु केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयीतांची चौकशी सुरु केली आहे. या शिवाय मयतांच्या नातेवाईकांकडून माहिती घेण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरु केले आहे. पुढील दोन काही दिवसांतच या खून प्रकरणाचा गुंता सुटेल असा दावा पोलिसांनी केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *