Headlines

पत्नी नांदत नसल्यामुळे पतीचा टॉवरवर ठिय्या:लोह्यात पत्नीने व्हिडिओ कॉल केल्यावर उतरला खाली‎

पत्नीला सासरी नांदायला येत नसल्याने ४० वर्षीय मूकबधीर पतीने चक्क मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन केले. पत्नीचा फोटो असलेले बॅनर टॉवरवर झळकवत त्याने चार तास टॉवरवर ठिय्या मांडला. अखेर पत्नीने टॉवरजवळ येऊन व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी संवाद साधल्यानंतर पोलिसांनी त्याला खाली उतरवले. सोमवारी (७ सप्टेंबर) सकाळी लोहा बसस्थानकाच्या मागील परिसरात ही घटना घडली. लोहा शहरातील अफिया गफार…

Read More

खामगाव:वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

x शासनाची कोणतीही परवानगी न घेता वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर-ट्रॉलीवर वडोदबाजार पोलिसांनी कारवाई केली. दोन ट्रॅक्टर-ट्रॉलीसह १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांत दहशत निर्माण झाली. पहिली कारवाई ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता बाबरा, ता. फुलंब्री येथे झाली. वाळू वाहतूक करणाऱ्या…

Read More

कन्नड तालुक्यात पोळा सणावर दुष्काळाचे सावट:आठवडी बाजारात साज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा हात आखडता‎

कन्नड तालुक्यात महिनाभर पावसाने खंड दिल्याने खरीप पिक धोक्यात आले आहे. या दुष्काळाचे सावट पोळा सणावर पडल्याने आठवडी बाजारात बैल साज खरेदीत शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला. कन्नड येथे सोमवारी आठवडी बाजार भरतो. पोळा सणाच्या पूर्वीच्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांत निरूत्साह दिसून आला. सातकुंड येथील बैल साज विक्रीसाठी आलेले एकनाथ सिताराम चव्हाण यांनी सांगितले की, दरवर्षी पोळा…

Read More

चालत्या दुचाकीवरून चोरांनी महिलेचे गंठण हिसकावून नेले:पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल

गजबजलेल्या भागात दोन दुचाकीस्वारांनी चालत्या गाडीवरून शिक्षिकेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी प्रियांका मुकेश चुडीवाल (४०, रा. अयोध्यानगर) त्यांच्या नणंदेला भेटण्यासाठी त्यांच्या स्कूटीवरून निघाल्या होत्या. रिलायन्स मॉलसमोरून जात असताना, मागून एका जुन्या दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण आले. त्यांनी प्रियांका यांच्या स्कूटीजवळ गाडी…

Read More

भविष्यात सरकारी नोकऱ्यांची मोठी भरती कठीण, तरुणांनी स्वयंरोजगाराकडे वळावे:'दिव्य मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत लोढा यांचा तरुणांना कानमंत्र

राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तरुणांना सरकारी नोकऱ्यांच्या मर्यादा ओळखून खाजगी नोकरी आणि स्वयंरोजगाराकडे वळण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. आपल्या व्यावसायिक वाटचालीतील ‘टर्निंग पॉईंट’ उलगडताना त्यांनी भारतामध्ये ब्लू कॉलर जॉब्स परदेशाप्रमाणे सन्मान मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. राज्य सरकारमध्ये आधीच १२ ते १५ लाख कर्मचारी कार्यरत असल्याने भविष्यात सरकारी नोकऱ्यांची मोठी भरती येण्याची शक्यता…

Read More

Rohit Pawar Questions MPSC Chairman Vivek Bhimanwar Over Paper Leak Row

नीट परीक्षेचा पेपरफुटी प्रकरण ताजे असतानाच एमपीएससीच्या पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. त्यानंतर राज्यात विद्यार्थ्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. आज पुण्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी मोर्चा काढला. सरकार . रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, ‘वस्तूस्थिती स्पष्ट करुनही सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप होत असल्याने व्यथित असल्याची’ आपली…

Read More

धार्मिक उत्सवांचे पावित्र्य जपत ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण गरजेचे:रोहित टिळक यांचे मत, सामाजिक एकोपा आणि शांतता महत्त्वाची

धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव समाजाला एकत्र आणणारे महत्त्वाचे माध्यम आहेत. यातून सामाजिक एकोपा आणि परस्परांना मदत करण्याची भावना वाढते. त्यामुळे हे उत्सव उत्साहात साजरे व्हावेत, पण त्यांचे पावित्र्य आणि नागरिकांची शांतता जपली जावी, असे मत लोकमान्य टिळक यांचे खापर पणतू रोहित टिळक यांनी व्यक्त केले. धार्मिक उत्सवांमुळे माणसाला मानसिक आधार आणि एक प्रकारचे सामाजिक कवच…

Read More

महावितरणचा लाईनमन लाच घेताना रंगेहाथ पकडला:5,170 रुपयांचे मिटर लावण्यासाठी 8,500 रुपयांची लाच मागितली; नागपूर एसीबीची कारवाई

नागपूर एसीबीने महावितरणच्या एका कंत्राटी लाईनमनला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ५,१७० रुपयांचे थकलेले वीजबिल न भरल्यामुळे काढून नेलेले दुकानाचे वीज मिटर परत लावण्यासाठी त्याने ८,५०० रुपयांची लाच मागितली होती. मुकेश चिंतामण मस्के (वय ३६, रा. वार्ड नं. ४, डब्ल्युसीएल रोड, सावनेर) असे पकडण्यात आलेल्या लाईनमनचे नाव आहे. तो सावनेर येथील उप कार्यकारी अभियंता कार्यालयात…

Read More

विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी वसतिगृह रेक्टरला अटक:प्राचार्यांसह पाच जणांवर गुन्हा; अन्य संशयितांची चौकशी होणार

सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वसतिगृहातील १९ वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणात वसतिगृहाच्या रेक्टर जयश्री जकाते यांना पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. सोमवारी सायंकाळी त्यांना सातारा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत मुलीच्या…

Read More

MPSC Chairman Vivek Bhimanwar Challenges Paper Leak Allegations

नीट परीक्षेचा पेपरफुटी प्रकरण ताजे असतानाच एमपीएससीच्या पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. त्यानंतर राज्यात विद्यार्थ्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. आज पुण्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी मोर्चा काढला. सरकार . विवेक भीमनवार म्हणाले, एमपीएससी पेपरफुटीच्या प्रकरणात सातत्याने अनुचित आरोप माझ्याविरोधात केले जात आहेत. यासंदर्भात दि. 2 सप्टेंबर 2026 रोजी स्वयंस्पष्ट निवेदन जारी करण्यात…

Read More