Headlines

Supriya Sule Slams Maharashtra Government Over Farmer & MPSC Crisis

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. एसटी महामंडळातील मनुष्यबळाचा प्रश्न, राज्यातील असमान पावसाची स्थिती, शेतकऱ्यांना हमीभाव न मिळणे, कर्जमाफी, ऊस उत्पादक शेतक . 700 बस असूनही मनुष्यबळ नाही, मग 2000 बस आणून काय करणार? एसटी महामंडळाच्या बससेवेचा मुद्दा उपस्थित करताना सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या नियोजनावर…

Read More

Shweta Mahale vs Sanjay Gaikwad Clash

बुलढाण्यात महायुतीतील अंतर्गत राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भाजप आमदार श्वेता महाले आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यातील शाब्दिक वाद आता अधिक तीव्र झाला असून, दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली जात आहे. श्वेता महाले . ‘बाप तो बाप रहेगा’वरून गायकवाडांचा पलटवार विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात मोठी रॅली काढण्यात आली होती. या…

Read More

एमपीएससी पेपरफुटीवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल:राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरही सरकारवर टीकास्त्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) भोंगळ कारभारावरून सरकारवर जोरदार टीका केली. एक्साइज विभागासह विविध परीक्षांमधील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला घेरले. पवार म्हणाले की, आरटीओ आयुक्त असताना गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्याकडे एमपीएससीचे अध्यक्षपद दिले आहे. एक्साइज विभागाच्या पदोन्नती परीक्षेत मार्किंग पॅटर्न आणि प्रश्नपत्रिका फोडून पैशांच्या बदल्यात बदल्या…

Read More

संजय दत्त म्हणाला, 6 वर्षे तुरुंगात राहूनही मराठी शिकलो नाही…:शिवसेनेचे मंत्री हसले, भाजप आमदार म्हणाले- रिक्षावाल्यांवर दबाव का?

महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने मराठीत बोलण्यास नकार दिला. रविवारी मुंबईत आयोजित दहीहंडी कार्यक्रमात तो म्हणाला, ‘मी ६ वर्षे येरवडा तुरुंगात राहिलो, तरीही मराठी भाषा शिकू शकलो नाही.’ यावर शिवसेना नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हसले. हा कार्यक्रम ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) नेते सरनाईक यांनीच आयोजित केला…

Read More

महाराष्ट्रात पावसाला ब्रेक!:पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता कमी, मराठवाड्यात दुष्काळाची छाया

महाराष्ट्रात यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण चढ-उताराचे राहिले आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैमध्ये राज्याच्या अनेक भागांत दमदार पाऊस झाला आणि धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली. मात्र, ऑगस्टमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. आता सप्टेंबरमध्येही पावसाची सरासरी कमी राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील मान्सूनचे वारे सध्या कमजोर झाले आहेत. वातावरणातील आर्द्रता…

Read More

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 11वा दिवस:मध्यरात्री प्रकृती खालावली, अडीच वाजता मंत्र्यांचा फोन; मराठा आंदोलक आक्रमक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 11वा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यानंतर मागण्यांबाबत आश्वासन मिळाले होते. मात्र, त्यानंतर ठोस कार्यवाही होत नसल्याने जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी पाणी आणि उपचार घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित मराठा समाजबांधवांमध्ये त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. मध्यरात्री प्रकृती खालावली दरम्यान, काल रात्री मध्यरात्री…

Read More

पावसाअभावी खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा:वंचित बहुजन आघाडीतर्फे एसडीओंना निवेदन‎

दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिक आर्थिक कचाट्यात सापडले असून नागरिकांच्या हितासाठी खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी उपविभागीय अधिकारी यांना मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. अत्यल्प पावसामुळे खामगाव तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी स्थानिक पातळीवर…

Read More

पारंपरिक ढोल-ताशांवर शिवभक्तांनी धरला ठेका:कावड-पालखी मिरवणुकीत तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग‎

कावड मिरवणुकीत डीजे सोबतच पारंपरिक ढोल-ताशा पथकांचे वादनही विशेष आकर्षण ठरले. ढोलाच्या ठेक्यासोबत तरुणाईने कावड उत्सवाचा जल्लोष साजरा केला. प्रशासनानेही डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांसाठी आवाहन केले होते. या आवाहनाला काही मंडळांकडून प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले. शहरातील शिवभक्त मंडळांकडून आकर्षक पालख्या आणि भव्य कावडी शिस्तीत मार्गस्थ केल्या जातात. कावड खांद्यावर घेतलेले शिवभक्त, भगवे झेंडे,…

Read More

घृष्णेश्वरचरणी 70 हजार भाविक:श्रावणी सोमवार गर्दी असली तरी व्यवस्थापनाचे नियोजन यशस्वी, सर्व भाविकांना समान रांगेतूनच दर्शन‎

शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग असलेल्या श्रीक्षेत्र वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच ‘हर हर महादेव’च्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमला होता. या वेळी पोलिस आणि देवस्थान ट्रस्टकडून कडेकोट नियोजन करण्यात आले होते. ७० हजार भाविकांनी दर्शन घेतले. मंदिर विश्वस्तांनी दिलेल्या माहितीनुसार भाविकांची आकडेवारी अशी होती : पहिला…

Read More

घाटनांद्रा:इंद्रगढी शाळेत विद्यार्थिनींना अध्यापनाचा अनुभव

घाटनांद्रा येथील इंद्रगढी प्राथमिक शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षकांची भूमिका साकारत विविध विषयांचे अध्यापन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक भरत सुपेकर आणि विद्यार्थिनींमधुन मुख्याध्यापिका व उपमुख्याध्यापिकेची भूमिका साकारणाऱ्या कार्तिकी पाटील व पुनम मोरे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले….

Read More