Headlines

गोंदियात भरधाव ट्रकची पिकअपला धडक:मध्य प्रदेशातील 6 मजूर ठार, 7 गंभीर जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव ट्रकने (एमएच ३५ एजे २५४७) समोरून येणाऱ्या मजुरांच्या पिकअपला ( एमपी १५ टी ३४९५) धडक दिली. यात ३ वर्षांच्या बालकासह ६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर ७ गंभीर जखमी झाले. गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा-मोहरानटोली येथे सोमवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. सर्व मजूर मध्य प्रदेशातील बालाघाटचे रहिवासी असून, तेलंगणातील हैदराबाद…

Read More

युद्धामुळे इस्रायलमध्ये संधी, शासनाचा रोजगारासाठी पुढाकार:सरकारी नोकऱ्यांवर मर्यादा, स्वयंरोजगार हेच भविष्य- मंत्री मंगलप्रभात लोढा

होर्मुझ खाडीत तणावामुळे इस्रायलमध्ये नोकऱ्यांचा खड्डा पडला आहे. तेथे राज्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून शासन प्रयत्न करीत असल्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. रोजगार मेळावे केवळ दिखाव्यासाठी होऊ नयेत तर त्यातून तरुण नोकऱ्यांमध्ये टिकावेत यासाठी या वेळी नियुक्त्यांपूर्वी व नंतर खास प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. ‘दिव्य मराठी’…

Read More

पेमेंट्सच्या पलीकडे जाऊन वित्तीय सेवांचा विस्तार करा- PM मोदी:मुंबईतील 'ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026'चे उद्घाटन

भारताची फिनटेक क्षेत्रातील वाटचाल उल्लेखनीय असून, आता पेमेंट्सच्या पलीकडे जाऊन क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन यांसारख्या वित्तीय सेवांचा विस्तार करण्याची गरज आहे. डिजिटल इंडियाच्या यशोगाथेचा पुढील अध्याय आता फिनटेक क्षेत्रातील नव्या पिढीच्या नवोन्मेषावर आधारित असेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. बीकेसी मुंबई येथे आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ च्या उद्घाटन प्रसंगी ते…

Read More

ड्रॅगन पेटला अन् सातारा शहरात राजवाडा परिसरात उडाली पळापळ!:सह्याद्रीचा राजा मित्र मंडळाच्या श्री आगमन मिरवणुकीत थरार

श्री आगमनाच्या जल्लोषासाठी सज्ज झालेल्या सातारा शहरातील राजवाडा परिसरात मंगळवारी सायंकाळी अचानक आगीचा भडका उडाल्याने एकच खळबळ उडाली. सह्याद्रीचा राजा मित्र मंडळाच्या श्री आगमन मिरवणुकीसाठी उभारण्यात आलेल्या भव्य ड्रॅगनच्या प्रतिकृतीला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने लगतच्या आणखी एका प्रतिकृतीला कवेत घेतल्याने घटनास्थळी अक्षरशः धावपळ उडाली. या दुर्घटनेत मंडळाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर ठेवलेला जनरेटर जळून खाक…

Read More

राज्य नाट्य स्पर्धेत आता बाहेरच्या कलावंतांना जिल्हाबंदी:स्थानिक हौशी कलाकारांना मिळणार अधिक संधी, नियमावलीत महत्त्वाचे बदल

आता एका जिल्ह्यातील हौशी कलावंत दुसऱ्या जिल्ह्यातील नाट्य संस्थेमार्फत अभिनयाचे सादरीकरण करू शकणार नाही. ही जुनी पद्धत बंद व्हावी, अशी अनेक कलावंत आणि नाट्य संस्थांची इच्छा होती. स्थानिक संस्था अधिक मजबूत व्हाव्यात आणि हौशी कलावंतांना स्थानिक पातळीवरच संधी मिळावी, हा यामागचा मुख्य उद्देश होता. महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवांतर्गत हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य तसेच…

Read More

डफरीन अहवाल, पिकांचे पंचनामे आणि गुन्हेगारीवर कारवाईची मागणी:काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत वाघिणीच्या हल्ल्यांची चौकशीचीही मागणी केली

जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर स्फोटाचा चौकशी अहवाल लगेच जाहीर करून दोषींवर कडक कारवाई करावी, पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच वाघिणीच्या हल्ल्यांची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारी ठरवावी, अशा अनेक मागण्यांसाठी काँग्रेसने आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी निदर्शने आणि घोषणाबाजी केल्यानंतर जिल्हाधिकारी आशिष येरेकर…

Read More

बांधकाम विभागातील पेन्शन प्रकरण जागेवरच निकाली:अमरावती जिल्हा परिषदेच्या पहिल्याच अदालतीत चार पेन्शन, दोन सेवाविषयक तक्रारी मिळाल्या

अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या संकल्पनेतून मंगळवारी पहिली पेन्शन अदालत घेण्यात आली. या अदालतीत पेन्शनसंबंधी चार आणि सेवाविषयक दोन तक्रारी मिळाल्या. यापैकी बांधकाम विभागातील एक पेन्शन प्रकरण जागेवरच निकाली काढण्यात आले. या प्रकरणात संबंधित पेन्शनधारकाला तत्काळ पेन्शन मंजुरीचा आदेश देण्यात आला. तसेच, बांधकाम विभागातील आणखी एका पेन्शन प्रकरणाचा निपटारा उद्यापर्यंत करण्याच्या…

Read More

'मराठा आरक्षणावर दोन दिवसांत ठोस तोडगा काढा':शशिकांत शिंदे यांची मागणी; सरकारच्या अंतर्गत स्पर्धेमुळेच आश्वासने हवेत विरल्याचा घणाघात

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापत असताना सरकारने विलंब न करता येत्या दोन दिवसांत त्यावर ठोस तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी येथे केली. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर आणि अंतर्गत मतभेदांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ‘अंतर्गत स्पर्धेमुळेच आश्वासने हवेत’ मुख्यमंत्री मराठा आणि…

Read More

गणेशभक्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा!:कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी, कसा मिळवाल फ्री पास? वाचा सविस्तर

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाखो गणेशभक्तांना मोठा दिलासा दिला आहे. यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व एसटी बस आणि खासगी वाहनांना टोल पूर्णपणे माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. याशिवाय, मुंबई-बंगळुरू महामार्गावरून प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांनाही या टोल माफीचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या निर्णयाची अधिकृत माहिती दिली आहे….

Read More

महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी गजेंद्र बावणे रुजू:IAS पदोन्नतीनंतर छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाची धुरा

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे गजेंद्र चिंतामण बावणे यांनी मंगळवारी (8 सप्टेंबर) स्वीकारली. प्रशासकीय सेवेत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर आता त्यांची महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे. मूळचे नागपूर येथील रहिवासी असलेले गजेंद्र बावणे यांनी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून एम.एस्सी. (ॲग्री) पदवी प्राप्त केली आहे. 1999 मध्ये राज्य…

Read More