राजयोगाने जीवनाचा आंतरिक शृंगार करा- निशादीदी:नवचैतन्य येण्यासाठी गोकुळाष्टमीला आई आपल्या मुलाला श्रीकृष्णाप्रमाणे सजवते
श्रीकृष्ण सत्य युगातील महाराजकुमार होते. सत्ययुगात आपण सर्वजण सर्वगुणसंपन्न, मर्यादा पुरुषोत्तम देवी-देवता होतो. आज परमपिता परमात्मा शिव निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूपात या सृष्टीवर दिव्य अवतरण करून ज्ञानमुरलीद्वारे मानवाला मार्गदर्शन करीत आहेत. या ज्ञानामुळे बुद्धी, दिव्य गुण, दिव्य शक्ती आणि श्रेष्ठ संस्कारांचा आंतरिक शृंगार होत आहे. त्यामुळे जीवन चारित्र्यसंपन्न बनते. आंतरिक शृंगार अविनाशी, तर बाह्य शृंगार विनाशी…