Headlines

पिज्झा हटमध्ये व्हेज-नॉनव्हेजसाठी एकच ओव्हन:तर शेळके मामा ढाब्यावर सरमिसळए एफडीएची कारवाई; दोन्ही आस्थापनांचा परवाना केला निलंबित

‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत वाळूज एमआयडीसीतील प्रसिद्ध पिझ्झा हट (मे. सॅफायर फूड्स इंडिया लि.) आणि खुलताबादेतील शेळके मामा ढाबा रेस्टॉरंटचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी हे आदेश जारी केले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी प्र. कुचेकर यांनी नोटीस देऊनही त्रुटी…

Read More

ब्रिटनच्या संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव:‘लाडकी बहीण’ ‘शासन आपल्या दारी’ योजनेची दखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्रिटनच्या संसदेतील हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या ऐतिहासिक सभागृहात त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्कार- जय महाराष्ट्र’ अशी करत मराठीचा गजर केला. हा बहुमान त्यांना नागरिक-केंद्री आणि पारदर्शक प्रशासनासाठी, विशेषतः ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘शासन आपल्या दारी’ या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी देण्यात…

Read More

पार्थ पवारांना मुंढवा जमीन घोटाळ्यात आरोपी का केले नाही?-उच्च न्यायालय:डीजीपींसह तपास अधिकाऱ्यांना नोटीस, पुढील सुनावणी 28 सप्टेंबरला होणार

पुण्यातील मुंढवा येथील ४० एकर शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा सदस्य पार्थ पवारांच्या भूमिकेबाबत मुंबई हायकोर्टाने राज्य पोलिसांना धारेवर धरले. संबंधित कंपनीत भागीदार असतानाही पवार यांना या प्रकरणात अद्याप आरोपी का केले नाही, असा रोखठोक सवाल उपस्थित केला. याप्रकरणी पोलिस महासंचालक आणि तपास अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देत न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी…

Read More

मराठी चित्रपटसृष्टीसाठी फडणवीसांची मोठी घोषणा:अधिक चित्रपटगृहे उपलब्ध करणार, आधुनिक चित्रनगरीही उभारणार

मराठी चित्रपटसृष्टीला अधिक बळ देण्यासाठी राज्यात मराठी चित्रपटांना अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी राज्य शासनाने आराखडा तयार केला असून तो लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान, सुविधा आणि विविध प्रकारचे सेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली आधुनिक चित्रनगरी विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न…

Read More

शेतीविषयक तंटे आता महसूल लोक अदालतीतून सुटणार:प्रलंबित दावे तडजोडीने मिटवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

राज्य सरकारच्या महसूल विभागाने १ सप्टेंबर ते ३१ मार्च २०२७ या काळात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले जमिनीशी संबंधित दावे आपापसांतील सहमतीने कायमस्वरूपी निकाली काढले जातील. या अभियानाचा लाभ घेऊन प्रलंबित महसुली दावे तडजोडीने मिटवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे….

Read More

खासगी शिकवणी कायद्याला घाईघाईने मंजुरी नको:हरकतींसाठी 60 दिवसांची मुदतवाढ द्या, विद्यार्थी-पालकांना विश्वासात घ्या: एआयएसएफची मागणी

राज्य सरकारने ‘महाराष्ट्र खासगी शिकवणी वर्ग (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६’ चा मसुदा तयार केला आहे. यावर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत. मात्र, या कायद्याच्या मसुद्यावर सविस्तर अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील संघटनांना पुरेसा वेळ मिळावा, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने (एआयएसएफ) केली आहे. हरकती नोंदवण्यासाठी किमान ६० दिवसांची मुदतवाढ…

Read More

डीजे, लेझर लाईट नियमांचे पालन करा:'आम्ही अमरावतीचे लोक' संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले

अमरावती येथील लोकशाही-संविधानवादी जनसंघटना समन्वय मंचने बुधवारी, 9 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन दिले. डीजे आणि लेझर लाईटच्या वापराबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सभा, मिरवणुका, शोभायात्रा आणि लग्न समारंभांमध्ये डॉल्बी-डीजेचा मोठा आवाज आणि लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या…

Read More

लंडनमध्ये पुन्हा विद्यार्थी बनले खासदार श्रीकांत शिंदे:बाबासाहेबांच्या आठवणींनी अनुभवला खास क्षण

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उच्च शिक्षणासाठी लंडनमधील प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये (LSE) प्रवेश घेतला आहे. त्यांनी TRIUM ग्लोबल MBA प्रोग्रामच्या पहिल्या मॉड्यूलला सुरुवात केल्याची माहिती सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली आहे. वैद्यकीय क्षेत्रात ऑर्थोपेडिक्समध्ये एमएस पदवी घेतल्यानंतर डॉ. श्रीकांत शिंदे आता व्यवस्थापन आणि आर्थिक धोरणांचा…

Read More

संघाच्या कार्यालयावरील मोर्चा सरकार सहन करणार नाही:काँग्रेसच्या आंदोलनावरून बावनकुळे संतापले, म्हणाले- हिंमत असेल तर भाजप कार्यालयावर मोर्चा काढा

काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची भूमिका घेतल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राष्ट्र उभारणी आणि देशाच्या अखंडतेसाठी निस्वार्थपणे काम करणारी संघटना आहे. अशा संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढणे सरकार कदापि सहन करणार…

Read More

जबलपूरचा ‘रोव्हर’ डायलिसिसच्या उंबरठ्यावरून पुण्यात वाचला:किडनीतील खडे आरआयआरएसने काढले; मोठी शस्त्रक्रिया टळली, क्रिएटिनिन 13.79 वरून 2.0 वर आले.

किडनी खराब होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेला जबलपूरचा सात वर्षीय जर्मन शेफर्ड ‘रोव्हर’ पुण्यातील अत्याधुनिक पशुवैद्यकीय उपचारांमुळे पुन्हा आपल्या कुटुंबात परतला. किडनीची कार्यक्षमता वेगाने कमी होत असल्याने त्याला डायलिसिससाठी पुण्यात आणण्यात आले होते. मात्र, केवळ डायलिसिसवर भर न देता आजाराचे मूळ कारण शोधले. तपासणीत किडनी आणि मूत्राशयातील खडे हे किडनी खराब होण्यामागील प्रमुख कारण समोर आले. त्यानंतर…

Read More