Headlines

दिव्य मराठी मुलाखत:प्रश्न पक्षांतराचा निर्णय का?, निष्ठा आहे पण लाेकांची कामे करता येत नसतील तर काय उपयाेग?- ओमराजे

समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील, तर लोकांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता दुसरा पर्यायच उरत नाही, अशा शब्दांत उद्धवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याबाबत आपली परखड भूमिका मांडली. उद्धवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओमराजे यांनी…

Read More

‘आपला दवाखाना’ साठी 48.57 कोटींचा निधी:तब्बल 105 प्रकारची औषधे मिळणार मोफत

राज्यातील सर्वसामान्य आणि प्रामुख्याने झोपडपट्ट्या व गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी राज्य सरकारने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत औषध खरेदीसाठी तब्बल ४८ कोटी ५७ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून तब्बल १०५ प्रकारच्या जीवनावश्यक औषधांची खरेदी केली…

Read More

दिव्य मराठी ब्रेकिंग‎:भाेंदू अशाेक खरातला ईडीचा दुसरा धक्का; शिर्डी, कोपरगाव, संगमनेरमध्ये छापेमारी, बड्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले

भोंदू अशोक खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने गुरुवारी सकाळी ७ वाजता शिर्डी, कोपरगाव आणि संगमनेरमध्ये एकाच वेळी छापे टाकले. खरातच्या काळ्या पैशांचे साम्राज्य सांभाळणाऱ्या भक्तांवर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील बड्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. जानेवारीत शिर्डीतील महिला भक्ताने खरातच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यावर अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत खंडणी मागितल्याची तक्रार…

Read More

नागपूर धर्मांतर प्रकरण:फरार मौलानाला अटक, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली

नागपूर येथील धर्मांतर प्रकरणात फरार असलेला तिसरा मुख्य आरोपी मौलाना मेहमुद मकसद याला अटक करण्यात आली आहे. हवाई दलातील जवानाच्या पत्नीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पीडितेचा बळजबरीने निकाह लावून देण्याचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सोनेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांनी दिली. या गुन्ह्याची…

Read More

नागपुरात 8 ड्रग्ज तस्करांवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई:शहर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीचे कंबरडे मोडले

नागपूर शहर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आंतरजिल्हा ड्रग्ज तस्कर टोळीवर ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत टोळीचा प्रमुख सतीश सुभाष वडे याच्यासह एकूण आठ तस्करांचा समावेश आहे. या टोळीवर अंमली पदार्थांची बेकायदेशीर खरेदी-विक्री, वाहतूक आणि वितरण केल्याचा आरोप…

Read More

अमरावतीत देवस्थान भूमी संरक्षण परिषद संपन्न:मंदिर सरकारीकरण, वक्फ बोर्ड अतिक्रमणाविरोधात लढा तीव्र करण्याचा निर्धार

अमरावती येथे ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदे’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. मंदिरांवरील आघात रोखणे, मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे आणि देवस्थानांच्या जमिनी वाचवणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजापेठ येथील श्री रामदेवजी बाबा मंदिर सभागृहात ही परिषद पार पडली. या परिषदेला विदर्भातील १५० हून अधिक प्रमुख…

Read More

मोर्शीतील अर्धवट पुलासाठी काँग्रेसचा 'करो या मरो' इशारा:पाच दिवसांत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा प्रशासनाला इशारा

मोर्शी येथील नळा नदीवरील अर्धवट पुलाचे बांधकाम येत्या पाच ते सात दिवसांत सुरू न झाल्यास ‘करो या मरो’ आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसचे मोर्शी-वरुड विधानसभा प्रमुख श्रणित राऊत यांनी यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत प्रशासनाला आंदोलनाची पूर्वकल्पना दिली आहे. नांदगाव पेठ ते पांढुर्णा या रस्त्याचे बांधकाम चार ते पाच वर्षांपासून पूर्ण झाले…

Read More

तिवस्यात काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा मतदानावर बहिष्कार:विधानपरिषद निवडणुकीत पक्षादेश पाळत शिर्डीत दाखल

तिवसा नगरपंचायतीच्या १२ काँग्रेस नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. पक्षाच्या आदेशाचे पालन करत हे नगरसेवक रातोरात शिर्डीला रवाना झाले होते. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, १५ पैकी उर्वरित तीन नगरसेवकांनी मात्र मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेस पक्षाचे उमेदवार हर्षदीप देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मतदारसंघात पाय ठेवला नाही. त्यांच्या आजारपणामुळे…

Read More

मेळघाट जंगल सफारीला 15 दिवसांची मुदतवाढ:आता 1 जुलैपासून होणार बंद, सप्टेंबरअखेरपर्यंत राहणार स्थगित

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ही सफारी १५ जूनपासून बंद होणार होती, परंतु आता तिला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक आता ३० जूनपर्यंत सफारीचा लाभ घेऊ शकतील. मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, मेळघाटमधील जंगल सफारी आता १ जुलैपासून बंद केली जाईल. संभाव्य…

Read More

'तुकाराम मुंढे पॅटर्न'चा धसका!:सेनगावमध्ये 'एफडीए'ची धाड पडताच व्यापाऱ्यांनी दुकाने केली बंद; अधिकारी रिकाम्या हाताने परतले

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे खाद्यपदार्थाचे नमुने घेण्यासाठी आलेले अन्न व आवश्यक प्रशासनाचे अधिकारी गुरुवारी ता १८ दाखल झाले. मात्र एकही नमुना न घेता अधिकाऱ्याचे पथक रिकाम्या हाताने परत गेले आहे. या प्रकाराची सेनगावमध्ये चांगली चर्चा सुरू होती. राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या अन्न व औषध प्रशासनाचे…

Read More