Headlines

नाशिक TCS धर्मांतर प्रकरण:फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात; दानिशच्या मोबाईलमधून संशयास्पद फोटो SIT च्या हाती

नाशिक येथील TCS मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास आता अधिक सखोल झाला असून, यातील मुख्य संशयित आणि सध्या फरार असलेली निदा खान ही अटकेत असलेल्या इतर आरोपींच्या सतत संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष तपास पथकाने केलेल्या तांत्रिक विश्लेषणामध्ये ही बाब निष्पन्न झाली असून, यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणि गुंतागुंत अधिकच वाढली आहे….

Read More

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच उपक्रमशील व्हावे:प्रा. सुनील कल्हापूरे, डॉ. विखे पाटील अभियांत्रिकीत कॉग्नोत्सव 2026 उत्साहात‎

स्पर्धेच्या युगात आज प्रत्येक अभियांत्रिकी महावि‌द्यालयीन विद्यार्थ्यांनी तांत्रिक अभ्यासासोबतच विविध अभ्यासक्रम आणि अभ्यासेतर उपक्रमांचा देखील अनुभव घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन फाउंडेशनचे तांत्रिक संचालक प्रा. सुनील कल्हापुरे यांनी केले. वि . या दोन दिवसीय महोत्सवामध्ये टेक केबिसी, युटोपिया (हॅकेथॉन) टेक ट्रेझर हंट, टेक एक्सलरेट, स्क्विड गेम, रणभूमी, रंगमंच या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या…

Read More

शहर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; चार पकडले:शस्त्रे आणि दारू जप्त, मध्यरात्री केली कारवाई‎

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी रात्री आकस्मिकपणे ‘कोंबिंग ऑपरेशन’ आणि नाकाबंदी राबविण्यात आली. या मोहिमेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोम्बिंग ऑपरेशन शुक्रवारी रात्री दहा वाजता सुरू करण्यात आले. ते शनिवारी पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू होती. शहरातील ८ पोलीस…

Read More

रांगोळी, निबंध स्पर्धा अन् गटसभा रॅलीतून हिवतापाबाबत जनजागृती:डासांची अळी, गप्पी मासे याची प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांना माहिती‎

जागतिक हिवताप दिनानिमित्त अकोला जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून हिवतापाबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्ह्यात प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्ध . रॅलीची सुरुवात नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ येथून हरिहर पेठ मुख्य चौकात समारोप केला आहे. कार्यक्रमात हरिहर पेठ येथील आरोग्य निरीक्षक अनिल गिरी, कर्मचारी…

Read More

कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण; बँक अधिकाऱ्यांचा गौरव:जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती, इतरांनी यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे केले आवाहन

गाव पातळीवर उद्योग उभारताना आवश्यक असलेला पतपुरवठा बँकांनी करावा. यामुळे गावातही चांगले प्रक्रिया उद्योग उभे राहण्यास मदत मिळेल, असे सांगण्यात आले. उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचा आज, शनिवारी गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग यामध्ये कर्जमंजुरीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते….

Read More

श्रीरामपुरात "नारी शक्ती'चा जागर; विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव:जिद्दीने संघर्ष करणाऱ्या महिला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित‎

महिला सन्मान होणे काळजी गरज आहे. स्त्री-पुरुष भेदभाव न करता पुरुषांच्या बरोबरीने कार्य करणाऱ्या प्रत्येक महिलेचा सन्मान अपेक्षित असल्याचे मत आमदार हेमंत ओगले यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर नगरपरिषद आयोजित सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमामध्ये आमदार ओगले बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजश्री ससाणे होत्या तर प्रमुख उपस्थिती सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांची होती. नगराध्यक्ष करण…

Read More

वेरूळला जगद्गुरू जनशांती धर्म‎सोहळ्यात 42 क्विंटल महाप्रसाद‎:108 कुंडी यज्ञासाठी हजारो भाविकांची उपस्थिती

वेरूळ खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे शनिवार (२५ एप्रिल) रोजी अक्षय्य तृतीयेच्या पावन मुहूर्तावर १८ एप्रिलपासून सुरू असलेल्या ‘ॐ जगद्गुरू जनशांती धर्म सोहळ्या’ची शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यावेळी भाविकांसाठी ४२ क्विंटल महाप्रसाद तयार करण्यात आला होता. ब्रह्मलीन जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

लेणी-घृष्णेश्वर मंदिर मार्गावर वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची सुटका होणार:चौपदरी वेरूळ बायपासच्या कामाला सुरुवात; 6 महिन्यांत होणार पूर्ण रस्ता

वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात वर्षानुवर्षे भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना हैराण करणारी वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. वेरूळ घाटातून १.६५ किलोमीटर लांबीच्या चौपदरी बायपासचे काम सुरू झाले असून, ते पुढील ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आ . वेरूळ लेणी हे जागतिक वारसास्थळ, तर घृष्णेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने येथे वर्षभर देश-विदेशातील…

Read More

देशातील सर्वात 15 उष्ण शहरांत महाराष्ट्रातील तीन:अकोला, अमरावती 45.6 वर, पाच दिवसांनी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता

महाराष्ट्रात उष्णतेचा भडका उडाला आहे. 25 एप्रिल रोजी राज्यातील 15 शहरांचे तापमान 41 अंश सेल्सियसवर गेले. अकोला, अमरावतीत 45.3, तर वर्ध्यात 45.5 अंश तापमान होते. देशातील 15 सर्वात उष्ण शहरांमध्ये अकोला, अमरावती, वर्धा आहेत. छत्रपती संभाजीनगरात या मोसमातील सर्वाधिक 41.8 अंश तापमानाची नोंद झाली. 5 दिवसांनी मराठवाड्यासह, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 2025च्या तुलनेत…

Read More

नदीजोड प्रकल्पामधून राज्य दुष्काळमुक्त करू- मुख्यमंत्री:नाशिकला ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गोदामाता सतत प्रवाहित, बारमाही करण्यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न केले जात असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या…

Read More