![]()
जागतिक हिवताप दिनानिमित्त अकोला जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून हिवतापाबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्ह्यात प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्ध
.
रॅलीची सुरुवात नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ येथून हरिहर पेठ मुख्य चौकात समारोप केला आहे. कार्यक्रमात हरिहर पेठ येथील आरोग्य निरीक्षक अनिल गिरी, कर्मचारी करण घुगे, विनोद मनोहरे, जीएनएम विजया नवघरे, फार्मासिस्ट मोनिका रायसिंग, लॅब टेक्निशियन अंकुश धुड, आरोग्य सेविका कल्पना बोबडे, प्रिया हागोने, वर्षा गणगणे, आशा वर्कर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हरिहर पेठ येथील आरोग्य केंद्र सहभागी उपक्रमांचा एक भाग म्हणून अकोला शहरातील हरिहर पेठ येथील नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीला सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) अकोला मंडळाचे डॉ. अन्सारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अतुल शंकरवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रुची पोहुरकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मोठया संख्येने कर्मचारी हजर होते.
नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग समारोपावेळी उपस्थित नागरिकांना मलेरियाबाबत सविस्तर माहिती देत आरोग्य शिक्षण देण्यात आले. या रॅलीत नर्सिंग प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संस्थेच्या प्रमुख मीना माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जनजागृतीत सक्रिय भूमिका बजावली. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी सुधीर चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थिती होती.