Headlines

देशभरातून 80 हजारांहून अधिक प्रवेशिका:4 गटातून सिटी, स्टेट, राष्ट्रीय स्तरावर निवड, ‎ क्रिएटिव्ह रायटिंग स्पर्धा ज्युनिअर एडिटर निकाल जाहीर; विजेत्यांचा केला सत्कार


.

देशातील सर्वात मोठी क्रिएटिव्ह रायटिंग स्पर्धा दैनिक भास्कर ज्युनियर एडिटर-८ च्या निकालानंतर विजेत्यांच्या सत्काराचा शुभारंभ करण्यात आला. अकोला येथील दैनिक दिव्य मराठी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

या स्पर्धेला देशभरातून ८० हजारांहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. ए, बी, सी आणि डी गटांत सिटी, स्टेट आणि नॅशनल स्तरावर विजेत्यांची निवड करण्यात आली.

सर्व सिटी विजेत्यांना फास्टट्रॅक इअरबड्स व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय शिक्षक व दैनिक ‘दिव्य मराठी’ने दिलेल्या व्यासपीठाला दिले.

वितरण व्यवस्थापक श्रीराम जुमडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना ज्युनिअर एडिटर स्पर्धेबाबत मार्गदर्शन केले. तसेच दैनिक भास्कर व दैनिक दिव्य मराठीची वाचकाभिमुख पत्रकारिता आणि वृक्षारोपण, मातीचे गणपती, वस्त्रदान आदी सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांबाबत माहिती दिली. याप्रसंगी समीक्षा इंग्लिश स्कूलचे शिक्षक श्याम जाने, आरजीडी स्कूलच्या शिक्षिका संघमित्रा चंदनखेडे उपस्थित होत्या.

विजेते व शाळा नोएल स्कूल : रिया मनोहर, ईश्वरी ढोरे, हिंदवी जाणे आर. डी. पब्लिक स्कूल : संस्कृती कुकडे, देवश्री गोमाशे प्रभात किड्स स्कूल : सोहम पोहरे, ख्याती शयाने आरडीजी कॉलेज : वैशाली लांडे

आत्मविश्वासही वाढतो ^ ज्युनियर एडिटर-८ सारखी स्पर्धा विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि विचारशक्तीला चालना देते. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लेखनाची आवड निर्माण होते. याशिवाय त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. – दिलीपराज गोयनका, अध्यक्ष, भारतीय सेवा सदन.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *