धावत्या रेल्वेच्या खिडकीला लटकून आला युवकाचा मृतदेह:तुमसर रोड स्टेशनवर उघडकीस आला प्रकार, हत्या की आत्महत्या? गूढ कायम
भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड रेल्वे स्थानकावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि विषण्ण करणारी घटना उघडकीस आली आहे. धावत्या टाटानगर-इतवारी पॅसेंजर ट्रेनच्या एका डब्याच्या खिडकीला एका चाळीस ते पंचेचाळीस वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत बाहेर लोंबकळत असल्याचे आढळून आले. ही घटना उघड होताच स्थानकावर आणि प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक…