चिमुकलीने घेतली थेट मुख्यमंत्र्यांची मुलाखत!:शाळेच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांचा विद्यार्थ्यांसोबत खास संवाद, VIDEO
महिनाभराच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आजपासून राज्यातील शाळा अधिकृतपणे पुन्हा सुरू झाल्या असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये एक अनोखा उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी राज्यभरातील विविध शाळांमध्ये मंत्री, लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांकडून पहिल्याच दिवशी त्यांचे अत्यंत आनंदात स्वागत करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल तालुक्यातील…