संत साहित्य समाजाला दिशा देणारे अमूल्य वैभव- योगीराज महाराज:नांदखेड येथे एकनाथी भागवत पारायण सोहळ्याची भक्तिमय सांगता
चोहोट्टा बाजारजवळील नांदखेड येथे पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, श्री एकनाथी भागवत सामूहिक पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाची रविवारी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. संत साहित्य हे समाजाला दिशा देणारे अमूल्य वैभव असल्याचे संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे वंशज श्री योगिराज महाराज गोसावी म्हणाले. त्यांच्या काल्याच्या कीर्तनाने भाविकांना अध्यात्माची मेजवानी मिळाली. महोत्सावत हजारो वारकरी, शेतकरी व भाविकांच्या…