Headlines

जामखेड-पाटोदा महामार्गाचे काम रखडल्याने साकत घाटात मृत्यूचा प्रवास:अहिल्यानगर-बीड जिल्ह्याला जोडणारा शॉर्टकट बनला धोक्याचा‎

जामखेड-पाटोदा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने जामखेडहून पाटोद्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना साकत घाट मार्गाचा पर्यायी वापर करावा लागत आहे. मात्र, हा पर्यायी मार्गही आता अत्यंत दुरवस्थेत असल्याने वाहनचालकांना दररोज आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या खराब रस्त्यामुळे अपघातांचे…

Read More

तंबाखूमुळे होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगात 80% रुग्ण व्यसनी:बीडी, माथाडी कामगारांसाठी दंतवैद्यक सरसावले, मोफत मौखिक तपासणी‎

३१ मे रोजी जगभरात पाळल्या जाणाऱ्या ‘जागतिक तंबाखूमुक्त दिना’चे औचित्य साधून इंडियन डेंटल असोसिएशन अहिल्यानगर शाखेच्या वतीने शहरात तंबाखूविरोधी व्यापक जनजागृती मोहीम आणि मौखिक कर्करोग (तोंडाचा कॅन्सर) तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. देशातील सुमारे ३० टक्के कर्करोग हे तोंडाशी संबंधित असून, तोंडाच्या कर्करोगाच्या जवळपास ८० टक्के रुग्णांमध्ये तंबाखू सेवन हेच मुख्य कारण असल्याचे संशोधनातून समोर…

Read More

एनडीएमध्ये 150व्या तुकडीची पासिंग आऊट परेड संपन्न:353 कॅडेट्सनी प्रशिक्षण पूर्ण केले; जनरल दिवेदींची उपस्थिती

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासला येथे शनिवारी 150 व्या तुकडीचा पासिंग आऊट परेड (POP) समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात एकूण 353 कॅडेट्सनी आपले तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र दिवेदी यांनी या संचलनाची पाहणी केली. क्षेत्रपाल मैदानावर झालेल्या या संचलनाचे नेतृत्व कॅडेट मयांक चौधरी याने केले. ‘कदम कदम बढाए जा’…

Read More

अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे आरक्षण उप-वर्गीकरणाबाबत जनजागृती:नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचेही वाटप, एकजूट दाखवण्याची वेळ‎

अखिल भारतीय सफाई मजदूर संघाच्यावतीने रुक्मिणी नगर येथील सुयोग मंगल कार्यालयात अनुसूचित जातीच्या उप-वर्गीकरणासंदर्भात जनजागृती मोहिमेचे व मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून सफाई कामगार बांधव आणि महिला भगिनी उ . कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत, दीपप्रज्वलन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वासुदेव चांगरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अत्यंत…

Read More

मनोज जरांगेंचे आजपासून उपोषण:58 लाख नोंदींना न्याय द्या, नाहीतर अधिकाऱ्यांना निलंबित करा; पहिल्याच दिवशी आक्रमक पवित्रा

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून, उपोषणाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राज्य सरकारसमोर मोठी मागणी ठेवली आहे. मराठा समाजाच्या कल्याणासाठी आपण हे आंदोलन करत असल्याचे सांगताना, सरकार बदलत राहतील, चर्चा सुरू राहतील; मात्र आपण उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचा…

Read More

घरकुल लाभार्थींना विना रॉयल्टी वाळू मिळेना:आमदारांनी विचारला जाब, पंतप्रधान आवास योजना, रखडलेल्या रस्त्याचाही मुद्दा गाजला‎

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. बैठकीत विविध घरकुल, आवास योजनांचा मुद्दा गाजला. विरोधक व सत्ताधारी आमदारांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. शासन आदेश असतानाही लाभार्थी . विरोधकांची भिस्त योजनांवर ३१८ ब्रास वाळूची केली आहे तरतूद Source link

Read More

मेळघाटातील ब्रिटीशकालीन ऐतिहासिक यंत्रांचे संग्रहालय व्हावे:इंटॅकच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना घातले साकडे

मेळघाटात १०० ते १३० वर्षे जुन्या काही मशीन, लोखंडी चाके असा ऐतिहासिक ऐवज काही ठिकाणी पडून दिसतो. या मशीनचा ब्रिटिशांनी रस्ते बांधणी, सागवान लाकूड कापणे व बाहेर काढणे अशा कामासाठी उपयोग केला होता. ही मशीन आज उपयोगात नसल्याने पडून आहेत. मात्र त्यांचा इतिहास जाणून घेतल्यास तो फार रंजक आहे. ही मशीन एकत्र करून त्याचे एक…

Read More

मोहोळ तालुक्यात चारा म्हणून जनावरांना आंबा:आधी वादळी वारा अन् आता कर्नाटकातील आवकेमुळे आंबा उत्पादकांना फटका‎

मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आंब्याला मोहर कमी लागल्याने आंबा भाव खाणार अशी शक्यता होती. अशा परिस्थितीतच मागील दीड महिन्यापूर्वी परिसरामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंबा आणखीनच आंबा भाव खाणार अशी शक्यता होती. परंतु अचानक आंब्याची आवक वाढल्याने मार्केटमध्ये सर्वच जातीच्या आंब्याचे दर कोसळले आहेत. चारा म्हणून आंबा जनावरांना टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत…

Read More

‘एनईपी’च्या अंमलबजावणीसाठी आता राज्य शासनाकडून स्वतंत्र टास्क फोर्स:माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकरांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ ची प्रभावी, सुसूत्र आणि एकसमान अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीय पातळीवर येणाऱ्या विविध अडचणींचे निवारण . का भासली टास्क फोर्सची गरज ? केंद्र सरकारने २०२० मध्ये जाहीर केलेल्या या शैक्षणिक धोरणानंतर, महाराष्ट्रात डॉ. रघुनाथ माशेलकर समितीच्या शिफारशींनुसार नवीन अभ्यासक्रम…

Read More

शिवना केंद्रात 19 पैकी 5 जि.प. शाळा जीर्णावस्थेत:तीन शाळांमध्ये वीज नाही, अनेक इमारतींना तडे, पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी‎

आधुनिकतेच्या युगातही अनेक शाळा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. परिणामी ग्रामीण विद्या र्थ्यांच्या शिक्षनाचा व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शिवना केंद्रातील १९ पैकी ५ शाळा जीर्णावस्थेत तर ३ शाळांत वीज नसल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना . सिल्लोड तालुक्यातील शिवना केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था शिक्षणव्यवस्थेतील वास्तवता दर्शविणारी आहे. केंद्रात एकूण १९ शाळांचा समावेश असून, त्यापैकी…

Read More