Headlines

गडकरी, दादोजी कोंडदेव पुतळ्यांच्या पुनर्स्थापनेची मागणी:सकल ब्राह्मण समाजाने पुण्याच्या महापौरांना दिले निवेदन

श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी आणि गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यांची पुनर्स्थापना करण्याची मागणी सकल ब्राह्मण समाजाने केली आहे. या मागणीसाठी शुक्रवारी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांना निवेदन देण्यात आले. जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानातून गडकरींचा पुतळा हटवण्यात आला होता, तर दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हलवण्यात आला होता. या निवेदनात, छत्रपती संभाजी…

Read More

'स्मार्ट मीटर' लावण्यासाठी महावितरणची नवी खेळी:मीटर स्लो किंवा नादुरुस्त ठरवून ग्राहकांवर दबाव; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा आरोप

वीज वितरण कंपनीने गत काही महिन्यांपासून साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. या प्रकरणी अनेक ग्राहकांना त्यांच्या वीज वापरात कोणताही मोठा बदल नसताना त्यांचे मीटर तपासण्यासाठी पथके पाठवली जात आहेत. विशेषतः मीटर स्लो किंवा नादुरुस्त ठरवून या प्रकरणी ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने…

Read More

नाशिकच्या जागेवर भाजपचे गणेश गिते ठाम‎:मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी खलबते‎, दोन कट्टर समर्थक उमेदवारीवरून आमनेसामने

महायुतीमधील जागा वाटपाचा ‎नाशिक आणि जळगाव या दोन‎ जागांवरून महायुतीतील घटक‎ पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू ‎आहे. अशातच कुंभमेळा मंत्री गिरीश ‎महाजन यांचे खंदे समर्थक गणेश गिते‎ यांनी नाशिकच्या जागेवर थेट दावा‎ ठोकल्याने राजकीय हालचालींना वेग‎ आला आहे. नाशिकची जागा‎ भाजपलाच सुटणार असल्याचा ठाम‎विश्वास व्यक्त करत माध्यमांशी‎ संवाद साधताना गणेश गिते यांनी ‎निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले‎…

Read More

जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्र विद्युत विभाग स्थापनेवर लवकरच निर्णय:संघटनेची सरकारसोबत 7 वर्षानंतर झाली बैठक, इतर मागण्यांवरही झाली चर्चा

राज्यातील जिल्हा परिषदेसाठी लवकरच स्वतंत्र विद्युत विभाग स्थापनेवर निर्णय घेण्याचे आश्‍वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी ता. 27 मुंबईत झालेल्या अभियंता संघटनेच्या बैैठकीत दिले आहे. विशेष म्हणजे तब्बल सात वर्षाच्या पाठपुराव्यानंतर हि बैठक झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत अभियंत्यांची प्रश्‍न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. रिक्तपदे भरणे, 2005 पुर्वी जाहिरात असलेल्या पण नियुक्ती…

Read More

अमोल कोल्हेंची 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका बंद होणार?:नव्या मालिकेच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या प्रसारित होत असलेली “मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले” ही मालिका बंद पडणार का, असा सवाल आता प्रेक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. दररोज संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेच्या वेळेत स्टार प्रवाहने नव्या मालिकेची घोषणा केल्याने सोशल मीडियासह प्रेक्षकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर…

Read More

भंडारा कृषी उपविभागीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू:गैरव्यवहाराच्या तक्रारींमुळे प्रशासनात खळबळ

भंडारा येथील कृषी उपविभागीय अधिकारी कथित गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनागोंदीच्या आरोपांमुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. कृषी विभागातील विविध योजना, अनुदान वाटप आणि परवान्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची तक्रार वरिष्ठ पातळीवर करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत एका वरिष्ठ समितीने प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. शेतकऱ्यांशी थेट संबंधित असलेल्या कृषी उपविभागीय अधिकारी…

Read More

अजित पवारांचा पक्ष भविष्यात टिकणार नाही:भुजबळ ते पटेल पश्चाताप करत असतील, विधान परिषदेसाठी विशिष्ट भाग सोडला तर संख्याबळ नाही- संजय राऊत

अजित पवार यांनी स्थापन केलेला पक्ष भविष्यात राहत नाही. आता छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, प्रफु्ल पटेल, धनंजय मुंडे हे आता पश्चताप करत असतील की का अजित पवारांना शरद पवारांपासून दूर करत भाजपसोबत आणले, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.आता हे पाहणं आमचे राजकीय काम आहे. महायुतीचे लोकं निवडून आलेले आहेत त्यामुळे…

Read More

चर्चेनंतर जरांगे पाटील उपोषणाला बसणार नाहीत:सातारा गॅजेटमध्ये अडचणी, मविआने अडीच वर्षात काही केले नाही, आम्ही आरक्षण दिले- राधाकृष्ण विखे पाटील

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार ज्या काही उणिवा दिसत आहे त्यावर आज त्यांच्याशी चर्चा करू. त्यांचे काही गैरसमज असतील तर ते दूर करता येतील. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक पाऊल टाकलेले आहे. मला विश्वास आहे की सरकारी भूमिका समजून घेतल्यावर ते काही उपोषण करणार नाही, असा मला विश्वास आहे, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

Read More

मुलगा अन् सावत्र आईचे अनैतिक संबंध; दाेघांनी केली आत्महत्या:दोघांना गत आठवड्यात पोलिसांनी आणले शोधून

सावत्र आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या अनैतिक प्रेमसंबंधांचा शेवट गुरुवारी (२८ मे ) अंबाजोगाई येथे झाला. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन केले. प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. केज तालुक्यातील सोनीजवळा येथील साहेबराव पवार (४०) यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला…

Read More

गवळीशिवरा येथे वीज तारा लोंबकळल्या, जीव धोक्यात:विजेच्या तारांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी‎

गवळीशिवरा (ता. गंगापूर) येथील गाजर मळ्यातील शेतवस्तीवर राहणारे शेतकरी राजेंद्र गवळी यांच्या गट नंबर २१ मधील शेतातील विद्युत खांबावरील लोंबकळत असलेल्या विजेच्या तारेमुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर धोका निर्माण झाला आहे. सध्या शेतीशिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. अशावेळी डोक्यावरून जाणाऱ्या विजेच्या तारा विद्युत खांबावर लोंबकळत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तत्काळ…

Read More