Headlines

गंगापूरचा पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश:आमदार सतीश चव्हाण, नगराध्यक्ष संजय जाधव यांनी घेतली होती भेट‎

गंगापूर शहरात मागील सात-आठ वर्षांपासून नगर पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पालिका निवडणुकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांनी नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची आठवण उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांना करून दिल्यावर त्यांनी तत्काळ सर्व संबंधितांची बैठक बोलावून यावर तोडगा काढण्याचे आदेश दिले आहे. या संदर्भात दि. १३ रोजी आमदार सतीश चव्हाण, नगराध्यक्ष…

Read More

पालकांनी लहानपणापासूनच आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे:भाऊसाहेब गर्जे यांचा सल्ला, डोणगावचे नाव रोशन करणाऱ्या भूमिपुत्रांचा सत्कार‎

पालकांनी लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन बीएमजी अकॅडमीचे संचालक भाऊसाहेब गर्जे यांनी केले आहे. डोणगाव (ता. गंगापूर) येथे लोकनेते साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालयात मंगळवारी सायंकाळी विविध क्षेत्रात शासकीय पदावर व . मंचावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापक गोविंद हिवाळे यांनी केले….

Read More

संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात सावे यांच्यासह 5 आमदार उतरणार:बँकेच्या माध्यमातून 1 लाख शेतकऱ्यांशी थेट संपर्क, सहकाराचे राजकारण

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक यावर्षी रंगतदार होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 138 शाखांच्या माध्यमातून 800 कोटी रुपयांचे कर्जवाटप आणि एक लाख शेतकऱ्यांशी थेट संपर्क होतो. यापूर्वी मनपा आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्रपणे लढवलेल्या भाजपने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा, विधानसभेबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जिल्हा बँकेच्या माध्यमातून हक्काची ‘व्होट बँक’ मिळते….

Read More

माउलींचा मुक्काम यंदाही पुण्यातील भवानीपेठेतच:श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने वर्ष २०२६ च्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून, पुण्यातील मुक्कामाबाबत असलेला पेच अखेर सुटला आहे. भाविकांची वाढती संख्या आणि जागेची टंचाई यामुळे मुक्काम बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या, मात्र प्रशासनाने दिलेल्या लेखी हमीनंतर यंदाही पुण्याचा मुक्काम भवानीपेठ येथील श्री पालखी विठोबा मंदिरातच होणार असल्याचे निश्चित झाले…

Read More

पुण्यामध्ये आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने केला खून:सहा जण गजाआड, प्रेमसंबंध तोडण्यासाठी तरुणीच्या आईच्या प्रियकराने टाकला होता दबाव

प्रेमसंबंध तोडण्यासाठी मुलीच्या आईच्या प्रियकराने टाकलेला दबाव आणि धमकीमुळे त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तपास करून मुलीच्या प्रियकरासह साथीदारांना अटक केली. या प्रकरणात अटकेत अ . या प्रकरणी दुर्वांग ऊर्फ पारस सुनील मानकर (२१, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता), पारस किशोर गायकवाड (वय २१, रा….

Read More

महालक्ष्मी सरस 2026 ला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद:एकाच दिवसात 6 कोटींची विक्रमी उलाढाल, आतापर्यंत 32 कोटींची उलाढाल

उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बीकेसी येथे २ मे पासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाला मुंबईकरांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रदर्शनाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती, खाद्यपरंपरा, हस्तकला आणि महिला उद्योजकतेचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळत आहे. ग्रामीण महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना…

Read More

सुलतानपूरची स्व-जनगणना 100% पूर्ण:भातकुलीनंतर तिवसा तालुक्याने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला

तिवसा तालुक्यात भारत सरकारच्या स्व-जनगणना उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील सुलतानपूर गावाने आपली स्व-जनगणना प्रक्रिया १०० टक्के पूर्ण केली आहे. यामुळे भातकुली तालुक्यानंतर तिवसा तालुक्याने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. सुलतानपूर गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अल्पावधीत संपूर्ण माहितीची नोंदणी केली. नागरिकांनी स्वतःहून कुटुंबीयांची माहिती ऑनलाइन व अधिकृत माध्यमातून भरून प्रशासनाला सहकार्य…

Read More

अमरावती शिक्षकांचे शाळा सुरू करण्याच्या तारखेला आव्हान:मुंबई उच्च न्यायालयात याचिका, 9 जूनला पुढील सुनावणी

अमरावती जिल्ह्यातील शिक्षकांनी शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने ही याचिका दाखल केली असून, पुढील सुनावणी ९ जून रोजी होणार आहे. विदर्भातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हे आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या सुट्टीकालीन न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या…

Read More

NEET पेपरफुटी प्रकरण: CBI ॲक्शन मोडवर!:पुण्यातून दोघांना मुसक्या आवळल्या, तर नाशिकमध्येही धाडसत्र

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली असून, आज पुण्यातून दोघांना ताब्यात घेतले आहे. पुण्यातील बिबवेवाडी भागातून एका महिलेला अटक केल्यानंतर, सीबीआयने लगेचच फुरसुंगी येथून आणखी एका संशयित तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. एका बाजूला पुण्यात ही धडक कारवाई सुरू असतानाच, दुसरीकडे नाशिकमध्येही तपासाला वेग आला असून पोलिस…

Read More

शासकीय कर्करोग रुग्णालयात लवकरच पेट स्कॅन सुविधा:अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी दिली माहिती

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात लवकरच ‘पेट स्कॅन’ सुविधा उपलब्ध होणार आहे. घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी बुधवारी, १३ मे २०२६ रोजी रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यात ही माहिती दिली. त्यांनी प्रलंबित ‘पेट स्कॅन’ कक्षाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे रुग्णालयाच्या सुविधांचा विस्तार होईल. सध्या रुग्णांना ‘पेट स्कॅन’ तपासणीसाठी खासगी रुग्णालयात मोठी…

Read More