Headlines

माऊली कोकाटे ‘क्रांतिसूर्य केसरी’ तब्बल 3 लाखांचा ठरला मानकरी:संतनाथ महाराज यात्रेनिमित्त लढती; सिडनाळे ‘संतनाथ केसरी’‎

श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज यात्रेनिमित्त वैराग येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन आखाड्यांमध्ये महाराष्ट्रासह विविध भागांतून आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मल्लांनी आपल्या कुस्तीच्या डावपेचांनी उपस्थितांची मने जिंकली. धनजी भूमकर आखाड्यात पैलवान अमित जगदाळे, संतनाथ केसरी आखाड्यात शुभम सिडनाळे, तर क्रांतीसूर्य कै. आ चंद्रकांत निंबाळकर आखाड्यात पै. माऊली कोकाटे यांनी किताब पटकावला. क्रांतीसूर्य किताबासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान दादा…

Read More

सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा चटका; किराणा मालाच्या दरात वाढ:वस्तूंचे दर वाढल्याने घरगुती बजेट कोलमडले; खोबरे, खाद्यतेलाचा समावेश‎

मागील पंधरा दिवसांपासून किराणा मालाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. खोबरे, खाद्यतेल, डाळी, गूळ, शेंगदाण्यांबरोबरच ड्रायफ्रूटसह दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे दर वाढल्याने महिन् . सोलापूर जिल्ह्यासह तालुक्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पावसाने ऑगस्ट अखेरपर्यंत दांडी मारली आहे. समाधान कारक एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके…

Read More

गवळीशिवरा येथील महारुद्र‎मारुतीला पावसासाठी साकडे‎:तिसऱ्या शनिवारी दोन लाख भाविकांनी महारुद्र मारुतीचे घेतले दर्शन

नवसाला पावणाऱ्या श्रीक्षेत्र गवळीशिवरा येथील महारुद्र मारुती मंदिरात तिसऱ्या श्रावणी शनिवारी श्रद्धेचा महापूर आल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने मारलेल्या दडीमुळे चिंतातूर झालेल्या शेतकरी राजासह तब्बल दोन लाखांहून अधिक भाविकांनी महारुद्राच्या चरणी हजेरी लावत ‘चांगला पाऊस पडू दे आणि शेती पिकू दे’, असे साकडे घातले. पहाटेपासूनच मंदिराच्या आवारात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या….

Read More

घातक केमिकलचा मुख्य सूत्रधार जेरबंद:इस्तेकार खानला नेपाळ सीमेलगत अटक‎

घातक रासायनिक केमिकल व पावडरची अवैध विल्हेवाट लावणाऱ्या बहुराज्यीय सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार इस्तेकार अहमद निसार खान (३८, रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश) याला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी नेपाळ सीमेलगतच्या भागातून अटक केली. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या मास्टरमाईंडचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेण्यात पोलिसांना यश आले. पळशी, फर्दापूर, आळंद, शिवूर, तोंडापूर परिसरात आढळलेल्या रासायनिक ड्रम्सपासून या तपासाला…

Read More

न्यू ओएसिस स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारली राखी

फुलंब्री न्यू ओएसिस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, फुलंब्री येथे शुक्रवारी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे, विश्वासाचे आणि जबाबदारीचे प्रतीक असलेल्या या सणानिमित्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत मानवी साखळीद्वारे अत्यंत आकर्षक राखीची प्रतिकृती साकारली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राखी निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने…

Read More

टिकली आणते म्हणत तिसऱ्या दिवशीच पळाली ‘लुटेरी दुल्हन”:वाळूज परिसरात धक्कादायक प्रकार; 6 जणांविरोधात तक्रार

लग्नानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी बाजारात खरेदीसाठी गेलेली नववधू “मी टिकली घेऊन लगेच येते,’ असे सांगून दागिने व रोकड घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिसगाव शिवारातील खवड्या डोंगर भागात शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने विश्वास संपादन करत लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर स्त्रीधन म्हणून दीड लाख रुपये उकळून नवरी, तिची आई व दोन मध्यस्थांनी नवरदेवाकडील मंडळींचा…

Read More

एफडीएला सुनावले:तुम्ही स्वतःला देव समजता का? आदेश डावलल्यास थेट तुरुंगात पाठवू- हायकोर्ट

“तुम्ही स्वतःला देव समजता का? तुम्ही वाटेल ते करू शकता का? डास मारण्यासाठी तलवारीचा वापर कशाला करता? न्यायालयात दाखल होणाऱ्या १ हजार अवमानना याचिकांपैकी ५०० याचिका केवळ सरकारचा आदेश न पाळण्याच्या वृत्तीमुळे असतात. आम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना समजावून आणि ओरडून थकलो आहोत. आदेश डावलल्यास थेट तुरुंगात पाठवू,’ अशा अत्यंत संतप्त शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व…

Read More

राज्यामध्ये एक कोटी लाडक्या बहिणींना योजनेमधून डावलले:राष्ट्रवादी श.पच्या कोअर कमिटीच्या मॅरेथॉन बैठकीत रणनीती निश्चित

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीच्या मॅरेथॉन बैठकीत आगामी राजकीय लढाईची दिशा निश्चित करण्यात आली. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, मतदार याद्यांमधील कथित गैरव्यवहार, महागाई, बेरोजगारी आणि एमपीएससी पेपरफुटी यांसारख्या विविध जनहिताच्या मुद्द्यांवरून महायुती सरकारविरोधात राज्यव्यापी रान उठवण्याचा निर्णय घेण्यात आला….

Read More

कर्जतजवळ कोयना एक्स्प्रेसमध्ये धुराचे लोट:प्रवाशांची जीव वाचवण्यासाठी रुळांवर उडी! सुदैवाने जीवितहानी नाही; VIDEO व्हायरल

मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी सायंकाळी कोयना एक्स्प्रेसच्या डब्यातून अचानक धुराचे लोट येऊ लागल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी डब्यातून थेट रेल्वे रुळांवर उड्या मारून पळापळ केली. या घटनेचा आणि प्रवाशांच्या उडालेल्या गोंधळाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे. अचानक धूर निघू…

Read More

दोन बाळंतीणींना रुग्णवाहिका मिळाली नाही:डिझेल, ड्रायव्हर नसल्याचे कारण; आमदार चित्रा वाघ संतापल्या

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) दोन बाळंतीणींना रुग्णवाहिका न मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी रुग्णालयाला भेट दिली असता, त्यांच्यासमोरच ही घटना उघड झाली. रुग्णवाहिकेसाठी डिझेल किंवा चालक नसल्याचे कारण कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले. या घटनेमुळे रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी तीन नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतरही…

Read More