Headlines

चांदवडमध्ये ईद-ए-मिलाद मिरवणुकीत एकतेचा संदेश:शहरातील विविध भागांत आकर्षक धार्मिक देखावे‎

ईद-ए-मिलाद सण चांदवड शहरात उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील विविध भागांत आकर्षक धार्मिक देखावे उभारण्यात आले होते. मुस्लीमबहुल मोहल्ले, घरे आणि दुकानांवर आकर्षक विद्युत रोषणाईसह सजावट करण्यात आली होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जामा मस्जिद परिसरातून ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक सोमवार पेठ, शिवनेरी चौक, नाईकवाडा, पुरा, मुल्लावाडा, शिवनेरी…

Read More

निष्ठावान शिवसैनिक हाच उबाठाचा श्वास:चांदवड येथील आढावा बैठकीत माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांनी साधला संवाद‎

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाने चांदवड तालुक्यात संघटनात्मक बांधणीला वेग देत बूथ पातळीवरील यंत्रणा मजबूत करण्याचा निर्णय घेतला. तळागाळातील मतदारांशी थेट संवाद वाढविण्यासाठी ‘बूथ लेव्हल एजंट’ (बीएलए) यंत्रणा सक्षम करण्यावर आढावा बैठकीत चर्चा झाली. माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. मिर्लेकर म्हणाले की, निष्ठावान शिवसैनिक हाच पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा…

Read More

30 किमीत पंधरा ठिकाणी महामार्गाचे‎ दुभाजक फोडत बनवले अनधिकृत रस्ते‎:धुळे-सोलापूर महामार्गावर गल्लेबोरगाव ते कन्नड घाटादरम्यान महिनाभरात 5 मृत्यू‎

देशाच्या मध्य भागातील पाच राज्यांना आणि महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ४६१ किमी लांबीचा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. कन्नड हद्दीत या महामार्गावर १५ ठिकाणी दुभाजक फोडून रस्ते के ले आहे . छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या १२४ किमी महामार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी दुभाजक तोडून अनधिकृत रस्ते तयार केले आहेत. दुभाजकामधील झाडांमुळे…

Read More

जरांगेंच्या विरोधानंतरही परभणीत मेळावा, मुंबईला जाणारच- जरांगेंचा इशारा:इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार- उपमुख्यमंत्री शिंदे

मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत टिकणारे असावे, ही सरकारची भूमिका आहे. घाईत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. मराठा आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणी येथील मेळाव्यात दिली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या तीव्र विरोधानंतरही परभणीत शिवसेनेच्या युवा संवाद…

Read More

संभाजीनगरात 250 कोटींच्या 300 एकर शेतीची मालकी परस्पर काढली:म्हैसमाळ, वेरूळसारख्या पर्यटनस्थळांच्या परिसरातील शेतकऱ्यांचा मालकी हक्क असताना प्रशासनाने जमिनी परस्पर वर्ग-2 केल्या

वर्ग-2 च्या इनामी जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी शेतकरी वर्षानुवर्षे महसूल कार्यालयांचे उंबरठे झिजवतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अगदी उलटा प्रकार केला आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे असलेले म्हैसमाळ, वेरूळ आणि खुलताबादच्या 300 हून अधिक शेतकऱ्यांच्या वर्ग-1 च्या जमिनी नोटीस न देताच परस्पर वर्ग-2 करून टाकल्या आहेत. विशेष म्हणजे या जमिनीच्या एकरी किमती 250 कोटींपेक्षा…

Read More

विवस्त्र करून अल्पवयीन मुलांचं चित्रिकरण:कराड शहर पोलिस ठाण्यातील धक्कादायक प्रकार; अधिकारी, कर्मचाऱ्याविरोधात पीडिताची तक्रार

कराड शहर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्यासह पोलिस अंमलदार या कायद्याच्या रक्षकांनीच तीन अल्पवयीन मुलांसोबत घृणास्पद प्रकार केल्याची घटना कराड शहर पोलिस ठाण्यात घडली आहे. तीन मुलांना नग्न व्हायला लावून एकमेकांना गुप्तांगावर मारहाण करण्यास सांगितले. त्या प्रकाराचे मोबाईलवर चित्रिकरण केल्याचा घृणास्पद प्रकार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक आणि बालकल्याण समितीकडे तक्रार करत…

Read More

नेरपिंगळाईत 'चलो दिल्ली' अभियानासाठी जनजागरण सभा:भारतीय कम्युनिस्ट पक्षाने घेतली; महिला, युवक, शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) ‘चलो दिल्ली’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर नेरपिंगळाई येथील गणेश चौकात जनजागरण सभेचे आयोजन केले. या सभेला महिला, युवक, विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. ‘बदलाव जरूरी है… चलो दिल्ली!’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी नेत्यांनी तरुणाईसमोरील बेरोजगारी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी यावर जनजागृती केली. महिलांची सुरक्षितता, सामाजिक समानता…

Read More

मतदार यादीचा एसआयआर संपला, प्रारूप यादी आज जाहीर:उद्यापासून नवीन मतदारांची नोंदणी सुरू, महिनाभर प्रक्रिया चालेल

भारत निवडणूक आयोगाचा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम पूर्ण झाला आहे. या आधारे तयार झालेली नवीन प्रारूप मतदार यादी आज, सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल. या यादीला अधिक परिपूर्ण करण्यासाठी, १ ऑक्टोबर २०२६ ही अर्हता दिनांक मानून, नवीन मतदारांच्या नोंदणीला मंगळवार, १ सप्टेंबरपासून सुरुवात होईल. ही नोंदणी प्रक्रिया पुढील महिनाभर सुरू…

Read More

पुण्यात स्वाइन फ्लूचा उद्रेक:जुलैतील 35 रुग्ण ऑगस्टमध्ये थेट 225 वर,नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुणे शहरात स्वाइन फ्लूचा (एच1एन1) संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून समोर आले आहे. जुलै महिन्यात शहरात 35 रुग्ण आढळले होते. ऑगस्टमध्ये ही संख्या थेट 225 वर पोहोचली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा, मंडळे आणि सार्वजनिक ठिकाणी वाढणारी गर्दी पाहता नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. वर्षाच्या सुरुवातीला स्वाइन फ्लूचे रुग्ण फारच कमी…

Read More

पुण्यात मुलाने कौटुंबिक वादातून आईचा खून केला:आरोपी अनिकेतला अटक, पोलिसांकडून तपास सुरू

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात कौटुंबिक वादातून एका मुलाने आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. सविता सुरेश हरिभक्त (वय 48, रा. शांतीनगर वसाहत, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा अनिकेत (वय 30) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता…

Read More