Headlines

पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे!:मंत्री अशोक उईकेंच्या हस्ते सोडले उपोषण; मुख्य आंदोलन तात्पुरते स्थगित

पुण्यातील मांजरी येथे गेल्या 17 दिवसांपासून सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आपले उपोषण सोडले. मात्र, विद्यार्थ्यांनी सध्यातरी फक्त उपोषण मागे घेतले असून, आपले मुख्य आंदोलन केवळ तात्पुरते स्थगित केल्याचे स्पष्ट केले आहे. या आंदोलनासंदर्भात आदिवासी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…

Read More

मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक टंकलेखन परीक्षा अखेर रद्द!:तांत्रिक अडचणींवरून विद्यार्थी होते आक्रमक; नवी तारीख लवकरच

मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने 16 ऑगस्ट रोजी राज्यभरात लिपिक पदासाठी घेण्यात आलेली ऑनलाइन टंकलेखन परीक्षा तांत्रिक बिघाडामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. अनेक ठिकाणी उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता न आल्याने त्यांच्यात तीव्र संताप निर्माण झाला होता. या प्रकाराविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला. सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी उमेदवारांसोबत छत्रपती संभाजीनगर येथे ठिय्या आंदोलन केले,…

Read More

'निरुपाज् येवला पैठणी' दालनाचे पुण्यात उद्घाटन:प्रा. डॉ. मेधा कुलकर्णींकडून हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन

‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’ या येवला पैठणीच्या अग्रगण्य ब्रँडच्या पुण्यातील भव्य दालनाचे उद्घाटन नुकतेच झाले. संसदीय समितीच्या अध्यक्षा व राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते भांडारकर रस्त्यावर हे दालन सुरू करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि भारतीय हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र…

Read More

'गोकुळ'ची दहीहंडी महायुतीच फोडणार!:धनंजय महाडिकांचा 25-0 ने विजयाचा दावा, काय म्हणाले महाडिक?

यंदा गोकुळ दूध संघाची दहीहंडी महायुतीच फोडणार असून 25 विरुद्ध शून्य अशा एकतर्फी फरकाने गोकुळवर पुन्हा महायुतीचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वास भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. सतेज पाटील यांच्या ‘समविचारी आघाडी’कडे सध्या निवडणूक लढवण्यासाठी सक्षम उमेदवारच शिल्लक नसल्यामुळे ते आता नाईलाजाने…

Read More

पुणे गणेशोत्सवात प्लाझ्मा, लेझरवर पूर्ण बंदी:नियम मोडल्यास मंडळांवर कायदेशीर कारवाई होणार

पुणे जिल्ह्यातील आगामी गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये प्लाझ्मा आणि लेझरच्या वापरास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ध्वनी व प्रकाश प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन केले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिला. पोलीस अधीक्षक गिल यांनी…

Read More

पावसाची दडी, बळीराजा संकटात!:हातातोंडाशी आलेला घास गेला वाया; शेतकऱ्याने 10 एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी पिके करपायला सुरुवात झाली असून परभणी जिल्ह्यातही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने मोठा खंड दिल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. परभणीच्या मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथे एका शेतकरी महिलेने पावसाअभावी वाळून चाललेल्या…

Read More

नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार!:महाराष्ट्राचे 60 पर्यटक बेपत्ता, 404 पैकी 338 नागरिक सुरक्षित; महत्त्वाची माहिती समोर

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे मोठा विध्वंस झाला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या महाप्रलयात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका केवळ नेपाळलाच नाही, तर इतर अनेक देशांनाही बसला आहे. या पुराच्या तडाख्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटकही नेपाळ आणि तिबेटच्या सीमाभागात अडकले आहेत. मिळालेल्या…

Read More

ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ अरविंद खळदकर यांचे निधन:जनता बँकेचे माजी अध्यक्ष, डेक्कन सोसायटीचेही प्रमुख होते

ज्येष्ठ बँकिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ तसेच जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अरविंद केशव खळदकर (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक म्हणूनही ते परिचित होते. शनिवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बँकिंग, सहकार, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. खळदकर हे १९९७ पासून…

Read More

मनोज जरांगे यांच्या उपोषणावर लक्ष्मण हाकेंची टीका:'शेवटचा लढा' म्हणत ओबीसी आरक्षणावर घाला घालण्याचा आरोप

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. या उपोषणावर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र टीका केली आहे. जरांगे पाटील यांचे धोरण ‘शेवटचा लढा’ म्हणत ओबीसींच्या आरक्षणावर ‘घाला’ घालण्याचे असून, अपात्र प्रमाणपत्रे वैध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप हाके यांनी केला. या…

Read More

प्रा. यास्मिन शेख यांच्या कार्याला तंत्रज्ञानाचे पाठबळ द्यावे: डॉ. सावंत:मराठी भाषा संरक्षणासाठी श्रद्धांजली सभेत मत व्यक्त

ज्येष्ठ भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांच्या भाषासंरक्षणाच्या भूमिकेला आधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ मिळावे, असे मत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (MKCL) प्रमुख सल्लागार डॉ. विवेक सावंत यांनी व्यक्त केले. प्रा. शेख यांच्या निधनानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ही श्रद्धांजली सभा पार पडली. यावेळी…

Read More