Headlines

मध्यप्रदेशातील ज्वारीची स्थानिकांच्या नावावर विक्री:मोर्शीतील प्रकार, खरेदी-विक्री संघाच्या संचालकांनी केली चौकशीची मागणी

मोर्शी येथे ज्वारी खरेदीत मोठा घोटाळा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातून आणलेली ज्वारी स्थानिक शेतकऱ्यांच्या नावावर शासनाला विकली जात असून, त्यासाठी बोगस अर्ज भरले जात आहेत. मोर्शी तालुका शेतकी खरेदी-विक्री संघाच्या संचालकांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. या व्यवहारामुळे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होण्याची शक्यता संघाचे संचालक बंडू साऊत, पंकज विधळे, मंगेश…

Read More

पुण्यातील होर्डिंग्ज धोरण भाजप घेणार मागे:आयुक्त-स्थायी समिती अध्यक्षांच्या वादानंतर पक्षाने भूमिका केली स्पष्ट

पुणे शहरातील होर्डिंग्ज धोरणावरून सुरू असलेल्या वादानंतर भाजपने हे धोरण पुढे न नेण्याचा निर्णय घेतला आहे. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी गुरुवारी (दि. २३) ही माहिती दिली. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि आयुक्त नवल किशोर राम यांच्यातील वादामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. या वादादरम्यान, ‘बघून घेतो’ असा दम देण्यात आल्याची माहिती समोर…

Read More

लिगो इंडियाच्या अत्याधुनिक वैज्ञानिक प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ:लिगो इंडियामुळे देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळणार – डॉ. मोहंती

हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या लिगो इंडिया या देशातील महत्त्वाकांक्षी व अत्याधुनिक वैज्ञानिक प्रकल्पामुळे देशाला आंतरराष्ट्री‌य पातळीवर नवी ओळख मिळणार असल्याचे प्रतिपादन अणु ऊर्जा आयोगाचे सचिव तथा परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी दुघाळा (ता. औढा नागनाथ) येथे केले. दुधाळा येथील लिगो इंडिया प्रकल्पाच्या नागरी (सिव्हिल) व पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन आज…

Read More

उद्धव ठाकरेंनीच विधानपरिषदेची निवडणूक लढवावी:खासदार सुप्रिया सुळेंचे आग्रही ट्विट; हर्षवर्धन सपकाळांनीही घेतली 'मातोश्री'वर भेट

राज्यातील विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या जागेसाठी महाविकास आघाडीतून काँग्रेसने आधीच अनुकूलता दर्शवली असताना, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंनीच पुन्हा निवडणूक लढवावी, अशी विनंती केल्याने शरद पवारांच्या…

Read More

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज:प्रकृती पूर्णपणे ठणठणीत, डॉक्टरांचा पूर्ण विश्रांती घेण्याचा अन् प्रवास टाळण्याचा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून, नियमित वैद्यकीय तपासणीनंतर ते आता आपल्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. सोमवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. शरद पवार यांना सोमवारी सकाळी प्रकृती अस्वास्थेमुळे ब्रीच…

Read More

पुणे रेल्वे स्थानकातील समस्यांची खासदार मेधा कुलकर्णींकडून पाहणी:सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवरून रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले

पुणे रेल्वे स्थानकातील नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी स्थानकाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आढळलेल्या समस्या आणि असुविधांवरून त्यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा अत्यंत कमकुवत असल्याचे सांगत, याबाबत सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार कुलकर्णी यांनी सांगितले…

Read More

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, तहसीलदारांना दिले निवेदन‎

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर करण्यात आलेले स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गेल्या १४ ते १५ महिन्यांपासून कार्यान्वित झाले नसल्याने राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी व अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे मंडळ तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागण . तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची घोषणा केली होती. या घोषणेमुळे राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण…

Read More

अजित पवार नाहीत, शरद पवारही अनुपस्थित; मतदानावेळी सुनेत्रा पवार भावूक:पोटनिवडणुकीत भावनिक क्षण; डोळ्यात अश्रू

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत ही निवडणूक लागली असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत. मतदानाच्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मतदारांमध्ये…

Read More

पारा 43.7 अंशांवर; उद्यापासून उष्णतेच्या लाटा:आगामी तीन दिवसात अकोल्याचे तापमान 45 अंशांवर जाण्याची शक्यता

तापमानाचा पारा पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. बुधवारी अकोल्याचा पारा ४३.७ अंशांवर पोहोचला. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने विदर्भात यलो अलर्ट जारी करत शुक्रवार ते रविवार दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आगामी पाच दिवसात तापमानात २ ते ४ अंशांदरम्यान वाढ होणार आहे. ४८ तासांत पारा २ अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे २९…

Read More

आरोग्य जनजागृती मोहिमेला वेग; एचपीव्ही लसीकरणास प्रतिसाद:28,376 लसीकरणाचे उद्दिष्ट, दीड महिन्यात 1,288 मुलींना दिली लस‎

जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागाकडून आरोग्यविषयक योजनांची व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण होण्यास मदत होत असल्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या मोहिमेत एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण, टीबीमुक्त भारत अभियान (टप्पा २), तापमानामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव,…

Read More