Headlines

अभय ठरला ‘मिस्टर विदर्भ’चा मानकरी:‘विदर्भ फेस ऑफ द इयर’ स्पर्धेत कामगिरी, कौतुकाचा वर्षाव‎

‘मिस्टर विदर्भ’ किताबावर नाव कोरत शहरातील प्रकाश आंबेडकर नगर येथील अभय नितीन शेगोकार यांनी अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. अमरावती येथे झालेल्या ‘विदर्भ फेस ऑफ द इयर’ स्पर्धेत विविध स्पर्धकांना मागे टाकत अभय यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची आणि आत्मविश्वासाची छाप उमटवली. त्यांच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. बीएसएफ बहुउद्देशीय संस्था, अमरावती, सत् कबीर बहुउद्देशीय संस्था,…

Read More

राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची विश्रांती:हवामान कोरडे आणि दमट राहण्याचा अंदाज, मराठवाड्यात हलक्या सरींची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडत असला तरी, जोरदार पावसासाठी आवश्यक असलेली हवामान प्रणाली सध्या सक्रिय नाही. त्यामुळे दमदार पावसाची शक्यता कमी असून, ऊन आणि पावसाच्या खेळामुळे उकाडा वाढला आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कोकण…

Read More

नारळी पौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी:अक्कलकोटमध्ये 50 हजार जणांनी घेतले दर्शन

येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात श्रावण मास, नारळी पौर्णिमा रक्षाबंधन सलग शनिवार, रविवार सुट्यामुळे वटवृक्ष मंदिरात भाविकांची गर्दी वाढत असून पहाटे पासून दिवसभर सुमारे एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासुनच मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजुन गेले. २८ ऑगस्ट रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती तलाव…

Read More

मराठी शाळा, ग्रंथालये मराठींची खरी वस्त्रे- पाटील:विखे-पाटील साहित्य,‎कलागौरव व प्रबोधन‎पुरस्कारांचे वितरण‎

भविष्यकाळ अंध:कारमय होण्यापूर्वीच मराठी शाळांच्या सुधारणेचा आग्रह धरला पाहिजे. मराठी शाळा आणि पुस्तके पुरविणारी ग्रंथालये ही मायमराठीची खरी वस्त्रे आहेत. महाराष्ट्र समृद्ध करायचा असेल तर मराठीसाठी धाडसाने काहीतरी करावे लागेल, असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त प्रवरा…

Read More

शनिदेवाच्या चरणी राखी; अनुराधा पौडवालांचा माहेरचा भावबंध:शनिदेवाला 5 ग्रॅम सोन्याची साखळी अर्पण; स्व. बाबुराव बानकर यांच्या आठवणींना दिला उजाळा‎

शिंगणापूर हे माझे माहेर आहे. शनिदेवाने आणि स्व. बाबुराव बानकर यांनी मला लेक मानले. त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनानिमित्त येथे येऊन राखी बांधते. मला माहेरची साडीही भेट दिली जाते, अशी भावना प्रसिद्ध पार्श्वगायिकाअनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केली. . रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पौडवाल यांनी श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शनिदेवाला राखी आणि पाच ग्रॅम सोन्याची साखळी…

Read More

बीडमध्ये एका गर्भाशयाची किंमत फक्त 2000 रुपये:मासिक पाळीत सुट्या घेणे टाळण्यासाठी ऊसतोड महिला ऐन तारुण्यात काढून टाकतात स्वत:चे गर्भाशय

मासिक पाळीतील 4 दिवसांच्या सुट्या पडल्या तर प्रत्येकी 2 हजारांचे नुकसान होते. मुकादम थेट एक दिवसाचे 500 रुपये कापतात. हा भुर्दंड टाळण्यासाठी आणि पाळीतून कायमची सुटका व्हावी म्हणून बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला ऐन तारुण्यातच स्वतःचे गर्भाशय काढून टाकतात. साडेतीन वर्षांत एकट्या बीड जिल्ह्यातील तब्बल 4,613 महिलांनी गर्भाशय काढण्याची (हिस्टेरेक्टॉमी) शस्त्रक्रिया केली. सरकारच्या मते त्यापैकी पक्त…

Read More

चारनेरवाडी शिवारात वन्यप्राण्यांनी रातोरात फस्त केले मक्याचे पीक

सिल्लोड तालुक्यातील चारनेरवाडी शिवारात वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. गट क्रमांक १२ मधील महिला शेतकरी मालनबाई तेजराव चौथमल यांच्या एक एकर क्षेत्रावरील बहरलेले मक्याचे संपूर्ण पीक वन्यप्राण्यांनी रातोरात फस्त केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चौथमल यांचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मालनबाई यांनी यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या आशेने एक एकरावर मक्याची…

Read More

पाचोडच्या रुग्णालयात फायर सेफ्टीचा बोजवारा:दोन वर्षांपासून ऑडिटच नाही, पाण्याचे मुख्य कनेक्शन तुटलेल्या अवस्थेत, प्रशासनाचे दुर्लक्ष‎

पैठण तालुक्यातील पाचोड ग्रामीण रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा गंभीर प्रश्न प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ऐरणीवर आला आहे. रुग्णालयात आपत्कालीन परिस्थितीत आग आटोक्यात ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या चक्क रिकाम्या असून, या टाक्यांना जोडलेले पाण्याचे मुख्य कनेक्शनही तुटलेल्या अवस्थेत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत समोर आले आहे. अत्यंत चिंतेची बाब म्हणजे या रुग्णालयाचे मागील दोन वर्षांपासून फायर ऑडिट झालेच नसल्याचे उघड झाले आहे….

Read More

जांबरगाव शिवारात बनावट डांबर निर्मिती:पत्र्याच्या शेडमध्ये थाटला कारखाना, अंधाराचा फायदा घेत संशयित पसार‎

समृद्धी महामार्गालगत पत्र्याच्या शेडआड सुरू असलेल्या बनावट डांबर तयार करण्याच्या कारखान्यावर वैजापूर पोलिसांनी धडक देत रॅकेटची पाळेमुळे उघड करण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षांपूर्वी याच अड्ड्याची पोलखोल होऊन कारवाई झाली होती; मात्र त्यानंतरही येथे पुन्हा संशयित व्यवहार सुरू असल्याचा आरोप आहे. आता त्याच ठिकाणी पोलिसांना ८ ते ९ टन लोखंडी गजांचा साठा आणि विविध केमिकलने…

Read More

वेरूळ येथे 300 कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता:चार तास चालले महास्वच्छता अभियान, विविध शासकीय विभागांनी नोंदवला सहभाग‎

ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिर आणि परिसर स्वच्छ, सुंदर व प्रसन्न ठेवण्याच्या उद्देशाने ‘स्वच्छ मंदिर परिसर – सुंदर वेरूळ, आरोग्य संपन्न वेरूळ’ हा संदेश देत ३०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चार तासांचे महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. या मोहिमेत शिक्षण विभागाने वेरूळ लेणी परिसर, तर महसूल विभागाने घृष्णेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता केली. तसेच इतर शासकीय…

Read More