Headlines

अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय, ते काम ते उत्तम करतात!:नागपुरातून अमित ठाकरेंची भाजपवर टीका; म्हणाले- 20-21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तरी सरकारला पाझर फुटला नाही

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) अध्यक्ष अमित ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. मुंबई भाजपचे आमदार अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्या नातवाच्या शाळेवरून केलेल्या टीकेला अमित ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले. “अमित साटम यांना भुंकायलाच ठेवले असून, ते त्यांचे काम अगदी…

Read More

जवळा बाजारमध्ये मजुराची जिल्हा परिषद शाळा परिसरात गळफास घेऊन आत्महत्या:कारण अस्पष्ट, औंढा नागनाथ पोलिस घटनास्थळी

औढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एका मजूराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी ता. 27 सकाळी उघडकीला आला आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी आर्थिक विवंचनेतून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळा बाजार येथील साधूनगर भागातील राहिवासी असलेले संतोष जनार्धन फुटाणे (40) हे गावातील एका…

Read More

Supriya Sule Rejects OBC Certificate Claims; Hits Back At Vijay Wadettiwar

मराठा आरक्षणाच्या वादादरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका विधानामुळे महाविकास आघाडीत नवा राजकीय वाद पेटला आहे. “राज्यातील बहुतांश मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्रे घेतली असून सुप्रिया सुळे यांच्याकडेही ओबीसी दाखला आहे,” असा खळबळज . वडेट्टीवारांचा नेमका आरोप काय होता? पत्रकार परिषदेदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दाखल्याबाबत विचारले असता वडेट्टीवार म्हणाले, “जरांगे पाटलांना…

Read More

पुण्यातील खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे बनलेत:पावसाळा संपल्यावर पालिकेला खड्ड्यांची आठवण, विनानिविदा 16 कोटींची कामे दिली, आपचा आरोप

पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आम आदमी पक्षाने पुणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. पावसाळा संपत आल्यावर खड्डे बुजविण्याच्या कामांसाठी महापालिका प्रशासनाला जाग आल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. निविदा प्रक्रिया न राबविता थेट सुमारे 16 कोटी रुपयांची कामे देण्याचा निर्णय घेतला जात असल्याचा दावा ‘आप’चे महाराष्ट्र प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे….

Read More

मुंबईच्या सायन रेल्वे स्थानकात हाय व्होल्टेज ड्रामा:नोकरी गेल्याच्या रागातून डॉक्टर टॉवरवर चढला, गळफासही घेतला; अग्निशमन दलाच्या तत्परतेने वाचला जीव

सायन रेल्वे स्थानकात गुरुवारी (२७ ऑगस्ट) सकाळी एका डॉक्टरने टॉवरवर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागातून संबंधित डॉक्टरने रेल्वे स्थानकातील उच्चदाब वीज टॉवरवर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केल्याने त्याचा जीव वाचला. ही…

Read More

Sanjay Raut Targets Eknath Shinde Over Rapido Funding Controversy

रॅपिडो कंपनीने महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना विविध मार्गाने उपकृत केले असून त्यांच्या मंडळांना आणि परिवहन मंत्र्यांच्या दहीहंडीला मोठे पैसे दिले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. परिवहन मंत्र्या . संजय राऊत म्हणाले की, रिक्षाचालकांना मराठी भाषेसाठी दिलेली 3 महिन्यांची मुदतवाढ मुख्यमंत्र्यांनी दिलेली नाही, तर ती अमित शहा आणि…

Read More

Samay Raina & Devendra Fadnavis Funny Moment at Maharashtra Cyber Event

कॉमेडियन समय रैना आणि महाराष्ट्र सायबरचा संबंध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण सायबर कारवाई नसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेला एक मिश्कील प्रसंग आहे. महाराष्ट्र सायबरच्या ‘ऑपरेशन 1930’ या जनजागृती उपक्रमाच्या कार . विशेष म्हणजे, सत्कारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळ गेलेल्या समयने समोर ठेवलेल्या बिस्किटांकडे पाहून थेट, “मी एक बिस्किट घेऊ…

Read More

Sujat Ambedkar Attacks Sugar Barons; Tipu Sultan Controversy In Maharashtra

महाराष्ट्रात टिपू सुलतान यांच्या फोटोचा मुद्दा गेली 4 ते 5 वर्षे राजकीय स्वार्थासाठी चर्चेत आणला जात आहे. 2021 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ‘औरंगजेब आणि टिपू सुलतानाची औलाद’ असे वक्तव्य करून या विषयाला वेगळे वळण दिले. त्यानंतर मुस्लिम युवकांना त्रास द . सुजात आंबेडकर म्हणाले की, 2023 मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती…

Read More

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्येही आता स्वीकृत सदस्य:कुणाला मिळणार संधी? ग्रामविकास विभागाची अधिसूचना जारी

महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत अर्थात नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करता येणार आहे. ग्रामविकास विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित पक्षांच्या संख्याबळानुसार या सदस्यांची निवड केली जाणार असून, त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये तब्बल 1 हजार 5…

Read More

झिरवळांचा विद्यार्थ्यांना सल्ला ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा:आदिवासी विद्यार्थ्यांचं 14 दिवसांपासून उपोषण सुरू; लेखी आश्वासनावर विद्यार्थी ठाम

पुण्यातील मांजरी परिसरात विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि उपोषण गेल्या 14 दिवसांपासून सुरू आहे. आपल्या 14 प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत असून, काही विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी भेट देताना विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे…

Read More