Headlines

कोयत्याने हल्ला झालेल्या युवतीचा सातार्‍यात मृत्यू:पालघर येथे घडली होती संतापजनक घटना; नातेवाईकांची प्रशासनाकडे आक्रमक मागणी

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या 27 वर्षीय स्नेहल सावंत या तरुणीचा सातार्‍यातील रुग्णालयात प्रदीर्घ उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मूळ सातार्‍याच्या माण तालुक्यातील पूळकोटी गावच्या रहिवासी असलेल्या स्नेहल यांनी अत्यंत प्रतिकूल आणि संघर्षाच्या परिस्थितीतून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत शासकीय सेवेत प्रवेश केला होता. शासकीय सेवेत रुजू होऊन अवघे सात महिने उलटलेले असताना…

Read More

हिंगोलीत हार्डवेअरच्या दुकानातून चोरट्यांनी 4.22 लाखांचा मुद्देमाल पळविला:हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली शहरातील महेश चौक भागात एक हार्डवेअरच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावरील खिडकीतून आत प्रवेश करून चोरट्यांनी 4.22 लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बुधवारी ता. 26 हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील महेश चौक भागात नितीन…

Read More

परीक्षांमधील गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त होत आहेत:नेहा बोरा यांची शिक्षण व्यवस्था अधिक जबाबदार करण्याची मागणी

सामाजिक कार्यकर्त्या नेहा बोरा यांनी स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवस्थापनावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. यूपीएससीसह विविध लोकसेवा आयोगांच्या परीक्षांमध्ये सातत्याने निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. शिक्षण आणि परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, जबाबदार आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याची मागणी बोरा यांनी केली आहे. पुणे हे शिक्षणाचे प्रमुख केंद्र असून, देशभरातून हजारो विद्यार्थी येथे स्पर्धा…

Read More

आष्टापूरमध्ये 40 टन ऊस चोरी:लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना केली अटक

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आष्टापूर येथील एका शेतातून सुमारे ४० टन ऊस चोरी झाल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चोरी झालेल्या उसाची अंदाजे किंमत ८८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुंढवा परिसरात राहणाऱ्या अनिल चंद्रकुमार कामठे यांच्या कुटुंबाच्या मालकीची आष्टापूर येथील गट क्रमांक ८२२ मध्ये शेतजमीन आहे. कामठे आणि त्यांचे दोन भाऊ…

Read More

वेसावे ते भाईंदरचा प्रवास आता केवळ 15 ते 20 मिनिटांत!:'मुंबई किनारा रस्ता' प्रकल्पाच्या कामाला वेग

मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी सोडविण्‍यासाठी व सुगम, अखंड प्रवासाच्या उद्देशाने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारा रस्‍ता (उत्‍तर) हा महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्‍प हाती घेतला आहे. संपूर्ण मुंबईचा किनार पट्टा यामुळे एकमेकांना जोडला जाणार आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्‍पस्‍थळास प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, आवश्‍यक ते निर्देश दिले. मुंबई किनारा रस्‍ता (उत्‍तर)…

Read More

'रिक्षा'च्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप:संजय राऊतांच्या टीकेला प्रताप सरनाईकांचे प्रत्युत्तर; थेट 'सामना'त जाऊन चर्चेही तयारी

राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून सध्या रिक्षाचालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहून त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यास लाखो रिक्षाचालकांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करत राऊत यांनी या निर्णयामागे सरकारमधील…

Read More

मोहन भागवतांचे अमेरिकेत पारंपरिक स्वागत:'युनिव्हर्सल वननेस' कार्यक्रमावरून न्यूयॉर्कमध्ये विरोधकांचे निदर्शने

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत १५ दिवसांच्या परदेश दौऱ्यावर अमेरिकेत दाखल झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये त्यांचे भारतीय वंशाच्या नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित जागतिक संपर्क अभियानाचा हा भाग असून, ते अमेरिकेनंतर कॅनडा आणि ब्रिटनलाही भेट देणार आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कमध्ये एका मोठ्या कार्यक्रमावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण…

Read More

ओबीसी आरक्षण संपविणाऱ्यांच्या विरोधात आमचे आंदोलन:स्वातंत्र्यांच्या लढ्या प्रमाणे पुन्हा एकदा ओबीसींच्या हक्काचा लढा उभा करणार- लक्ष्मण हाके

राज्यात ओबीसी आरक्षण संपविण्याचे काम या राज्यकर्त्यांनी केले असून आरक्षण संपविणाऱ्यांच्या विरोधात ता. १ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आंदोलन केले जाणार असून यामध्ये हजारो ओबीसी बांधव सहभागी होणार असल्याचा दावा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी बुधवारी ता. २६ पत्रकारांशी बोलतांना केला आहे. हिंगोली येथील शासकिय विश्रामगृहात ओबीसी पदाधिकाऱ्यांच्या बैठकी नंतर प्रा. हाके यांनी पत्रकारांशी…

Read More

जेन-झीमध्ये भगंदरची समस्या वाढली:बदलती जीवनशैली, आहार आणि मोबाईलचा अतिवापर कारणीभूत

बदलती जीवनशैली, फ्रोझन आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे वाढते सेवन तसेच स्वच्छतागृहात मोबाईलचा अतिवापर यामुळे ‘जेन-झी’ पिढीमध्ये भगंदर, मूळव्याध यांसारख्या अॅनोरेक्टल आजारांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी २५ ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये अधिक आढळणाऱ्या या समस्या आता कमी वयाच्या तरुणांमध्येही दिसून येत आहेत, अशी माहिती हिलिंग हँड्स क्लिनिकचे संस्थापक आणि अॅनोरेक्टल सर्जन डॉ. अश्विन पोरवाल यांनी दिली….

Read More

MPSC Paper Leak Case Mumbai; 6 Arrested Including Officials & Coaching Head

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केले . या कारवाईमुळे एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील गैरप्रकाराचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. पेपर नेमका कुठून फुटला,…

Read More