Headlines

Rohit Pawar Slams MPSC Over Exam Controversy; Pune Protest Warning

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील गैरप्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात एका उमेदवाराला प . ‘शेतकरी आई-वडिलांनी उसने पैसे आणून मुलांना शिकायला पाठवले’ विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडताना रोहित पवार म्हणाले, “येथे तयारी करणारे अनेक विद्यार्थी शेतकरी…

Read More

मुंबईत कंत्राटदाराची आत्महत्या:महापालिकेचे 2 कोटींचे बिल होते थकीत, वर्षभरापूर्वी पत्रातून मांडली होती व्यथा, गुजरातच्या ठेकेदारांना लगेच पैसे मिळतात- रोहित पवार

शासकीय कामांची बिले वेळेत न मिळाल्याने निर्माण झालेल्या तीव्र आर्थिक संकटातून आणि मानसिक त्रासातून मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या गजानन देवकाते यांनी मुंबई महापालिकेची सुमारे 2 कोटी रुपयांची कामे केली होती. कामे पूर्ण होऊनही बिले मिळवण्यासाठी त्यांना प्रशासकीय कार्यालयांचे खेटे मारावे लागत होते. अखेर सततच्या मानसिक…

Read More

सुट्या तेल विक्रीवरील सरसकट बंदी टळली:तुकाराम मुंढेंच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांचा 'मध्यम मार्ग' काढण्याचा आदेश; 'एसओपी' तयार करणार

राज्यात खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित नियमभंगाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेमुळे सुट्या खाद्यतेलाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर करण्यात आलेल्या कडक कारवाईमुळे छोट्या व्यापाऱ्यांमध्ये आणि रोजच्या गरजेनुसार कमी प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या…

Read More

हडपसर विषारी दारूकांड प्रकरणी दोघांना अटक:21 मृत्यू प्रकरणी मकोका कारवाई; टोळीप्रमुखासह इतरांचा शोध सुरू

विषारी गावठी दारू प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष मकोका न्यायालयाने त्यांना 1 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने सखोल तपासासाठी आरोपींची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. आर्यन संजीव धोत्रे (वय 24) आणि कल्पेश अशोक अग्रवाल (वय 29) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हडपसर पोलिस ठाण्यात दाखल…

Read More

शहा गृहखाते नाही, तर वर्दीतील लोकांची टोळी चालवतात:मोदींना त्यांच्यासोबत काम करायचे नाही, पंतप्रधान थकले- संजय राऊत

अमित शहा हे गृहखाते चालवत नसून एखाद्या गुंडा प्रमाणे वर्दीतील लोकांची टोळी चालवतात असे त्यांच्या विषयी बोलले जाते. या सर्वांचा परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर झाला हे मोदी यांना पटते आहे. कॅबिनेट बदलात जो पर्यंत अमित शहांना बदलले जात नाही तो पर्यंत काही अर्थ नाही, अशी चर्चा दिल्लीतील वर्तुळात सुरू आहे, असे खासदार संजय…

Read More

कुर्डुवाडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बालोद्यानाची झाली दुरवस्था:जुनी खेळणी हटवली, नवीन खेळणी अद्याप बसवली नाहीत; कामावर प्रश्नचिन्ह‎

लहान मुलांच्या किलबिलाटाने आणि आनंदी हास्याने गजबजणारे कुर्डुवाडी शहरातील ऐतिहासिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बालोद्यान आज प्रशासकीय दुर्लक्ष आणि नियोजनाअभावी भकास झाले आहे. शहरातील लहान मुलांसाठी सुरक्षित खेळण्यांची सुविधा जवळपास उपलब्ध नसल्याने ब . जानेवारी २०२१ मध्ये उद्यानाच्या कायापालटासाठी तब्बल एक कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते. या कामामध्ये संरक्षण भिंतीची दुरुस्ती, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, सुशोभीकरणासाठी…

Read More

प्रसारमाध्यमांना सभेत बंदी केल्याने काँग्रेसचे मनपामध्येच थेट धरणे:भाजपने लोकशाहीची हत्या केली: दिवेकर यांचा आराेप‎

प्रसारमाध्यमांना वृत्तसंकलन करण्यासाठी महापालिकेच्या सभागृहात प्रवेश बंदी केल्याच्या कारणावरुन कॉग्रेसने मंगळवारी (दि.२५) मनपा कार्यालयाच्या परिसरात धरणे आंदोलन केले. भारतीय जनता पार्टीने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप यावेळी माजी उपमहापौर निखीलेश दिवेकर यांनी केला. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरासंबंधित महत्वपूर्ण निर्णय होत असतात. यावेळेस सभेत प्रत्यक्ष उपस्थित राहून थेट वृत्तसंकलन करण्याचा पत्रकारांना अधिकार असतो. परंतु नुकतेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी…

Read More

डफरीन फायर स्टेशनमधील ऑटोमॅटिक फायर सेफ्टी यंत्रणा ‘मॅन्युअल’ मोडमध्ये:एसडीओ, तहसीलदारांची पाहणी, समिती आज शहरात‎

जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) एसएनसीयूमध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर डफरीनच्या फायर ऑडिटची मुदत २१ ऑगस्ट रोजी संपल्याचे समोर आले. अमरावतीचे एसडीओ अनिल भटकर आणि तहसिलदार विजय लोखंडे यांना फायर स्टेशन, लिफ्ट आदी ठिकाणांची पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार दोन्ही अधिकाऱ्यांनी डफरीनच्या फायर स्टेशनची पाहणी केली….

Read More

उपक्रम:गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्व पालिका शाळांना सुविधा पुरविणार- आमदार राऊत

सधन कुटुंबातील पालक आपल्या मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी मोठी फी भरतात. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे मोठी फी भरणे शक्य नसलेल्या कुटुंबांतील मुले-मुली नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांनाही खासगी शाळांप्रमाणेच गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी नगरपालिकेच्या शाळांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन…

Read More

‘न्याय मिळेपर्यंत माघार नाही’; पिंपळगाव निपाणीकरांचा आमरण उपोषणाचा एल्गार:वाकचौरे हत्याकांडातील‎सूत्रधारांना अटक‎करण्याची मागणी‎

पिंपळगाव निपाणी येथील सचिन किसन वाकचौरे (वय ३६) हत्याकांडातील खरे सूत्रधार गजाआड होत नाहीत, तसेच परिसरातील अवैध दारू विक्री व खाणपट्टे बंद होत नाहीत, तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे आणि मयत सचिन यांचे बंधू पोपट किसन वाकचौरे यांनी मंगळवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत…

Read More