Headlines

दिशा सालियन मृत्यू:मुंबई पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह, बापाने तरुण मुलगी गमावलीय, आम्हाला राजकारणाशी देणंघेणं नाही

१४ जून रोजी २०२० रोजी आत्महत्या करणारा प्रख्यात अभिनेता सुशांत सिंह राजपूतची तत्कालिन व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वडिलांनी लैंगिक अत्याचार आणि हत्येचा संशय व्यक्त केलेला असताना पोलिसांनी थेट एफआयआर नोंदवून तपास का केला नाही? केवळ सीआरपीसी १७४ (अपघाती मृत्यू ) अंतर्गत मर्यादित चौकशी करत…

Read More

जळगाव जिल्ह्यात दोन हृदयद्रावक घटनांत 6 मृत्यू:एकाची पत्नी, 2 मुलांसह आत्महत्या; दुसऱ्याने मुलासाठी प्राण गमावला

अमळनेर तालुक्यात गुरुवारी घडलेल्या दोन गावांतील वेगळ्या घटनांनी पित्याच्या नात्याचे दोन टोकाचे पैलू समोर आणले आहेत. एका घटनेत बापाने नैराश्यातून पत्नी आणि दोन मुलांसह रेल्वेखाली उडी घेत जीवन संपवले. तर दुसऱ्या घटनेत, पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी बापाने स्वतःचा जीव धोक्यात घातला, मात्र दुर्दैवाने त्यात दोघांचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे अमळनेर तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त…

Read More

अमरावती जिल्ह्यातील 550 ग्रामपंचायत प्रशासकांचा कार्यकाळ संपला:पुढील प्रशासकीय व्यवस्थेसाठी सीईओंचे शासनाकडे मार्गदर्शन

अमरावती जिल्ह्यातील सुमारे ५५० ग्रामपंचायतींच्या प्रशासकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. सार्वत्रिक निवडणुकांना अद्याप वेळ असल्याने, पुढील प्रशासकीय व्यवस्थेबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही, त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार कोण पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील या साडेपाचशे ग्रामपंचायतींचा कार्यकाळ सहा महिन्यांपूर्वीच…

Read More

नेपाळमध्ये अडकलेले अमरावतीचे 4 तरुण सुखरूप:दोन दिवसांनी संपर्क, प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन

नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये अमरावती येथील निवासी श्याम मारोडकर आणि त्याच्या चार मित्रांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. श्यामचे काका गौरव मारोडकर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत कक्षात पोहोचून हे सर्वजण सुखरूप असल्याची पुष्टी केली. गौरव मारोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम आणि त्याचे इतर तीन मित्र नेपाळमध्ये फिरायला गेले होते. प्रवासात त्यांना आणखी काही महाराष्ट्रीयन…

Read More

औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाला मोठी चालना:193 कोटींच्या आराखड्याला मंजुरी, भक्तनिवासासह प्रतीक्षा कक्ष-म्युझियम उभारणार

देशातील आठवे ज्योतिर्लिंग औढा नागनाथ येथे १९३ कोटी रुपयांच्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्याला गुरुवारी ता. २७ शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील काळात भक्तनिवास, प्रतीक्षा कक्ष, म्युझियमसह हरिहर तलावाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. नवीन आराखड्यानुसार भक्तांना दर्शनासाठी कमी वेळ लागेल याबाबतचे नियोजन केले जाणार आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात:डिव्हायडरला धडकून खड्ड्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर वाकसई गावाच्या हद्दीत एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालक जखमी झाला आहे. हा अपघात २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४.१२ वाजण्यापूर्वी सूरज ढाब्यासमोर घडला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत गौतम बरवा (रा. मोशी,…

Read More

सीओईपी वसतिगृह प्रकरणी 100 ते 150 जणांवर गुन्हा:पत्रकार मंदार गोंजारी यांचे नाव समाविष्ट, पत्रकार संघाचा आक्षेप

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वसतिगृह परिसरात विनापरवानगी प्रवेश करून घोषणाबाजी केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एनएसयूआय आणि काँग्रेसच्या सुमारे १०० ते १५० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या एफआयआरमध्ये ‘एबीपी माझा’चे पत्रकार मंदार गोंजारी यांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याने पुणे श्रमिक पत्रकार संघाने तीव्र आक्षेप घेतला आहे. सीओईपीच्या वसतिगृह विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजू तुकारामजी पाचकोर…

Read More

पिंपळवंडी बालिका अत्याचार प्रकरण:सुनेत्रा पवारांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट, आरोपीवर कठोर कारवाईसह फास्ट ट्रॅक खटल्याचे आदेश

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी यासाठी…

Read More

महिला अत्याचाराचे 85 हजार खटले प्रलंबित:उच्च न्यायालयाने 179 फास्ट ट्रॅक न्यायालयांच्या निर्मितीचे दिले आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या प्रलंबित खटल्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाने १७९ फास्ट ट्रॅक न्यायालयांच्या निर्मितीबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत महिलांवरील अत्याचाराचे ८५ हजारांहून अधिक खटले प्रलंबित आहेत. याशिवाय, बालकांवरील लैंगिक अत्याचाराचे (पोक्सो) ४८,३९५ खटले, कौटुंबिक हिंसाचाराची ९७,०२६…

Read More

'आप'ची महापौरांना मागणी: डीजे-डॉल्बीवर स्पष्ट भूमिका जाहीर करा:कायदा पाळणार की कार्यकर्त्यांना वाचवणार, पुणेकरांना सांगा- मुकुंद किर्दत

गणेशोत्सव आणि अन्य मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कर्णकर्कश्य डीजे आणि डॉल्बीवर कायद्याने घालून दिलेल्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करणार की नाही, याबाबत पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली आहे. ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असताना लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत संदिग्ध भूमिका घेऊ नये, असे पक्षाचे महाराष्ट्र…

Read More