Headlines

नाशिकचे रस्ते आज टकाटक झालेत:मुख्यमंत्र्यांनी महिन्यातून एकदा इकडे यायला पाहिजे, छगन भुजबळ यांचा मिश्किल टोला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप-परिसर प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले, ज्याला मंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना मिश्किल टोला लगावत म्हटले की, नाशिकचे रस्ते आज टकाटक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिन्यातून एकदा नाशिकला यायला पाहिजे. आमच्या व्यथा जाणून…

Read More

भाजप प्रदेश कार्यकारिणीची पुण्यात बैठक:मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार, रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच बैठक

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक सोमवारी (दि. ३१) पुण्यात होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे हेही बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी शुक्रवारी पत्रकार…

Read More

पुढची लढाई जिंकायची आहे म्हणून तूर्तास थांबायला हवं:समाजवादी नेते कपिल पाटील यांचं आदिवासी विद्यार्थ्यांना आवाहन

राज्यातील आदिवासी विद्यार्थी आपल्या रास्त आणि न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. पुण्यापासून तास-दीड तासाच्या अंतरावर असलेल्या मांजरी येथील शासकीय वसतिगृहात चार विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. अस्वस्थ व्हायला यासाठी होतं कारण आज या उपोषणाचा 16 वा दिवस आहे, असे कपिल पाटील म्हणाले. पुढे बोलताना कपिल पाटील म्हणाले, आनंद यासाठी आहे की, आंबेडकरी…

Read More

5 वर्षांत 6 लाखांहून अधिक झाडांची अवैध कत्तल:34 कोटींहून अधिक रुपयांच्या वनसंपदेचे नुकसान, राज्याची हरित संपदा धोक्यात

महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड झाली आहे. वनविभागाच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत 6 लाखांहून अधिक झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मौल्यवान सागवान वृक्षांचा समावेश असून, यामुळे राज्याच्या वनसंपदेचे 34 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) कार्यालयाकडून माहिती अधिकारातून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ही आकडेवारी समोर आली…

Read More

येरवडा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या गणेश मूर्तींच्या स्टॉलचे उद्घाटन:माधुरी मिसाळ म्हणाल्या, 'प्रेरणापथ' कैद्यांच्या आयुष्यात नवी पहाट

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींच्या विक्री स्टॉलचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. यावेळी मिसाळ यांनी ‘प्रेरणापथ’ प्रकल्प अंधार आणि निराशेत जीवन जगणाऱ्या बंदी बांधवांच्या आयुष्यात उज्ज्वल भविष्याची नवी पहाट निर्माण करत असल्याचे सांगितले. कारागृह हे केवळ शिक्षा…

Read More

कात्रजमध्ये तीन पिस्तुले, चार काडतुसे जप्त:भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन सराईतांना केली अटक

भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज परिसरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांकडून देशी बनावटीची तीन पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ओंकार उर्फ बब्या संतोष पवार (वय १८, रा. तापकीर चाळ, आंबेगाव पठार, धनकवडी) आणि शिरीष जितेंद्र खोपडे (वय २६, रा. श्री गणेश निवास, आंबेगाव पठार, धनकवडी)…

Read More

सरकार हजारदा चर्चा करायला तयार सरकारची तयारी:विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींना ‘रिलाँच’ करण्याचा काँग्रेसचा डाव- चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रात शासकीय वसतिगृहांच्या प्रवेशातील वयाची अट रद्द करणे, रिक्त पदांची भरती आणि इतर मूलभूत मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे पुणे (मांजरी), नाशिक व नागपूर येथे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू असून, यावरून विरोधकांनी भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार करत म्हटले आहे की, आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करुन…

Read More

डॉ. अनुराग लव्हेकर यांची 'करामसाप'च्या उपाध्यक्षपडी फेरनिवड:वैद्यकीय सेवेसोबतच साहित्य क्षेत्रातही उमटवला ठसा

कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या (करामसाप) बेंगलोर विभागाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत मुळचे नांदेड येथील प्रसिद्ध पचनसंस्था विकारतज्ञ डॅा. अनुराग लव्हेकर यांची उपाध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली आहे. डॅा. अनुराग लव्हेकर यांचे ‘वसुंधरेचे शोधयात्री’ हे पुस्तक अल्पावधीत लोकप्रिय झाले असून साहित्यिक वर्तुळात या पुस्तकाची चर्चा आहे. आस्वादक समीक्षेचे पुस्तकांवरील पुस्तक…

Read More

Urgen Art Festival 2026 in Pune

पुण्यात 1 ते 3 सप्टेंबरदरम्यान ‘उर्गेंन आर्ट फेस्टिव्हल 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. करुणादिप फाउंडेशन आणि त्रिरत्न वैरोचना सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हा तीन दिवसीय महोत्सव पार पडणार आहे. यात चित्रप्रदर्शने, ध्यान कार्यशाळा, कलाकार व साहित्यि . या महोत्सवाची माहिती माजी चीफ मेडिकल ऑफिसर, डिफेन्स इस्टेट आणि करुणादीप फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. जीवक उर्फ व्ही….

Read More

Kaustubh Gavde Announced as TDF Candidate for Pune Teacher Constituency 2026

पुणे विभाग शिक्षक-पदवीधर मतदारसंघ 2026 साठी टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट (टीडीएफ) म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीने आज आपल्या पुरस्कृत उमेदवाराची घोषणा केली. कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ म . यावेळी शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी. के. थोरात (पुणे), कार्याध्यक्ष नरसु पाटील (कोकण), कार्यवाह के. एस. ढोमसे (पुणे), पुणे विभाग अध्यक्ष…

Read More