Headlines

नागपूर महापालिकेच्या सभेत मराठीवरून गदारोळ:हिंदीत बोलण्यावर आक्षेप, सभा 10 मिनिटांसाठी तहकूब

नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मराठी भाषेच्या वापरावरून मोठा गदारोळ झाला. या वादानंतर सभा १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. विशेष म्हणजे, या घटनेमुळे काँग्रेसमधील नेत्यांच्या परस्परविरोधी भूमिका समोर आल्या. राज्यात मराठी भाषेच्या सक्तीवरून राजकीय वातावरण तापले असतानाच, महापालिकेच्या सभेतही याचा प्रत्यय आला. कामकाजादरम्यान, भाजपच्या शिक्षण समिती सभापती संतोषी नड्डा यांनी एका विषयावर हिंदी भाषेत भाष्य केले….

Read More

चर्चगेट-बोरिवली लोकलमध्ये धक्कादायक प्रकार:प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून फेकले, गंभीर जखमी; आरोपीला ठोकल्या बेड्या

पश्चिम रेल्वेवर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वांद्रे आणि माहिम स्थानकांदरम्यान एका चालत्या लोकलमधून प्रवाशाला खाडीत फेकून दिल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. नेमके काय घडले? रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चर्चगेट-बोरिवली या धीम्या मार्गावरील…

Read More

पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 67 लाखांची फसवणूक:सिंहगड रस्ता पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला

पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गेल्या दोन वर्षांपासून घडत होती. या प्रकरणी एका २२ वर्षीय तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, संजय अनंता भालेराव, शिवानंद बाळासाहेब पाटील (दोघे रा. कर्वेनगर), अमित दारवटकर, आनंद लोंढणवार आणि अमित…

Read More

राजीव गांधींच्या विचारांची देशाला आजही गरज:बी. संदीप यांचे प्रतिपादन; जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सकारात्मक आणि विकासाभिमुख विचारांची देशाला आजही गरज आहे. त्यांच्या विचारांवर वाटचाल करून त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध झाले पाहिजे, असे मत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. संदीप यांनी व्यक्त केले. राजीव गांधी स्मारक समितीतर्फे राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयासमोरील त्यांच्या पुतळ्यास…

Read More

पुण्यात 23 ऑगस्टला 361 दिव्यांगांना कृत्रिम अवयव:नारायण सेवा संस्थानतर्फे मोफत शिबिराचे आयोजन

पुण्यात २३ ऑगस्ट रोजी नारायण सेवा संस्थानतर्फे दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव रोपण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात ३६१ पूर्वनिवडीत लाभार्थींना ३डी-प्रिंटेड नारायण मॉड्युलर कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साधने दिली जाणार आहेत. उदयपूर येथील नारायण सेवा संस्थान, टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस आणि न्यूमन अँड एस्सार ग्रुप यांच्या सहकार्याने हे शिबिर होणार आहे. हे शिबिर…

Read More

मराठी न बोलण्याच्या हट्टावर सरकार कारवाई करणारच:छगन भुजबळांचा इशारा, म्हणाले- मी भगवद्गीता पूर्ण वाचली नाही, तरीही तुमच्यासमोर खंबीरपणे उभा

राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांच्या झालेल्या नियुक्तीचे त्यांनी स्वागत केले, तर इस्कॉन मंदिराच्या अध्यक्षांनी केलेल्या एका विधानावर त्यांनी आपल्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिले. गिरीश महाजनांना आमचे पूर्ण सहकार्य! गेल्या १९ महिन्यांपासून रखडलेल्या नाशिकच्या पालकमंत्रीपदाची धुरा अखेर…

Read More

Maharashtra Government Approves Free School Bags for Students

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांतर्गत आता मोफत शालेय दप्तर देण्यात येणार आ . या निर्णयामुळे जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दप्तर…

Read More

छत्रपती संभाजीनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा:आंतरराष्ट्रीय तलवारबाजीत बिडकीनच्या तेजस पाटीलने पटकावली 3 पदके

बिडकीन येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) मनोज पाटील यांचे सुपुत्र तेजस पाटील यांनी नायजेरिया येथे झालेल्या कॉमनवेल्थ आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. तेजस यांनी या स्पर्धेत तब्बल तीन आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई केली असून, त्यांच्या या यशाबद्दल बिडकीन पोलीस ठाण्यात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला….

Read More

पुण्यात 'एएनटीएफ'ची कारवाई:कोंढव्यात अडीच किलो गांजा जप्त; सराईतासह 30 जण ताब्यात, खरेदीदारांची कसून चौकशी

कोंढवा परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANTF) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला असून, एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. गांजा खरेदीसाठी आलेल्या सुमारे 30 जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणी गणेश पाटोळे आणि आजू अहमद शेख यांना ताब्यात घेण्यात आले आहे….

Read More

अनैतिक संबंधांच्या वादातून खारमध्ये मजुराची हत्या:अल्पवयीन पुतण्यानेच केला काकाचा खून; सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला मृतदेह

खार पश्चिमेतील रोड क्रमांक 7 वर असलेल्या एका बांधकाम साईटवर 35 वर्षीय मजुराची निर्घृण हत्या करून मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवल्याची घटना उघडकीस आली आहे. खार पोलिसांनी अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला असून, मृताच्या 17 वर्षींय अल्पवयीन पुतण्यानेच हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. अनैतिक संबंधांच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला…

Read More