Headlines

ऐन सणात साखर महाग:साखरेचा 80 रुपये किलोचा कडू डोस म्हणजे 20,000 कोटींचा काळाबाजार; शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा आरोप

देशात आणि राज्यात सध्या वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच अवघ्या 3 महिन्यांत साखरेच्या किमती तब्बल 40% ने वाढल्याने किरकोळ बाजारात साखरेने 80 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे. साखरेच्या या ऐतिहासिक दरवाढीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. “देशात साखरेचा पुरेसा साठा शिल्लक असतानाही झालेली ही दरवाढ…

Read More

वानवडीतील लष्कराच्या रुग्णालयातील मेसमधून 65 हजारांची रोकड चोरीला:अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यातील वानवडी येथील लष्कराच्या वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारातील मेसमधून चोरट्यांनी 65 हजार रुपयांची रोकड लांबवली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. कॅप्टन लक्ष्मी एस (वय 29, रा. ऑफिसर्स मेस, कमांड हॉस्पिटल आवार, वानवडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ही घटना कमांड हॉस्पिटलच्या आवारातील ऑफिसर्स मेसच्या…

Read More

अमेरिकेने RSS ला दहशतवादी संघटना घोषित केले:नाना पटोले यांचा खळबळजनक दावा, राम मंदिर निधीवरूनही केले गंभीर आरोप

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप केला आहे. “अमेरिकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले आहे,” असा धक्कादायक दावा पटोले यांनी केला आहे. तसेच, संघाच्या जागतिक स्तरावरील आर्थिक व्यवहारांवर आणि बँक खात्यांवरही त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून राम मंदिराच्या निधीवरून संघावर सडकून टीका…

Read More

आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना लवकरच जमीन:राज्यपालांच्या सहीनंतर वाटप सुरू होणार

श्रीरामपूर शेती महामंडळाच्या हरिगांव मळा कार्यक्षेत्रातील सर्व जमिनीचा सर्वे नंबर नकाशा तयार करण्यात आला असून अकारी पडीत शेतकऱ्यांचे वारसासाठी हरिगांव ३ हजार व अन्य महामंडळ हद्दीत १ हजार ५०० एकर जमीन राखीव ठेवण्यात येऊन उर्वरित जमीन उद्योगांना देण्याचे निश्चित झाले आहे. २५ तारखेच्या मंत्रिमंडळ बैठकीत आकारी पडीत जमीन वाटपासंदर्भात नवीन प्रस्ताव मंजूर करून राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी…

Read More

लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना धडा शिकवणारे अधिकारी हवे:माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे प्रतिपादन, तीन यशस्वी स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा सत्कार‎

लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रशासनात तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची गरज आहे. ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थी प्रशासनात जावेत, यासाठी त्यांना योग्य सुविधा आणि प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, . स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांनी पूर्ण वेळ, संयम आणि विश्वास द्यावा. आत्मविश्वासाने व सातत्याने अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते. अध्यात्म आणि शिक्षणाच्या माध्यमातून…

Read More

चिंता वाढली:पावसाची दडी; पिके करपण्याच्या मार्गावर, उत्पादनात घटीची भीती, विहीर-बोअरच्या पाण्यावर पिके वाचवण्याची शेतकऱ्यांचंी धडपड‎

श्रीगोंदे तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. पेरणीनंतर काही काळ समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतातील पिके कोमेजू लागली आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकरी विहिरी, बोअर तसेच उपलब्ध पाणीस्रोतांचा आधार घेत असले तरी मर्यादित पाणीसाठ्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी…

Read More

2 ट्रक उलटले; नगर-पुणे मार्ग साडेसहा तास ठप्प:सुपे पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवून मोठी कोंडी टाळली‎

अहिल्यानगर-पुणे महामार्गावर जातेगाव (पारनेर) शिवारात गुरुवारी (२०) सकाळी सहाच्या सुमारास दोन ट्रक उलटल्याने महामार्गावरील वाहतूक दोन्ही दिशांनी तब्बल साडेसहा तास ठप्प झाली. मात्र, सुपे पोलिसांनी परिस्थितीचा अंदाज घेत तातडीने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवल्याने मोठ्या प्रमाणावर होणारा वाहतूक खोळंबा टळला. दुपारी साडेबारा वाजता अपघातग्रस्त ट्रक हटविल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणारा ट्रक…

Read More

कुर्डुवाडीत मोकाट श्वानांचा उच्छाद थांबेना शाळकरी मुलांसह वाहनचालकांना धोका:शहरातील नागरिकांमध्ये संताप, नगरपालिका प्रशासनाची डोळेझाक‎

शहरात सध्या मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वसामान्य नागरिक तीव्र भीतीच्या छायेत वावरत आहेत. मात्र, या अत्यंत गंभीर समस्येकडे नगरपालिका प्रशासन डोळेझाक करत असून, केवळ कागदी घोडे नाचवून वेळकाढूपणा कर . ​शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर मोकाट कुत्र्यांचे जत्थेच्या जत्थे फिरताना दिसत आहेत. हे कुत्रे चालत्या वाहनांवर झडप घालत असल्यामुळे अनेकदा…

Read More

श्रींच्या ‘महावस्त्र महासेल’मधून 3.52 लाख उत्पन्न:पंढरपुरात साड्या, देवाच्या वस्त्रांच्या खरेदीसाठी शेकडो महिला भाविकांची उडाली झुंबड‎

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने, श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या महावस्त्रांचा ‘महासेल’ श्री संत तुकाराम भवन येथे सुरू झाला आहे. सुरुवातीच्या दोन्ही दिवशी या सेलला भाविक आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. देवाचे वस्त्र आपल्या घरात असावे या श्रद्धेने आणि भावनेने शेकडो महिला व पुरुषांची खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी…

Read More

नीलगाय, रानडुकरांनी फस्त केलेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या

अमरावती जिल्ह्याच्या बहुतेक भागातील शेतकऱ्यांना रोही, नीलगाय, रान डुकरे व अन्य वन्य प्राण्यांच्या हैदौसामुळे पीक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सदर वन्य प्राण्यांमुळे शेतीचेही प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी मानव-प्राणी संघर्षही होत आहे. त्यामुळे शेतीपिकांसह जीवितहानीही होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासोबतच संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी…

Read More