लोकसभा सचिवालयाने 20 बंडखोर TMC खासदारांना नोटीस पाठवल्या:7 दिवसांत उत्तर मागितले; अभिषेक बॅनर्जींनी अपात्र ठरवण्याची मागणी केली
लोकसभा सचिवालयाने बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोर खासदारांना नोटिसा पाठवल्या आहेत. खासदारांना टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या अपात्रता याचिकेवर 7 दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. ही याचिका पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत दाखल करण्यात आली आहे. नोटिसा 25 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आल्या असून, त्यात बॅनर्जींच्या 18 जूनच्या याचिकेची प्रतही पाठवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बॅनर्जींच्या याचिकेवर सुनावणी…