राजस्थान एक्सप्रेसवेवरून ट्रॅव्हलर नाल्यात कोसळली, 8 जणांचा मृत्यू:मध्य प्रदेशातून खाटूश्यामजीकडे जात होती मिनी बस; जखमींना काच फोडून बाहेर काढले
कोटामध्ये दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवर 25 पेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेली मिनी बस (टेम्पो ट्रॅव्हलर) नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत मध्य प्रदेशातील बैतूल येथील रहिवासी असलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी 6 वाजता सिमलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. SHO नंद सिंह यांनी सांगितले की, बस भोपाळहून खाटूश्यामजीला जात होती. कराडिया टोलपासून काही किलोमीटर अंतरावर ती पुलावरून…