Headlines

Danger zone, 34 km route to Gangotri takes three hours!, Dharali disaster signs, cupboards open on 19th


  • Marathi News
  • National
  • Danger Zone, 34 Km Route To Gangotri Takes Three Hours!, Dharali Disaster Signs, Cupboards Open On 19th

मनमीत11 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

गेल्या वर्षी उत्तराखंडमधील धराली येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे गंगनानी ते गंगोत्री धामपर्यंतचा सुमारे ४६ किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन व राज्य सरकारची अनेक पथके सध्या हा रस्ता तयार करण्यात व्यग्र आहेत.कारण १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेत सर्वात आधी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचेच कपाट उघडणार आहेत.

मी सध्या उत्तरकाशीजवळील सेरा रतूडी येथे आहे. तेथून १०० मीटरचा मोठे भूस्खलन क्षेत्र सुरू होते. गंगोत्रीपर्यंत असेच ८ डेंजर झोन तयार झाले आहेत. त्यांची सुरक्षा पथके सध्या दुरुस्ती करत आहेत. सेरा रतुडीपासून पुढे भटवाडी, उजेली आणि गंगोरीकडे गेल्यावर धराली आपत्तीच्या खुणा दिसू लागतात. यामध्ये उद्ध्वस्त झालेल्या रस्त्याशेजारील संरक्षक भिंत अजूनही तशीच पडून आहे. स्वारीगाडमध्ये एक व्हॅली ब्रिज पूर्णपणे नष्ट झाला होता. येथे बीआरओ नव्याने ८५ मीटर लांब स्टील सुपर स्ट्रक्चर ब्रिज बांधत आहे. तोपर्यंत एका पर्यायी रस्त्याचा वापर केला जात आहे. यानंतरचा पूर्ण रस्ता केवळ २ ते ३ मीटरच रुंद आहे, कारण आपत्तीत पक्का रस्ता वाहून गेल्यानंतर बीआरओने डोंगर कापून रस्ता तयार केला आहे. तेथून एका वेळी एकाच बाजूने फक्त एकच गाडी जाऊ शकते. तर दरवर्षी गंगोत्रीसाठी शेकडो बस हजारो प्रवाशांना घेऊन पोहोचतात. गेल्या वर्षापर्यंत येथे काही ठिकाणी रस्ता रुंद होता, दोन गाड्या एकाच वेळी ये-जा करू शकत होत्या. पण आता तसे नाही. गंगनानी ते धरालीपर्यंतचा सुमारे ३४ किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे आकुंचन पावलेला आहे.

एका बाजूला कच्चे डोंगर व दुसरीकडे अरुंद भागीरथी नदी. हे अंतर कापण्यासाठी साधारण ३ ते ४ तास लागत आहेत. पूर्वी केवळ दीड-दोन तासांत गंगोत्रीला पोहोचता येत होते. तरीही, खराब हवामानाची स्थिती उद्भवल्यास गंगोत्रीच्या या खचलेल्या भागातून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढता यावे यासाठी राज्य सरकार मदत आणि बचाव कार्यकर्त्यांची वारंवार मॉक ड्रिल करून घेत आहे. या रस्त्यावरील सर्वात मोठे आव्हान डबरानीचा रस्ता आहे. गेल्या वर्षी त्याचा ५०० मीटरचा भाग पूर्ण संपला होता. आजतागायत तयार होऊ शकलेला नाही. निसर्गाने येथे कसा उत्पात माजवला आहे, हे पाहून तुम्ही हादरून जाल. तुटलेले लोखंडी अवजड पूल, ढिगाऱ्यासह विशाल खडक आणि बरेच काही तिथे दिसेल. नदी तिच्या ठराविक मार्गापासून २० मीटर डावीकडे सरकली आहे. जमीन आजही सतत खचत आहे. चारधाम यात्रेच्या संपूर्ण हंगामात हा रस्ता चालू ठेवणे बीआरओसाठी आव्हान असणार आहे. डबरानीच्या पुढे सुक्खी टॉपवरून जेव्हा हर्षिलला पोहोचतो. उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार यात्रेदरम्यान आपत्तीचा सामना करण्यासाठी एसडीआरएफ व एनडीआरएफच्या दोन टीम तैनात राहतील.

डेंजर झोन, अनेक ठिकाणी रस्ते खचत आहेत

आता यमुनोत्री मार्गाबद्दल बोलूया. गेल्या वर्षी हा रस्ताही अनेक किलोमीटरपर्यंत खराब झाला होता. या वेळी येथे धरासू बँडपासून एनएच १३४ वर तुम्ही जसे पुढे जाता तिथे कुठे उत्तम रस्ता तर कुठे शेकडो खड्डे दिसतील. धरासूच्या पुढचा हा संपूर्ण डोंगराळ मार्ग संवेदनशील क्षेत्रात येतो. तेथे १० भूस्खलन झोन चिन्हांकित करण्यात आले आहेत. पुढे गेल्यावर असनोरगाड आणि वाडियामध्ये पावसाळी नाल्यांनी हायवेची स्थिती बिघडवली आहे पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता खचला आहे. काही ठिकाणी दुरुस्ती सुरू आहे. प्रवासाचा सर्वात संवेदनशील भाग बरकोट ते हनुमान चट्टीदरम्यानचा आहे . आपण हनुमान चट्टी आणि फूल चट्टीला पोहोचतो तेव्हा गाडीचा वेग १० ते २० वर येतो. इथून अजून वर गेल्यावर पालीगाड ते जानकी चट्टीदरम्यान हायवे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पण यात्रा सुरू होईपर्यंत ते पूर्ण होणे कठीण आहे . अनेक ठिकाणी रस्ता ३ मीटरपर्यंतच रुंद आहे.

मेहनत… धरालीपर्यंत नवीन रस्त्याचे काम सुरू

नोंदणीत घट : गंगोत्री धामसाठी आतापर्यंत केवळ २.६२ लाख भाविकांनीच यात्रा नोंदणी केली आहे, तर यमुनोत्रीसाठी २.५० लाख झाली आहे. गेल्या वर्षी या वेळेपर्यंत दोन्ही धामांसाठी ७ लाखांहून अधिक नोंदणी झाली होती. या वेळी चारधाम यात्रेत १४ लाख नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी या वेळेपर्यंत ही संख्या २८ लाख होती.

उद्याच्या अंकात वाचा... केदारनाथमध्ये बर्फ जास्त, वरचे रस्ते बंद, बद्रीनाथमध्ये सर्व ठीक

उद्याच्या अंकात वाचा… केदारनाथमध्ये बर्फ जास्त, वरचे रस्ते बंद, बद्रीनाथमध्ये सर्व ठीक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *