Headlines

Flights from Saudi Arabia suspended; Sankranti, attacks at airport, travel families worried about festivals of 10 lakh people in Kerala


  • Marathi News
  • National
  • Flights From Saudi Arabia Suspended; Sankranti, Attacks At Airport, Travel Families Worried About Festivals Of 10 Lakh People In Kerala

केए शजी | तिरुवनंतपुरम14 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

सौदी अरेबियाचे रियाध विमानतळ क्षेपणास्त्र-ड्रोन हल्ल्यांमुळे अनिश्चित काळासाठी बंद आहे. याचा परिणाम हजारो किलोमीटर दूर भारतातील केरळममध्ये दिसून येत आहे. सौदी अरेबियात राहणाऱ्या केरळमच्या सुमारे १० लाख लोकांचे सणासुदीचे नियोजन रखडले आहे. नवरात्र, दिवाळी आणि ख्रिसमसनिमित्त त्यांच्या भारतात येण्यावर चिंतेचे सावट पसरले आहे. अनेकांनी आगाऊ बुकिंग केले होते. विमान कंपन्यांनी बुकिंगचा परतावा आणि उड्डाणांचे वेळापत्रक बदलून देण्याचे आश्वासन दिले असले तरी आपल्या माणसांना भेटण्याचा आनंद सध्या हिरावला गेला आहे.

केरळम आणि सौदी अरेबियाला जोडणारी उड्डाणे विस्कळीत झाली असून हजारो प्रवासी कुटुंबे आपल्या माणसांच्या सुरक्षिततेबद्दल आणि घरी परतण्याबद्दल चिंतेत आहेत. कोची, कोझिकोड आणि कन्नूर येथून जाणारी उड्डाणे रद्द झाल्यामुळे सेवा कधी पूर्ववत होतील हेदेखील प्रवाशांना सांगितले जात नाहीये.

९० लाख भारतीयांच्या नोकऱ्यांवर संकट वाढेल

आखातात २८ फेब्रुवारीपासून सुरू असलेले अमेरिका-इराण युद्ध तिथे राहणाऱ्या सुमारे ९० लाख भारतीयांच्या नोकऱ्यांवर गदा आणणारे ठरणार आहे. सौदी अरेबिया आणि यूएईमध्येच सुमारे ६० लाख भारतीय राहतात. सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे १० लाख भारतीय मायदेशी परतले आहेत. जास्त मनुष्यबळावर आधारित कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. तसेच भारताला आखाती देशांकडून दरवर्षी मिळणाऱ्या सुमारे ५ लाख कोटींच्या रेमिटन्सवरही (परकीय चलन) परिणाम होईल. रेमिटन्समुळे केरळमला सर्वाधिक फटका बसणार आहे.

व्यथा… कोणाला नोकरीवर रुजू होण्यासाठी जायचे, तर कोणाला कुटुंबाला भेटायचे होते

कोचीमध्ये राहणाऱ्या प्रकासमचे म्हणणे आहे की, त्याला सौदी अरेबियातील एका कंपनीकडून जॉयनिंग लेटर मिळाले होते. १० ऑक्टोबरला जायचे होते, पण अचानक उड्डाणे बंद झाली. आता सौदी अरेबियाला कधी जाता येईल हे माहीत नाही, असे प्रकासम म्हणतो. एका बहुराष्ट्रीय कंपनीत त्याला बऱ्याच काळानंतर ऑफर मिळाली होती. कोचीच्या सतीशचे म्हणणे आहे की, त्याचा मोठा भाऊ सौदी अरेबियात राहतो, बऱ्याच काळानंतर तो त्याला भेटण्यासाठी रियाधला जाणार होता, पण सर्व नियोजन फसले. सतीशची आई रियाधमध्ये राहते. केरळमचे अनेक लोक सौदी अरेबियात आरोग्यसेवा, बांधकाम, रिटेल, हॉटेल, ट्रान्सपोर्ट, अभियांत्रिकी, आयटी आणि घरगुती सेवांमध्ये काम करतात. हे सर्वजण आता संभ्रमात आहेत. वर्षानुवर्षे अत्यंत सुरक्षित असलेले आखाती देश आता खूपच असुरक्षित झाले आहेत.

होर्मुझमध्ये २ जहाजांवर हल्ले; २१ भारतीयांना वाचवले, २ बेपत्ता

मस्कत/नवी दिल्ली | भारतीय क्रू असलेल्या, निकारागुवा देशाचा ध्वज असलेल्या एमटी पेट्रो डॉल्फिन या जहाजावर होर्मुझमध्ये रविवारी ड्रोनने हल्ला झाला. १२ पैकी १० भारतीय खलाशांना वाचवण्यात आले असून वीर बहादूर यादव आणि अमित सिंग हे खलाशी बेपत्ता आहेत. रविवारी मार्शल आयलंडचा ध्वज असलेल्या वाल्थेरा जहाजावरही हल्ला झाला. यावरील सर्व ११ भारतीय खलाशांना वाचवण्यात आले. भारताने या हल्ल्यांचा निषेध केला असून मस्कत येथील भारतीय दूतावास खलाशांच्या सुरक्षेसाठी ओमानच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *