महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेत उघडकीस आलेल्या पेपरफुटीच्या प्रकारामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीक
.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही लढा सुरूच
तत्पूर्वी, बुधवारी (३० सप्टेंबर) विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मांडल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सचिवाची बदली आणि अध्यक्षांची न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर काही प्रतिनिधींनी २ ऑक्टोबरचे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र, गुरुवारी सायंकाळी इंदुलाल कॉम्प्लेक्स येथे जमलेल्या बहुतांश परीक्षार्थींनी ही तडजोड अमान्य करत अध्यक्षांच्या तडकाफडकी राजीनाम्याची मागणी लावून धरली. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेतून राजीनाम्याचा कोणताही ठोस निर्णय न निघाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि थेट पुलावरच आंदोलन सुरू केले.
‘राजीनाम्याशिवाय माघार नाही’ : रोहित पवार
आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना आमदार रोहित पवार यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. “एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा ही विद्यार्थ्यांची प्रमुख आणि न्याय्य मागणी आहे. मात्र, राज्य सरकार या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. म्हणूनच आम्ही विद्यार्थ्यांसोबत एस. एम. जोशी पुलावर सत्याग्रह सुरू केला आहे. जोपर्यंत अध्यक्षांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत या सत्याग्रहातून कोणीही माघार घेणार नाही,” अशी आक्रमक भूमिका रोहित पवार यांनी स्पष्ट केली.
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पत्रकाराला मारहाण; ‘आंदोलनात मुद्दाम घुसवल्याचा संशय’, रोहित पवारांचा ABVP कार्यकर्त्यावर आरोप

रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एका पत्रकाराला कथितरित्या मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप केला आहे. संबंधित तरुण हा ABVPचा कार्यकर्ता असल्याचा दावा करत, त्याला आंदोलनात मुद्दाम घुसवण्यात आल्याचा संशय असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. या तरुणाला तत्काळ अटक करण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे केल्याचे आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजत असल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात घुसून माध्यम प्रतिनिधींशी अशा प्रकारे गैरवर्तन करणाऱ्यांचा जाहीर निषेध करत, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे आणि विश्वजीत कदम देणार भेट
या आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेत, आज खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हेदेखील आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दर्शवणार आहेत. दरम्यान, सर्व स्पर्धा परीक्षा या केवळ ‘ऑफलाइन’ (Offline) पद्धतीनेच घेण्यात याव्यात आणि इतर परीक्षांमध्येही पेपरफुटीचे प्रकार झाले आहेत का, याची सखोल चौकशी व्हावी, या आपल्या मागण्यांवरही विद्यार्थी ठाम आहेत. पुण्यात सुरू असलेल्या या रात्रंदिवस सत्याग्रहामुळे आता प्रशासनावर आणि राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
———
ही बातमी पण वाचा..
मुंबईत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन:मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत 11 मेट्रो स्थानके बंद

कॉकरोच जनता पार्टी आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून मुंबईतील शिवाजी पार्क येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार आहे. CJPचे संयोजक अभिजीत दीपके यांनी 24 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन ज्ञानेश कुमार हे या देशातील सर्वात मोठे देशद्रोही असल्याचे म्हटले होते. लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. सविस्तर वाचा