“राज्यात यंदा 1972 पेक्षाही अधिक भयानक आणि दाहक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी ‘अल निनो’चा इशारा दिला होता; तरीही शेतकऱ्यांना महागडी खते, बनावट बियाणे विकून आधी लुटले आणि आता उभी पिके जळत असताना धरणांवर पोलीस बं
.
नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी राज्यातील तीव्र दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, केंद्रीय निवडणूक आयोगातील गैरव्यवहार, धान-भरडाई महाघोटाळा, महायुतीतील अंतर्गत धुसफूस आणि ‘लाडकी बहीण’ योजनेवरून सरकारची दुटप्पी वृत्ती यावर सविस्तर भाष्य करत महायुती सरकारची कोंडी केली.
धरणांवर बंदुका कशासाठी? तातडीने 3 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा!
दुष्काळाच्या भयानक स्थितीवर आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर बोलताना पटोले म्हणाले, “महसूलमंत्री बावनकुळे आता म्हणत आहेत की परिस्थिती कोरोनापेक्षा भयंकर आहे. जर ‘अल निनो’मुळे पाऊस पडणार नाही हे आधीच ठाऊक होते, तर शेतकऱ्यांना पिके लावू का दिली? आधी महागडी खते, बियाणे आणि डिझेलच्या दरात लूट करायची आणि आता शेतकरी पाण्यावाचून तडफडत असताना धरणांवर महसूल आणि पोलिसांचा पहारा लावायचा, हे काय चालले आहे? माणसाला अन्नधान्य कुठूनही आणता येईल, पण पिण्याचे पाणी कुठून आणणार?”
“राज्यातील बळीराजा आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशा वेळी राज्यपालांकडे जाऊन टाईमपास करण्यापेक्षा सरकारने दुष्काळ आणि शेतकरी संकटावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे तातडीने किमान 3 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे.”

भुजबळ साहेब, राईस मिलर्सशी असलेले संगनमत बाजूला सारा!
अन्न व नागरी पुरवठा विभागातील रेशन आणि भात भरडाई घोटाळ्यावर पटोले यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावर थेट तोफ डागली. “गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात बोगस धान खरेदी आणि भरडाईचा कोट्यवधींचा महाघोटाळा सुरू आहे. छत्तीसगडमधून बोगस धान आणून राज्याच्या तिजोरीत डल्ला मारला जात आहे. नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने 1800 पानांचा सविस्तर अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये आकाश अग्रवाल आणि इतर घोटाळेबाजांचे कारनामे उघडे पडले आहेत. मात्र, सरकारने ईओडब्ल्यूची (EOW) चौकशी सकाळी लावली आणि संध्याकाळी रद्द केली. हा अहवाल भुजबळ सार्वजनिक का करत नाहीत?”
गरिबांच्या तोंडचा घास पळवला
“आश्रमशाळा, सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे आणि रेशन दुकानांमध्ये हाच निकृष्ट दर्जाचा, रिसायकल केलेला तांदूळ पुरवला जात आहे. गरिबांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या या राईस मिलर्सना सत्ताधारी आमदार पाठीशी घालत आहेत. ‘कुंपणच शेत खात आहे’ अशी ही परिस्थिती असून, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोलीचे आमचे खासदार हा मुद्दा संसदेतही लावून धरतील.”
निवडणूक आयोगाचा बुरखा फाडला; संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस रस्त्यावर!
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील ‘एसआयआर’ (SIR) मोहिमेवरून त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. “मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून लोकशाही संपवण्याचा डाव सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने फॉर्म ६ मधील बदलांवरून निवडणूक आयोगाचे कान उपटले आहेत. राहुल गांधी यांनी मांडलेली आकडेवारी कशी खरी आहे, हे आता समोर आले आहे.”
सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा
“देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान ७५ वर्षे जपणारी काँग्रेस पार्टी लोकशाहीची हत्या होताना शांत बसणार नाही. ज्ञानेश कुमार आणि मोदी-शाहांच्या हुकूमशाहीविरोधात जो कोणी रस्त्यावर उतरेल, त्या प्रत्येक आंदोलनाला आणि सीजेपीच्या 8 ऑक्टोबरच्या आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा राहील.”
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; भाजपचा अन्याय सहन न झाल्यानेच चिवटेंची उमेदवारी!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट आणि पुण्यातील बंडखोरीवर पटोले म्हणाले, “भाजपच्या दबावामुळे आणि अन्यायामुळेच एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीत जाऊन हजेरी लावत आहेत. पुण्यात मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणे, हे महायुतीमधील खदखद आणि टोपेबाजीचे उघड लक्षण आहे. सत्तेत असूनही शिंदे गटाला गृहीत धरले जात असल्यानेच हे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.”
लाडकी बहीण योजनेवर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा दाखला
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत पटोले यांनी सरकारचा पर्दाफाश केला. “मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः कबूल केले आहे की ‘लाडली बहना’ योजना राज्याला अत्यंत महागात पडत आहे. मतांसाठी तिजोरी लुटायची, खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवायची आणि सत्ता आल्यानंतर महिलांच्या हक्काच्या योजना बंद करायच्या, हा भाजपचा ठरलेला फॉर्म्युला आहे. भाजप हा जुमलेबाज आणि खोटारड्यांचा सरदार आहे,” असा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी शेवटी केला.
———————————————–
हेही वाचा…
ज्ञानेश कुमार भाजपच्या ताटाखालचे मांजर: विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र, धरणांवर पोलीस पहारा लावण्याची वेळ येणे सरकारच्या नाकर्तेपणाचा पुरावा!

“केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देशात लोकशाही संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांजर होऊन काम करत आहेत. मतदार यादीतील ‘फॉर्म 6’ मधील नियमबाह्य बदलांना सुप्रीम कोर्टाने मान्यताच दिली नव्हती, हे उघड झाल्यानंतर आता कोर्टानेही निवडणूक आयोगाचा खोटेपणा उघडा पाडला आहे. न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या अशा अधिकाऱ्याला मुख्य निवडणूक आयुक्तपदावर राहण्याचा एक मिनिटही अधिकार नाही. मोदी सरकारने जर त्यांना तात्काळ हटवले नाही, तर ज्ञानेश कुमार यांच्यासह मतचोरी करणाऱ्या या सरकारलाही सत्तेवरून घालवण्यासाठी देशभरात विराट जनआंदोलने पेटतील,” असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. ज्ञानेश कुमार भाजपच्या ताटाखालचे मांजर;:विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र, धरणांवर पोलीस पहारा लावण्याची वेळ येणे सरकारच्या नाकर्तेपणाचा पुरावा!
नागपूर6 मिनिटांपूर्वी

“केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देशात लोकशाही संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांजर होऊन काम करत आहेत. मतदार यादीतील ‘फॉर्म 6’ मधील नियमबाह्य बदलांना सुप्रीम कोर्टाने मान्यताच दिली नव्हती, हे उघड झाल्यानंतर आता कोर्टानेही निवडणूक आयोगाचा खोटेपणा उघडा पाडला आहे. न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या अशा अधिकाऱ्याला मुख्य निवडणूक आयुक्तपदावर राहण्याचा एक मिनिटही अधिकार नाही. मोदी सरकारने जर त्यांना तात्काळ हटवले नाही, तर ज्ञानेश कुमार यांच्यासह मतचोरी करणाऱ्या या सरकारलाही सत्तेवरून घालवण्यासाठी देशभरात विराट जनआंदोलने पेटतील,” असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी