पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ देऊ नका:मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश; दिंडोरी तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा
तालुक्यातील मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी विविध विभागांना सतर्क राहून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीस उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, मुख्याधिकारी…