Headlines

थायलंडच्या ‘सायबर गुलामगिरी’तून भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्राची मोहीम:खा. अशोक चव्हाणांच्या पत्राची दखल; बीडच्या तरुणांचा समावेश

म्यानमार आणि थायलंडच्या सीमेवर ‘सायबर गुलामगिरी’च्या भयंकर विळख्यात अडकलेल्या शेकडो भारतीय तरुणांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. थायलंड आणि म्यानमारमधील स्थानिक सुरक्षा यंत्रणांना सोबत घेऊन ही आंतरराष्ट्रीय बचाव मोहीम राबवली जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, नाशिक, सातारा जिल्ह्यांतील तरुणांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे यासंदर्भात…

Read More

भीषण अपघातात केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू:लातूर-अंबाजोगाई मार्गावर दुर्घटना; तरुण अधिकाऱ्याच्या मृत्यूने हळहळ

केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. एका कर्तव्यदक्ष आणि तरुण अधिकाऱ्याचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी वेगात…

Read More

हजारोंचे अश्रू पुसणाऱ्या, आनंदाच्या क्षणी दुर्लक्षित स्मशान जोग्यांचा सत्कार:अर्थ अभ्यासक डॉ. डी. एस. काटे यांची नाविन्यपूर्ण संकल्पना

अर्थ विषयक अभ्यासक आणि प्रसिद्ध उद्योजक अभियंता डॉ. डी. एस. काटे यांच्या वतीने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत शहरातील विविध स्मशान भूमीत अविरत सेवा देणाऱ्या चाळीसहुन अधिक स्मशान जोग्यांचा सत्कार पारंपारिक पद्धतीने करण्यात आला. या वेळी डॉ. डी. एस. काटे म्हणाले की, कधी न केलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात छत्रपती संभाजीनगर मधून पहिल्यांदाच होत आहे. काम कुठलेही…

Read More

दिव्य मराठी एक्स्पोज:प्रा. लोंढेंच्या मारेकऱ्यांना संरक्षण देणाऱ्या पीआय ताटेंच्या निलंबनाची शिफारस, डीसीपींचा चौकशी अहवाल ‘दिव्य मराठी’च्या हाती

सेवानिवृत्त प्रा. राजाभाऊ लोंढे यांचा फेब्रुवारीमध्ये दृश्यम स्टाइलने खून झाला होता. यातील आरोपींना पाठीशी घालत उस्मानपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे, हे आरोपी असल्याचे माहिती होऊनही गुन्हा दाखल केला नाही. आरोपी विशाल राठोड व त्याचे साथीदार ६ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत तब्बल ३६ दिवस पोलिस ठाण्यात येऊन…

Read More

अमृतसरमध्ये कपिल शर्माच्या घराबाहेर गोळीबार:हॉली सिटी येथील निवासस्थानी घडली घटना, कोणीही जखमी नाही, पोलीस तपास करत आहेत

प्रसिद्ध कॉमेडियन आणि टीव्ही स्टार कपिल शर्माच्या अमृतसर येथील निवासस्थानाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोटारसायकल किंवा कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अमृतसरमधील पॉश परिसर हॉली सिटी येथील कपिल शर्माच्या घराबाहेर धडाधड दोन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या पोलीस…

Read More

The challenge before us is to save Punjab, we are also keeping an eye on the MLAs, Punjab CM asks the President for time

Marathi News National The Challenge Before Us Is To Save Punjab, We Are Also Keeping An Eye On The MLAs, Punjab CM Asks The President For Time चंदीगड/नवी दिल्ली48 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हरभजनच्या घराबाहेर लिहिले ‘गद्दार’ आपले सात राज्यसभा खासदार भाजपमध्ये गेल्यानंतर आपचे नेतृत्व नव्या रणनीतीवर मंथन करत आहे. रात्री उशिरा गुजरातहून परतलेले मनीष सिसोदिया…

Read More

रवीना टंडनचे पंजाब CMना भावूक आवाहन:भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या आदेशावर म्हटले – माणुसकीचे भान ठेवा, इतर उपायही आहेत

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच भटक्या कुत्र्यांच्या चावण्याच्या प्रकरणावर आदेश दिला आहे की धोकादायक कुत्र्यांना इंजेक्शन देऊन मारले जावे. त्यानंतर 22 मे पासून पंजाबमध्ये भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू झाली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वतः अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याची माहिती दिली आहे. आता रवीना टंडनने त्यांना माणुसकीचा विचार करून इतर मार्ग निवडण्याचे आवाहन केले आहे….

Read More

बस्त्याला न नेल्याच्या रागातून बापाने लावला चाइल्डलाइनला फोन:पोलिसांनी थेट मांडवात धाव घेऊन रोखला बालविवाह

बालविवाह रोखण्यासाठी सहसा समाजसेवक किंवा जागरूक नागरिक पुढे येतात. मात्र, शहरातील एका नाट्यमय घटनेत चक्क जन्मदात्या बापानेच ‘चाइल्डलाइन’आणि पोलिसांना फोन करून स्वतःच्या अल्पवयीन लेकीचा विवाह उधळून लावला. बापाने हे पाऊल समाजप्रबोधनातून नव्हे, तर लग्नाच्या कपड्यांच्या खरेदीला (बस्त्याला) आपल्याला न नेल्याच्या रागातून आणि दारूच्या नशेत उचलल्याचे समोर आले आहे. संबंधित कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आई…

Read More

भोंदू अशाेक खरातला शिर्डी पोलिस घेणार ताब्यात:पत्नीचा जामीन फेटाळला, काही बड्या धेंडांची नावे उघड होण्याची दाट शक्यता

शिर्डीतील जमीन फसवणूक व खासगी सावकारी प्रकरणात अडकलेल्या भोंदू अशोक खरातला शिर्डी पोलिस ताब्यात घेणार आहेत. सध्या तो नाशिक एसआयटीच्या ताब्यात असून कायदेशीर प्रक्रियेसाठी सोमवारी (४ मे) पोलिसांचे पथक नाशिकला रवाना होईल. याप्रकरणी खरात, त्याची पत्नी कल्पना व इतर तिघांवर गुन्हा दाखल आहे. दरम्यान, आरोपी कल्पना हिने अटक टाळण्यासाठी राहाता न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज…

Read More

हिंगोलीकरांची पहिलीच सायकलवारी यशस्वी:माऊलींच्या पायावर मस्तक अन् अवघा शीण गेला निघून

हिंगोलीतून पहिल्याच वर्षी सायकलवारीची सुरवात, सर्वांना लांबपल्याचा सायकल चालविण्याचा अनुभव असलातरी मनात काहीशी धाकधुक होती, मात्र माऊलींचे नामस्मरण करून निघालेली सायकल रॅली पंढरपूरात पोहोल्यानंतर माऊलींच्या पायावर मस्तक ठेवले अन अवघा शीण निघून गेला. त्यातच सायकल रिंगण डोळ्याचे पारणे फेडणारे ठरल्याचे सायकलवारीचे हिंगोली प्रमुख प्रविण काळबांडे यांनी अनुभव कथन केले. मागील पाच वर्षापासून राज्यभरातून सायकलस्वार पंढरपूर…

Read More