Headlines

एल-निनोचे संकट: पिण्याच्या पाण्याचे नियोजन आधीच करा:जिल्हाधिकारी डॉ. आशियांचे निर्देश, अनधिकृत पाणी उपशावर होणार कारवाई‎

अहिल्यानगर एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या पाणी आणि चारा टंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आगामी काळात पर्जन्यमानावर होणारा परिणाम लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत सर्व संबंधित विभागांना ‘वॉटर-फेडर’ नियोजनाचे निर्देश दिले आहेत. “टंचाईची परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन आधीच करा, असे डॉ. आशिया यांनी…

Read More

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन:लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे होणार अनिवार्य; राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रात हालचाली

राज्यातील बालविवाहाची कुप्रथा समूळ नष्ट करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यापुढे लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर (लग्नपत्रिका) वर आणि वधू या दोघांच्याही नावापुढे त्यांची अधिकृत जन्मतारीख छापणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव सरकार संमत करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राजस्थान सरकारने हा नियम लागू…

Read More

ऑनलाईन खंडणी: दोन पोलीस कर्मचारी निलंबित:पुण्यात फरासखाना पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर कारवाई, बडतर्फीची प्रक्रिया सुरू

पुणे पोलिसांनी सोशल मीडियावर खंडणी वसुलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी कारवाई केली आहे. फरासखाना पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची राहुल सुधाकर दाभाडे आणि विवेक शैलेश पाटील अशी नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी…

Read More

CJI म्हणाले- मला ओरडून चेंबरमधून बाहेर काढले होते:त्याच न्यायाधीशांच्या सल्ल्यानुसार न्यायिक सेवा मुलाखत सोडली; हसून विचारले, माझा निर्णय योग्य होता का

सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी शुक्रवारी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक किस्सा सांगितला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीशांनी सांगितले की, कसे एका न्यायाधीशांनी त्यांना ओरडून चेंबरमधून बाहेर जाण्यास सांगितले होते. हा किस्सा न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी न्यायिक सेवेतील अर्जदाराच्या याचिकेवर सुनावणी करताना सांगितला. मॅजिस्ट्रेट परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याची मागणी घेऊन प्रेरणा गुप्ता आपले म्हणणे मांडत होत्या, तेव्हाच सरन्यायाधीशांनी…

Read More

ई-20 इंधनामुळे कार्यक्षमतेत नगण्य घट:वाहनांची कठोर चाचणी, सुरक्षिततेची हमी; इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत एआरएआयचे स्पष्टीकरण

पुण्यातील ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय) च्या कोथरूड येथील मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ‘ई-२०’ (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) इंधनाच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देण्यात आले. एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, बाजारात आणण्यापूर्वी प्रत्येक वाहनाची अत्यंत कठोर चाचणी घेतली जाते. ग्राहकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह…

Read More

घाटनांद्र्यातील तरूणांची भारतीय सैन्य दलात निवड:शिवजयंती उत्सव समितीकडून जंगी सत्कार‎

घाटनांद्रा येथील तीन भूमिपुत्रांची भारतीय सैन्य दलात निवड झाली असून संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नितीन दगडूबा कापसे, बळीराम चंद्रभान गोंधळे आणि अर्जुन सुभाष मोरे या तिघांची सैन्यात निवड झाल्याबद्दल शुक्रवारी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळील बसस्थानक परिसरात त्यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. देशसेवेचे स्वप्न…

Read More

यूपीतील प्रयागराज देशात सर्वात उष्ण, पारा 45.2°C वर:राजस्थानसह 5 राज्यांतील 14 शहरांमध्ये पारा 44°C च्या वर; ओडिशात सोमवारपासून शाळा बंद

देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट तीव्र होत आहे. शुक्रवारी देशात उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सर्वाधिक तापमान 45.2°C नोंदवले गेले. तर महाराष्ट्रातील अकोल्यात पारा 45°C, अमरावतीत 44.8°C राहिला. राजस्थानसह 5 राज्यांमधील 14 शहरांमध्ये पारा 44°C च्या वर गेला आहे. यूपीमधील आग्रा, मथुरा, फिरोजाबाद आणि मैनपुरी येथे दुपारी 12 ते 4 या वेळेत मजुरांच्या कामावर बंदी आहे….

Read More

मूलभूत प्रश्नांसाठी गोळशी फाट्यावर रास्ता रोको:रेशनकार्ड, पाणीटंचाई व आरोग्य सुविधेबाबत भूमिपुत्र एल्गार संघटना आक्रमक, उपाययाेजन करण्याचे आश्वासन‎

दिंडोरी व पेठ तालुक्यातील जनतेच्या प्रलंबित मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने दखल न घेतल्याने भूमिपुत्र एल्गार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर कनोजे यांच्या नेतृत्त्वाखाली नाशिक – पेठ रस्त्यावरील गोळशी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. नायब तहसीलदार चैताली . यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता. आंदोलनात उत्तमराव चौरे, संतोष भोई, सरपंच तुकाराम चोथवे, लक्ष्मण जाधव,…

Read More

बुवाबाजी विरोधी परिषद आज; भोंदूगिरीवर प्रहार:प्रा. मानवांचे "बुवा तिथे बाया'' विषयावर व्याख्यान‎

नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी अकोला शहरात शनिवारी, १८ एप्रिल रोजी मराठा मंडळ मंगल कार्यालय, रामदापेठ येथे बुवाबाजी विरोधी परिषदेचे आयोजन केले आहे. दुपारी १ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही परिषद चालणार असून समारोप प्रा.श्याम मानव यांच्या “बुवा तिथे बाया’ (खरात फाईल्स बळी स्त्रियांचा) या विषयावरील जाहीर सभेने होणार आहे. आयोजन अकोल्यातील सर्व सुजाण…

Read More

श्रीरामपूर-बेलापूर नव्या रस्त्यासाठी झाडांचा बळी:वृक्षप्रेमींमध्ये संताप, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नवीन रोपांचीही राखरांगोळी

झाड आणि रस्ता यांचे नाते नेहमीच विळ्या-भोपळ्याचे राहिले आहे. अरुंद रस्ता, वाढती वाहतूक आणि अपघातांचे सत्र यामुळे श्रीरामपूर-बेलापूर राज्य मार्ग क्रमांक ३६ या ६ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करणे आवश्यक होते. मात्र, हा विकास साधताना वडाच्या झाडांसह इतर शेकडो जुन्या झाडांवर कुऱ्हाड चालवली गेली. वृक्षप्रेमींच्या तीव्र आंदोलनानंतर प्रशासनाने रस्त्याच्या दुतर्फा आणि दुभाजकांमध्ये नवीन झाडे लावली ,…

Read More