पांदण रस्त्यांची कामे सुरू करा:विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने तहसीलवर मोर्चा, शेतकरी, महिला व पदाधिकाऱ्यांचा सहभाग
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पांदन रस्त्यांची रखडलेली कामे तातडीने सुरू करावीत, या प्रमुख मागणीसह विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्थानिक बसस्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तहसीलदारांना विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे उपाध्यक्ष प्रा. शरद पुसदकर आणि तालुका अध्यक्ष दिनेश धवस यांनी केले. महिला आघाडी प्रमुख…