Headlines

मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई:तस्करीप्रकरणी भाजप नेत्यासह पाच जणांना अटक, 5 कोटी रुपयांचे सोने जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) सोने तस्करीविरोधात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या कारवाईत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कामगार संघटनेच्या एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. डीआरआयने या आरोपींकडून ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने आणि इतर संशयास्पद मुद्देमाल जप्त केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More

ममता बॅनर्जी यांचा भवानीपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल:भाजपचे सुवेंदु अधिकारी येथून उमेदवार; आसाम-केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये निवडणूक प्रचार थांबला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने या जागेवरून सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे. ते विरोधी पक्षनेतेही आहेत. सुवेंदू यांनी २ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीदरम्यान गृहमंत्री अमित शाह त्यांच्यासोबत उपस्थित होते. भवानीपूर व्यतिरिक्त, नंदिग्राममध्येही ममता आणि सुवेंदू यांच्यात लढत आहे, जिथे…

Read More

वेरूळ येथील शहाजीराजे गढीच्या जतन आणि संवर्धनावर विशेष भर:शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत छावा संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक‎

प्रतिनिधी | वेरूळ स्थानिक विकास, ऐतिहासिक वारसा जतन आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी छावा संघटनेने पुढाकार घेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली. या बैठकीत विविध विकासात्मक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा पार पडली. छावा संघटनेचे संस्थापक रवींद्र बोडखे यांनी आपले सहकारी श्रीकांत तौर यांच्यासह ही भेट घेतली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अतुल चव्हाण, आमदार…

Read More

नगरसेवकाची सायबर पोलिसांकडे तक्रार, मुंबईतही स्वतंत्र तक्रार दाखल:महाजनांचा तरुणीसोबतचा फोटो व्हायरल; जळगावमध्ये फेसबुक युजरविराेधात गुन्हा

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे फोटो गुरुवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. हे फोटो एआयच्या मदतीने मॉर्फ असल्याचा दावा करण्यात आला असून, याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . जळगावचे नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, भरत मस्के नावाच्या फेसबुक युजरने मंत्री महाजन…

Read More

गावही कूस बदलतेय:काळाच्या ओघात गावरान आंबे नष्ट; आडी अन् सुवासही झाला दुर्मीळ

शेतातील बांधावरची जुनी मोठाली गावरान आंब्याची झाडे काळाच्या ओघात नष्ट झाल्याने गावरान आंबा, त्याच्या ‘आडी’ आणि सुगंधही दुर्मिळ झाला आहे. पूर्वी सर्रास शेतकऱ्यांच्या बांधावर अथवा शेतात नैसर्गिक रित्या उगवण झालेली मोठी आंब्याची झाडे असायची. गावोगावी ठराविक भाग आमराई म्हणून ओळखला जायचा. मात्र काळाच्या ओघात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतीचेही विभाजन होऊ लागले, परिणामी विभागून आलेल्या जमिनीत…

Read More

Heavy Rain Alert: Palghar & Kalyan-Dombivli Schools Closed

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनने दमदार बॅटिंग सुरू ठेवली असून मुंबईसह उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. हवामान विभागाने ४ ते ६ जुलै दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अत्यंत . अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उद्भवू शकणारी पूरस्थिती आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत….

Read More

शिवसेनेच्या बूथ स्तरावर हालचालींना वेग:डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात आढावा बैठक

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने बूथ स्तरावर संघटना मजबूत करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. याच अनुषंगाने शिवसेना नेत्या तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात बूथ पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक अडचणी, स्थानिक प्रश्न आणि बूथ स्तरावरील समन्वयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, किरण साळी, आनंद गोयल,…

Read More

जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिलेचा जीव वाचला:अमरावती आयुक्तांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार

अमरावती शहरात जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचला. वार्ड क्रमांक १९ मधील स्वस्तिक नगर परिसरात जनगणना सुरू असताना ही घटना घडली. या उल्लेखनीय कार्याबद्दल अमरावती महानगरपालिकेकडून संबंधित कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जनगणना कर्मचारी स्वस्तिक नगर परिसरात घरोघरी माहिती संकलित करत होते. त्यावेळी एका घरात एक वृद्ध महिला गंभीर अवस्थेत आढळली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रसंगावधान…

Read More

सोयाबीनच्या दरामध्ये उसळी; भाव 7 हजार पार:5 वर्षांतील सर्वाधिक दर, शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले, दरवाढीचा साठेबाजांनाच जास्त फायदा‎

अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोयाबीनला सर्वाधिक ७१४५ रुपये दर मिळाला असून गत पाच वर्षात सोयाबीनच्या पिकास मिळालेला हा सर्वाधिक दर असल्याचे बोलले जाते. मात्र, या दरवाढीचा फायदा कोणत्याही शेतकऱ्यांना होणार नसून साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे उखळ पांढरे होणार असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांकडे माल असताना भाव नाही आता भाव मिळाला तर धान्याचे कोठार…

Read More

कृषीदुतांकडून बीज उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक:कुंभारी येथे शेतकऱ्यांसाठी उपक्रम; लोकसहभागातून ओळखल्या गरजा‎

तालुक्यातील कुंभारी येथे अकोला येथील कृषी महाविद्यालयातील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या पाच विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत ‘सहभागी ग्रामीण अध्ययन उपक्रम’ यशस्वीरित्या राबवला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने शेती करून आपले उत्पन्न कसे वाढवावे, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश गावाची सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करणे,…

Read More