काँग्रेसकडून 3 उमेदवारांची यादी जाहीर:नागपूर पदवीधर, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा
राज्यातील विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आघाडी घेत नागपूर पदवीधर, पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांसाठी आपल्या तीन उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामुळे उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीनुसार, दोन विद्यमान आमदारांना पुन्हा…