Headlines

पुणे रेल्वेचे वाहतूक निरीक्षक किरण होजगे सेवानिवृत्त:34 वर्षांच्या सेवेत पुणे स्थानकाचा विकास, सुरक्षितता वाढवण्यात दिले योगदान

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील वाहतूक निरीक्षक (नियोजन) किरण मारुती होजगे हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता वाहतूक ताण कमी करण्याबरोबरच रेल्वेची सुरक्षितता, प्रवासी व मालवाहतूक क्षमता वाढविणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या नियोजनात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी अतिरिक्त सहा फलाटांच्या निर्मितीचे…

Read More

पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी कॉमनवेल्थ विक्रम नोंदवला:पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 9 सुवर्ण आणि एक रौप्यपदकही पटकावले

विनिपेग, कॅनडा येथे नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग व बेंच प्रेस स्पर्धेत पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी विक्रमी कामगिरी करत नऊ सुवर्णपदके, एक रौप्यपदक आणि कॉमनवेल्थ विक्रमाची नोंद केली. विविध कॉमनवेल्थ देशांतील सुमारे ८०० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. ५७ किलो एम-१ महिला गटातील डॉ. इनामदार यांनी क्लासिक पॉवरलिफ्टिंगमध्ये स्क्वॅट, बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या तीन प्रकारांत…

Read More

राजकीय संघर्ष असायला हवा पण जीव घेणारा संघर्ष नसायला हवा:मंत्री गणेश नाईकांनी घेतली पूर्णेकर कुटुंबीयांची भेट

ठाण्याच्या मानपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. या धक्कादायक घटनेनंतर आज भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना नाईक म्हणाले की, राजकीय संघर्ष असायला…

Read More

सातारा पोलिस दलातील कॉन्स्टेबलची पोलादपूरमध्ये आत्महत्या:भुईंज महामार्ग पोलिस मदत केंद्रात होते कार्यरत; आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

सातारा पोलिस दलातील पोलिस कॉन्स्टेबल संतोष ननावरे (वय ३६, रा. ओझर्डे, ता. वाई) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पोलादपूर येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे सातारा पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. संतोष ननावरे हे सध्या भुईंज महामार्ग पोलिस मदत केंद्रात पोलिस अंमलदार…

Read More

पुण्यात 123 मुलींच्या अपहरणाचा समाजमाध्यमांवरील दावा खोटा:पुणे पोलिसांनी पडताळणी करून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले

पुणे शहरात गेल्या २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा समाजमाध्यमांवर प्रसारित होणारा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. व्हायरल होत असलेल्या रील आणि ऑडिओ क्लिपमधील माहितीची संबंधित पोलीस ठाणी, गुन्हे शाखा आणि अन्य उपलब्ध माध्यमांतून पडताळणी करण्यात आली. मात्र, या दाव्याला पुष्टी देणारी कोणतीही ठोस माहिती, नोंद किंवा पुरावा आढळलेला…

Read More

पायलटला बॉलिवूडचा सलाम:जावेद अख्तर म्हणाले- स्मितला महावीर चक्र मिळावे; माधवन-देवरकोंडासह अनेक सेलिब्रिटींनी केली प्रशंसा

फ्लायदुबईच्या विमानातील सहवैमानिकाच्या हल्ल्यानंतरही १७४ प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांच्या शौर्याचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कौतुक केले आहे. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी कॅप्टन स्मित यांना देशाचा दुसरा सर्वोच्च लष्करी सन्मान ‘महावीर चक्र’ देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, परेश रावल, रवीना टंडन, रवी किशन, विजय देवरकोंडा आणि आर. माधवन यांच्यासह…

Read More

ॲड. प्रमोद आडकर यांना डॉ. श्रीपाल सबनीस संस्कृती सेवा पुरस्कार:मनोहारी मैत्र संघातर्फे व्याख्यानात डॉ. राजा दीक्षित म्हणाले गांधीवाद शांतिमय क्रांतिवाद

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा प्रवाह नेमस्त, जहाल आणि पुढे गांधीवादाकडे वळला. गांधीवाद हा शांतिमय क्रांतिवाद होता. सैद्धांतिक पायाविना राजकारण, कष्टाविना संपत्ती, विवेकाविना उपभोग, चारित्र्याविना शिक्षण, नीतीविना व्यापार, मानवतेविना विज्ञान आणि त्यागाविना उपासना ही सात दुरितं गांधीजींनी आपल्या विचारातून सांगितली. असे दुराचार आपल्या हातून घडू नयेत हे विचार त्यांनी समाजापुढे आणले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, मराठी विश्र्वकोश…

Read More

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघावर भाजपचा दावा:खासदार धनंजय महाडिकांची माहिती; गोकुळची निवडणूकही महायुती एकत्रितपणे लढवणार

गेल्या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. परंतु आता राष्ट्रवादीचे लाड यांचे संपूर्ण कुटुंबच भाजपमध्ये सामील झाले आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना, या दृष्टिकोनातून त्या जागेवर भारतीय जनता पार्टीचा क्लेम आहे, असा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. तसेच, येणाऱ्या निवडणुकीत पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर या दोन्ही जागा भाजपच लढवणार असल्याचेही…

Read More

गांधी जयंतीला पुण्यात 17 किमी 'सत्याग्रह मार्च':प्राणी हक्क, अहिंसा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पदयात्रा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त पुणे ॲनिमल लिबरेशनच्या वतीने प्राणी हक्क, अहिंसा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी १७ किलोमीटरच्या सत्याग्रह पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत १२० हून अधिक तरुण, सजग नागरिक आणि प्राणीप्रेमींनी सहभाग घेतला. प्राण्यांवरील अत्याचार रोखणे, डेअरी उद्योगातील प्राण्यांच्या परिस्थितीबाबत जनजागृती करणे आणि वनस्पती-आधारित आहाराला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा…

Read More

सुवेंदू म्हणाले- बंगालमधून TMC पूर्णपणे नाहीशी झाली:नंदीग्राममध्ये भाजप उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी पोहोचले; याच मतदारसंघात ममतांचा पराभव केला होता

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी शुक्रवारी नंदीग्राममध्ये भाजपच्या उमेदवारासाठी प्रचार करण्यासाठी पोहोचले. त्यांनी सांगितले की, राज्यातून तृणमूल काँग्रेसचे नाव आणि चिन्ह मिटवून टाकण्यात आले आहे. अधिकारी यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी आणि अरूप रॉय गटांना स्वतंत्र नावे आणि निवडणूक चिन्हे दिली आहेत. कोणाचेही नाव न घेता त्यांनी म्हटले, “मुख्य चोरही तुरुंगात जाईल.” अधिकारी…

Read More